प्रबोधिनी पद्ये

हिंदुराष्ट्रदेवते….

हिंदुराष्ट्रदेवते, हिंदुराष्ट्रदेवते|शुद्ध भाव स्वीकारी-हिंदुराष्ट्रदेवतेचारु भक्ति स्वीकारी-हिंदुराष्ट्रदेवतेश्रद्धेचा दीप अचल तेवत पदि माते॥हिंदुराष्ट्रदेवते॥ बंधु भगिनि वंदितो-हिंदुराष्ट्रदेवतेशुभ कृती समर्पितो-हिंदुराष्ट्रदेवतेतव यश तव गौरव गे ही अमुची ईप्सिते॥हिंदुराष्ट्रदेवते॥

हिंदुराष्ट्रदेवते…. Read More »

प्रबोधिनी प्रबोधिनी

प्रबोधिनी, प्रबोधिनी, प्रबोधिनी, प्रबोधिनीएक ध्यास, एक आस आमुच्या मनोमनी॥1॥प्रबोधिनी, प्रबोधिनी, प्रबोधिनी, प्रबोधिनीएक तंत्र, एक मंत्र आमुच्या तनूमनी॥2॥प्रबोधिनी, प्रबोधिनी, प्रबोधिनी, प्रबोधिनीसाध्य एक, मार्ग एक आमुची प्रबोधिनी॥3॥

प्रबोधिनी प्रबोधिनी Read More »

हो रही है आरती (हिंदी)

मातृमंदिर में चलो प्रिय हो रही है आरती॥ध्रु.॥ शंखध्वनि उठने लगी है दीप की लौ भी जगी हैआज करुणा लिये वीणा स्वयं ही झंकारती॥१॥ मूर्ति माँ की शांत है वरदायिनी स्मितशालिनीअन्नपूर्णा और लक्ष्मी ज्ञानदा यह भारती॥२॥ मूर्ति में उसके परे भी निखिल-जीवन-व्यापिनीदेशजननी रूप में ही विश्वजननी दिखती॥३॥ मंदिरांगण भक्त आये धर्मरक्षक वीर आयेप्राणधुन गंभीर उनकी

हो रही है आरती (हिंदी) Read More »

हे विश्वात्मक

हे विश्वात्मक तव भक्ताचा स्वीकारी प्रणिपातप्रार्थना हीच आज हृदयात॥ध्रु.॥ अन्तरात जी वसे हीनतामोह असूया आणि अहन्तादृढ वज्राने त्यांच्यावरती करि निर्मम आघात॥१॥ सुखात किंवा विपदाकालीअविचल राहो शान्ति आतलीप्रसन्नतेचे दैवी स्मित रे नित विलसो ओठात॥२॥ इवली शल्ये रुपती खुपतीमात करू दे त्यांच्यावरतीप्रगल्भतेचे पंख देऊनी ने ज्योतिर्जगतात॥३॥ सेवेतच सार्थक गवसावेजीवशिवाचे मैत्र जुळावेविश्वच अवघे सिंचित व्हावे स्नेहामृत सेकात॥४॥ आर्तांना

हे विश्वात्मक Read More »

नमस्कार देवा……

नमस्कार देवा तुला आमुचा हाकरी आमुची मायभूमी महा॥ध्रु.॥ हिचे रूप चैतन्यशाली दिसावेजगाला कळावी हिची थोरवीस्मरूनी हिच्या त्या कथा अन्‌‍ व्यथाहीहिला न्यायचे रे पुन्हा वैभवीअशा सर्व स्वप्नास सामर्थ्य यावेम्हणूनीच देवा नमस्कार हा॥१॥ जनांचा प्रवाहो इथे चाललेलासदा संस्कृतीच्या मुळापासुनीपिढ्या नांदती भोवती बांधवांच्याअम्ही भिन्न ना त्यांचियापासुनीतयांच्या कळा जाणवाव्या अम्हालातयांच्या सुखाचीच लागो स्पृहा॥२॥ स्फुरो कल्पनाशक्ती अभ्यास यत्नेबनो शुद्ध बुद्धी

नमस्कार देवा…… Read More »

ध्येयाचा सुगंध

ध्येयाचा सुगंध लाभला जीवनाआता समर्पणा पूर्ण व्हावी॥ध्रु.॥ क्रोध अहंकार जावो निरसूनविशुद्ध कांचन उजळावे॥१॥ ईर्ष्या-असूयेला नाही येथ स्थाननिर्मळ चैतन्य खळाळत॥२॥ प्रबोधिनीपद्म हिंदुराष्ट्रापायीत्याचा अंश मीही धन्य झालो॥३॥

ध्येयाचा सुगंध Read More »

उपासनेची जोड हवी

इतिहासाची उलटुन पानेभविष्यवेधी कृती हवीअभ्युदयाला परमार्थाच्याउपासनेची जोड हवी ॥ ध्रु.॥ हिंदुत्वाचे पुनर्जागरणविरक्तीतही करुणासिंचनजेत्यांच्या उन्मत्त शिरावरधर्मध्वजेचे हो आरोहणअद्वैताच्या त्या पथिकासमजागृत अर्पण वृत्ति हवी ॥१॥ निःशस्त्रांची उभवुन सेनासत्यव्रताचे मार्ग निर्मिलेअंत्यजपूजा सार्थक मानुनराष्ट्रशक्तिचे मर्म जाणलेत्या द्रष्ट्याचे शब्द उमगण्याअंतःकरणा साद हवी ॥२॥ ध्येय एक, जरि भिन्न साधनेकोटि मनांचे बळ जागविणेसमर्थ वाणी – सहज कृतीतुन‌‘राष्ट्रधर्म‌’ अवघा उलगडणेत्या धर्माचे स्वत्व राखण्यातेज-सत्त्व,

उपासनेची जोड हवी Read More »

ईश्वरचरणी समर्पिता……

पृथ्वी, जल, वायू, तेजाने, आकाशाने भरलेलीशुद्ध घडो काया माझी जी महाभुतांनी व्यापियलीकोण असे मी? मी काया की तिच्यामध्ये स्थित चेतनता?ज्योति असे मी विमल निरागस, ईश्वरचरणी समर्पिता॥ध्रु.॥ प्राण, अपाने, व्यान, उदाने, समानादि पंचप्राणेव्याप्त तनू ही, चेतन राहो, प्राणांविण कुठले जगणे?कोण असे मी? पंचप्राण की? की त्यांच्यावरली सत्ता?॥१॥ शब्द कर्णिचा, स्पर्श त्वचेचा, रूप विषय हा नयनांचारस जिव्हेचा

ईश्वरचरणी समर्पिता…… Read More »

ध्येयप्रवण साधक

ध्येयप्रवण साधक, कार्यपथे साधयमृदु हसन्‌‍, मधु किरन्‌‍, मातरं सदा स्मरन्‌‍ ॥ध्रु.॥ जीवनं न शाश्वतं, वैभवं न हि स्थिरम्‌‍स्वार्थलेपनं विना, सत्कृतं हि तत्‌‍ चिरम्‌‍सरलता स्वजीवने (तान)चिंतने उदात्तता (तान)समाजपोषिता: वयं, कृतज्ञभाव रक्षयन्‌‍ ॥१॥ या च मनसि भावय, या च शिरसि धारयमातृभूमि सा सदा, हृदन्तरे सुपूजयप्रेमरूपिणी पदे (तान)जीवितं समर्पितम्‌‍ (तान)प्रसन्नवृत्ति – निर्भया: वयं भवेम संगता: ॥२॥ पूर्वजकृतं स्मर,

ध्येयप्रवण साधक Read More »

निवेदितांचे स्वप्न जयस्वी……..

चैतन्याचे नवे धुमारेलक्ष-लक्ष हृदयी निर्मूनिवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्या अथक श्रमू॥ध्रु.॥ स्वदेशभाषा, स्वदेशभूषाआग्रह स्वदेशवृत्तीचाप्रखर अस्मिता हिंदुभूमीचीगौरव निज आदर्शांचाकला-शास्त्र अन्‌‍ साहित्यातून सखोल दृष्टी प्राप्त करू॥१॥ ‌‘परिस्थतीला शरण जाऊनीकोण कधी विजयी झाले?एकरूप-एकात्म भारतीहेच एक दैवत अपुले‌’निवेदितांचे शब्दतेज हे जन जागविण्या नित्य स्मरू॥२॥ दुर्बलतेला दूर सारूनीअन्यायाशी झुंज हवीचिंतन-शिक्षण-प्रबोधनातूनवाट सापडे नित्य नवीकितीही असूदे प्रवाह बळकट उलट पोहूनी पार करू॥३॥

निवेदितांचे स्वप्न जयस्वी…….. Read More »