आज प्रचीती द्या !
गिरिकुहरातिल गर्द बनातिल सिंहाच्या छाव्यांनो, तिमिरपुरातिल कृष्णघनातिल तेजस्वी ताऱ्यांनो, प्रलयंकर शक्तीची तुमच्या आज प्रचीती द्या तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचीती द्या ।। ध्रु. ।। मूक मनांच्या कारागारी धुमसत जी चिनगारी वीज होउनी कोसळु दया ती उद्धत अंधारी त्या भस्मातुन बहरुन येइल हिरवा स्वर्ग उद्या ।। १ ।। शतकांपूर्वीची जयगीते अजुनि घुमत कानी शतकांपूर्वी अखिल धरेला […]