वैचारिक

६. समाजाला वगळून एकट्या व्यक्तीचा विकास अशक्य

बांधिलकी आणि कार्यक्षमता: दहा-बारा वर्षांपूर्वी प्रबोधिनीतील तेव्हाच्या महाविद्यालयीन सदस्यांमध्ये एक वाद रंगलेला होता. समाजातील विविध कामे, कार्यकर्ते व संस्था यांना भेटी द्यायला ते जायचे. भेटीहून परत आल्यानंतर प्रत्येक वेळी वाद व्हायचा की ‘कमिटमेंट’ (म्हणजे ध्येयाशी निष्ठा किंवा बांधिलकी) आधी निर्माण झाली पाहिजे की ‘कॉम्पिटन्स्’ (कार्यक्षमता) आधी निर्माण करायला पाहिजे? भेट द्यायला जाणाऱ्याचा स्वभाव आणि भेट […]

६. समाजाला वगळून एकट्या व्यक्तीचा विकास अशक्य Read More »

५. कृतिशील बुद्धीला विकसित व्यक्तिमत्वाचे कोंदण

एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा अनुभव ‘मेन्सा’ नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. चाळीस-पंचेचाळीस देशांमध्ये तिच्या शाखा आहेत. भारतीय मेन्साचे कार्यालय प्रबोधिनीच्या पुण्यातील वास्तूमध्ये १९७२ पासून आहे. भारतीय मेन्साचा अध्यक्ष म्हणून दहा-बारा वर्षे वेगवेगळ्या देशातील मेन्सातर्फे प्रकाशित होणारी नियतकालिके माझ्याकडे सस्नेह भेट म्हणून येत असतात. समाजातल्या प्रातिनिधिक दहा हजार लोकांनी बुद्धिमत्ता चाचणी दिली तर त्यांतील गुणानुक्रमे पहिल्या दोनशे

५. कृतिशील बुद्धीला विकसित व्यक्तिमत्वाचे कोंदण Read More »

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी

समुद्र आणि कालव्यातील झडपा (लॉक) : १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात एका नामवंत शिक्षण तज्ज्ञांना मुख्य भाषण द्यायला निमंत्रित केले होते. त्यांच्या व्याख्यानाचे शीर्षक होते ‘Rising Tide Raises All Ships’. समुद्राला भरती आली की छोट्या होडक्यापासून तेलवाहू टँकरपर्यंतच्या सर्व आकाराच्या जहाजांची पातळी वर जाते असा त्या शीर्षकाचा अर्थ. प्रज्ञावंतांच्या शिक्षणात सापडलेली प्रज्ञा-विकासाची सूत्रे सार्वत्रिक शिक्षण

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी Read More »

८. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सर्जनशीलता

नेतृत्वविकसनातील पहिला प्रयोग १९९२ साली प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त काढलेल्या स्मरणिकेत पुढील परिच्छेद आहे: “नेतृत्व म्हणजे त्या त्या क्षेत्रात नवे सुचून ते प्रत्यक्षात आणता आले पाहिजे अशी कल्पना केली. एखाद-दुसऱ्या गावाऐवजी पंचवीस गावांच्या खोरे विकसनाची योजना आखली ती त्यामुळे. आयुर्वेदिक सूक्ष्मौषधे बनवून त्यांच्या प्रसाराचा प्रयत्न केला तो त्यामुळे ! मराठीत शिकलेल्यांना सर्व विषय एकदम इंग्रजीतून देवनागरी लिपीचा

८. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सर्जनशीलता Read More »

७. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : स्वावलंबन

स्थानिक संसाधनांचा वापर युवक विभागाच्या दलावर मार्गदर्शक म्हणून काम केलेला एक प्रबोधक सध्या आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करतो. व्यवसायाला सुरुवात केल्यापासूनच ‘मी स्वस्तातल्या इमारतींची आरेखने करतो व करणार’ असे तो म्हणायचा. त्याच्या सुरुवातीच्या ग्राहकांकडून मी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त झालेली पाहिली. ‘तो म्हणतो तसे त्याच्या आरेखनांप्रमाणे केलेले काम स्वस्त नसते’, ‘इतरांना येतो तेवढाच खर्च येतो’, ‘त्याच्याकडे गेलो

७. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : स्वावलंबन Read More »

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले,

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II Read More »

६. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सहविचार

संघर्षातून विचारविनिमय नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प आणि त्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करणाऱ्या श्रीमती मेधाताई पाटकर ही नावे महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेशातील बहुतेक जणांनी ऐकलेली असतात. या आंदोलनामुळे मोठे प्रकल्प करावेत की नाहीत ? आणि मोठ्या प्रकल्पातील विस्थापितांचे पुनर्वसन कोणी ? कधी ? कुठे ? कसे ? करावे हे प्रश्न चर्चेमध्ये आले.

६. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सहविचार Read More »

५. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : समग्रता

निरीक्षण आणि तुलना मागच्या आठवड्यात महेंद्रभाईबरोबर सोलापूरहून पुण्याला येत होतो. शेजारी दोन डच ज्येष्ठ नागरिक बसले होते. भारतातला दोन महिन्यांचा प्रवास संपवून परतीच्या मार्गावर होते. त्यातील एक जण वेळ घालविण्यासाठी ‘सुडोकू’ ची कोडी सोडवत बसला होता. महेंद्रभाईंनी चौकशी केल्यावर ‘हे डच भाषेतील शब्दांचे ‘सुडोकू’ कोडे आहे, आकड्यांचे नाही’, अशी माहिती त्याने पुरवली, वर जाता जाता

५. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : समग्रता Read More »

४. कामाबरोबर बोधवाक्याचे चिंतन

निरर्थक रूढी आणि सार्थ प्रथा लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’च्या पहिल्या पानावर ‘स्वयमेव मृगेन्द्रता’ या श्लोकाची एक ओळ छापलेली असायची. सिंहाचे वनराज असणे त्याच्या कृतीतूनच सिद्ध होते, त्यासाठी इतरांनी राज्याभिषेक करायला लागत नाही, हा त्या श्लोकाचा भावार्थ. या ओळीप्रमाणेच लोकमान्यांच्या काळात ‘केसरी’ने महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व केले. एखादे सुवचन ध्येय म्हणून शीर्षस्थानी छापणे ही ‘केसरी’च्या बाबतीत सार्थ प्रथा

४. कामाबरोबर बोधवाक्याचे चिंतन Read More »

३. प्रत्येक कृतीत ध्येयविचार

नवीन ग्रंथाचे मुखपृष्ठ दि. १७ ऑगस्ट २००८ या दिवशी ‘ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ४’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्याचे मुखपृष्ठ कसे असावे या संबंधी चित्रकाराबरोबरची पहिली चर्चा सहा-सात महिन्यांपूर्वी झाली होती. साधारण महिन्यापूर्वी दोन चित्रांचे नमुने बघायला मिळाले. त्यातल्या अधिक उण्याची तुलना चालू असताना मुखपृष्ठासाठी आणखी एक कल्पना पुढे आली. देशातील

३. प्रत्येक कृतीत ध्येयविचार Read More »