वैचारिक

नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू

नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू लढाया नव्या जिंकण्या सज्ज बाहू आम्ही सूर्यकन्या, नव्हे फक्त छाया स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। ध्रु. ।। जिथे ज्योत तेवे स्वयंनिश्चयाची तिथे अंध तर्का मिळे मूठमाती विवेके विचारे कृती नित्य व्हाया स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। १।। जनी क्षेम चिंतीत सृजनी रमावे कशाला वृथा भंजनाला भजावे स्वयंप्रज्ञ तेजाळते […]

नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू Read More »

डोळस मोरपिसारा

डोळस मोरपिसारा फुलवू पंचेन्द्रिय मनबुद्धिचा नील नभांगणि मेघ बोलवू देशाच्या समृद्धीचा ।। धृ.।। अज्ञाताला अनुभवणारी अमूर्त समजुन देणारी तालसूर, शिल्पाचा, अभिनय, नाट्याचा रस घेणारी बहुविध प्रज्ञा अशी रूजावी शिक्षणातुनी मनोमनी उत्साहाचे सृजनामध्ये रूपांतर हो क्षणोक्षणी कुतूहलातुन जन्मा यावा झरा जिता नवसिद्धीचा ।।१।। सत्य शुभंकर जे जे त्याला अनुसरण्याचे धैर्य हवे ठरली चौकट पार कराया निर्भय

डोळस मोरपिसारा Read More »

डोळे उघडून बघा गड्यांनो

डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ।। ध्रु. ।। भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले प्रारंभी जे अद्भूत वाटे गहन, भीतिदायी त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका ।। १ ।। वाहून

डोळे उघडून बघा गड्यांनो Read More »

जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती

जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।ध्रु. ।। कुणि हसरे, रुसके, लाघवि कुणि लडिवाळ कुणि स्पर्श पाहती नभ हे नील-विशाल कुणि अबोल, उत्कट, कुणि तर्काची धार कुणि तिखट, तेज जणु शिवबाची तलवार परि सर्वारूपी नटला तो जगजेठी ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।१।। फुलण्यास यांजला माती संस्कारांची प्रेमाचे पाणी, ऊब सूर्यकिरणांची

जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती Read More »

उतरले आकाश पक्षी

शब्द – भावांच्या, सुरांच्या या मनोरम संगमी उतरले आकाश – पक्षी शारदेच्या अंगणी ।। ध्रु. ।। मायबोलीच्या घराची, आज हसरी दालने वेढती गुणगंध चित्ता, स्नेहसुंदर भूषणे आणि गाभाऱ्यात शोभे मातृभूमी पावनी ।। १ ।। अमित प्रतिभेचे फुलोरे, अमित रुपी उमलती ज्ञान – विज्ञानात रमती, दूर क्षितिजे शोधती गवसता सत्ये नवी, ती हर्ष – पुलकित पर्वणी

उतरले आकाश पक्षी Read More »

आम्ही जाऊच जाऊ

अदम्य अपुल्या आकांक्षांचे गीत आजला गाऊ जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाउच जाऊ, आम्ही जाउच जाऊ ।। ध्रु. ।। नवतेजाप्रत नवक्षितिजांच्या दौडत दौडत जाऊ क्षणभर सांगुनी मनिचे हितगुज स्वप्ने नव रंगवू नवीन कवने, नव्या कहाण्या नवस्फूर्तीने गाऊ ।। १ ।। नसति भाषणे जीवन ध्येये ही तर अमुची सारी यत्न शिंपुनी फुलवू क्षेत्रे कर्तृत्वाची न्यारी इतिहासाची

आम्ही जाऊच जाऊ Read More »

क्षितिज नवे मज….

क्षितिज नवे मज सतत बोलवी, साथीला सन्मित्र हवे आज एकटा, अनघड जरि मी, मनात अंकुर हा उगवेक्षितिज नवे रे, क्षितिज नवे ।। ध्रु. ।। निद्रेमधुनी जागा होता नवाच मी मजला दिसतो उलगडणारी दुनिया भवती मी मध्ये माझा नसतो साखरझोपेमधली हसरी स्वप्नमालिका अवतरते कठोर अवघड सारे सरुनी आसमंत होती हिरवे ।। १ ।। चुटकीसरशी सुटती गणिते

क्षितिज नवे मज…. Read More »

सोनियाचा दिवस दारी

सोनियाचा दिवस दारी, शतक अर्धे सरुनि जाई जागृतांचे गीत हे, संजीवनाचा मंत्र गाई ।। ध्रु. ।। जाहले ते बिंदुवत् अन् सिंधुवत् आहे समोरी ठाकता आव्हान, स्फुरते शौर्य पंखांना भरारी वेधिका दृष्टी उद्याच्या नवयुगाचे स्वप्न पाही ।।१।। मापुया अवकाश आणिक शोधु या अणुगर्भ ऊर्जा मानवातच माधवाची बांधु या सानन्द पूजा अमृताचे कुंभ ओतू लोकगंगेच्या प्रवाही ।।२।।

सोनियाचा दिवस दारी Read More »

सळसळणारे धवल तेज हे

सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे गरुडालाही झेप लाजवी गगन तोकडे पडे ।। ध्रु. ।। सुपुत्र बनलो आज आईचे तोडुन फसवी नाती स्वर्गसुखाची हसतच देऊ तिजसाठी आहुती या मातीचे सुवर्ण करण्या श्वसना धार चढे ।। १ ।। पाजळलेली मशाल हाती उज्ज्वल परंपरेची चक्र नियतिचे उलटे फिरवू आण तिच्या दीप्तिची तिच्या प्रकाशी सुगम भासती भेडसावते

सळसळणारे धवल तेज हे Read More »

प्रबोधिनीत यायचे….

प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया समर्थ मायभूमीला जगी करावया ।। ध्रु. ।। खेळ खूप खेळुनी सतेज व्हायचे रोज नवे ज्ञानदिवे चेतवायचे सुरेख लेखना, उदंड वाचना स्फूर्ती घेऊ या, या यशाकडेच जाऊ या ।। १ ।। फूल फूल गुंफुनीच माळ होतसे थेंब थेंब झेलुनी झरा वहातसे मोकळ्या मनी, प्रेम फुलवुनी माळा गुंफू या, या साखळी जोड्या ।।

प्रबोधिनीत यायचे…. Read More »