दोघेही हवे !
राष्ट्ररथाला विजयी व्हाया समबल चक्रे दोन हवी बज्रासम दृढनिश्चय आणिक बिजली सम समशेर हवी ।। धृ. ।। समाजपक्ष्या, नभ जिंकाया पंखहि तुजला दोन हवे गती हवी तुज, दिशा हवी अन् अमोघ ऐसे धैर्य हवे ।। १ ।। जीवन-अंकुर रुजुनी येण्या, सूर्यकरांची ऊब हवी आणि त्याच्या भरण पोषणा माय मातिची प्रीत हवी ।। २ ।। वादळवाऱ्यापासून […]