प्रबोधन गीते

हिंदु ऐक्याची ध्वजा….

या निळ्या मोकळ्या अंबरी विहरते सूर्यकन्येपरी हिंदु ऐक्याची ध्वजा ।। ध्रु. ।। आर्षकालातुनी आर्यसंघातुनी मुक्त जे गाइले सूक्त तेजस्वि ते लहरताना दिसे या स्वरांच्या वरी ।। १ ।। दुष्टनिर्दालना सुष्टसंरक्षणा धर्मसंस्थापना चेतवी जी मना कल्पवृक्षापरी छत्र माथी धरी ।। २ ।। स्तंभिकेतळी हिच्या अखंड यज्ञ मांडिले घेतली महाव्रते सहस्र प्राण सांडिले ही असो महत्पदी वैभवाच्या […]

हिंदु ऐक्याची ध्वजा…. Read More »

शतकातुनि…

शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती ‘अग्रेसर हिंदुराष्ट्र हिंदुसंस्कृती’ असे स्वर निनादती ।। ध्रु. ।। इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती ।। १ ।। परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले संतांनी सद्विचार येथ पेरले स्वत्वाची ठेवियली ज्योत जागती ।। २ ।। स्वातंत्र्यास्तव कितीक अथक झुंजले फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले

शतकातुनि… Read More »

विश्वात सर्व शोभो

विश्वात सर्व शोभो हा हिंदुदेश अमुचा त्याच्याच पूजनाचा हा ध्यास अंतरीचा ।। ध्रु. ।। नादातही नद्यांच्या वेदान्तसूक्ति हसती इथल्या तरुलताही त्यागास पूजताती सत्यासमोर असणे हा सूर्यफूल बाणा नचिकेत निर्भयांचा हा हिंददेश अमुचा || १ || वारा सदैव गाई स्वातंत्र्यगीत येथे उत्तुंग पर्वतांचे उन्नत सदैव माथे भूमी कधी न साही अपमान खंडनाचा आसिंधुसिंधु अमुचा हा हिंदुदेश

विश्वात सर्व शोभो Read More »

या माझ्या भारतदेशी

एकजीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी या माझ्या भारतदेशी सुखस्वप्ने फुलुनी यावी ।। ध्रु. ।। शेतात कोरड्या किसान गाळी घाम पेरले उगवता हरखुन जाई भान भरगच्च पिकाने पिवळे होई रान बळिराजाची परि बाजारी धुळदाण या भारतभूपुत्राच्या कष्टाला किंमत यावी ।। १ ।। ही सागरवेष्टित भूमी सुजला सुफला रखरखीत झाली ओलावा ओसरला बोडके नागडे होता डोंगरमाथे आटले

या माझ्या भारतदेशी Read More »

मज श्रेय गवसले हो

हिंदुभूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो समर्पणाचे शुभ्रकमल हृदयात विकसले हो ।। ध्रु. ।। अहंपणाचे तुटता अडसर आत्मशक्तिचे विमुक्त निर्झर दो तीरांना फुलवित फळवित हसत निघाले हो ।। १ ।। स्फटिकगृहीच्या दीपापरि मन प्रसन्नतेने ये ओसंडून चिरंतनाच्या चिंतनात मग सहजचि रमले हो ।। २ ।। ध्रुवापरि दृढ ध्येयप्रवणता ऋजु समर्थता कार्यशरणता बहुत शोधुनि हे जीवनस्वर

मज श्रेय गवसले हो Read More »

तनूमनात…..

तनूमनात एक ध्यान प्रिय महान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान ।। ध्रु. ।। ऋषी मुनी तपोनिधी कितीक येथ जाहले दिव्यदृष्टि-चिंतकांनी विश्वगूढ भेदिले गुरुपदीच शोभतो प्रिय महान हिंदुस्थान ।। १ ।। जाहली प्रसन्न येथ जान्हवी भगीरथा सिद्ध सूर्य कोंडण्यास ब्रह्मपुत्र सर्वथा यत्न हाच मंत्र देइ प्रिय महान हिंदुस्थान ।। २ ।। सरेल दैन्य येथले सुबुद्ध कष्ट

तनूमनात….. Read More »

गर्जोन उठे कथण्याते….

गर्जेन उठे कथण्याते जल आज सप्तसिंधूंचे आ सिंधु सिंधु धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे ।। ध्रु. ।। रडल्या त्या धायी धायी अबला नरनारी जेव्हा थरथरली तीर्थे गायी धर्मनीति बुडली जेव्हा तलवार भवानी आई होती ना उठली तेव्हा धर्माच्या आपत्काळी खड्गाचे कंकण ल्याली रुधिराची चढली लाली राखिण्या स्वत्व हिंदूंचे ।। १ ।। स्मरतो ना तेग बहादूर,

गर्जोन उठे कथण्याते…. Read More »

उरात अमुच्या…..

उरात अमुच्या अदम्य ईर्ष्या, चैतन्याला गगन थिटे सामर्थ्याची ही ललकारी, लक्षमुखातुन आज उठे ।। ध्रु. ।। ध्येयासाठी उसळत जाता, या देहाचे भान कुठे? तरुणांच्या धमन्यांत आजला, समर्पणाची आस उठे ।। १ ।। हनुमंताची अभेद्य काया, इंद्राचेही वज्र तुटे खांद्यालागी भिडवा खांदा, संघटनेची साद उठे ।। २ ।। रिपुरक्ताचा ठाव नेमका, श्रीरामाचा बाण सुटे मनात घुमती

उरात अमुच्या….. Read More »

वास्तुपूजन

या वास्तूच्या कणाकणाशी जडले माझे नाते काशी माझी हीच आणखी रामेश्वरही येथे ।। ध्रु. ।। श्रांत जिवाला, भ्रांत मनाला, करुणाघन बुद्धाचे मंदिर शरद्रात्रिचे शांत शिवालय आश्वासन हे देते ।। १ ।। पोलादाच्या नसानसांतुन, थिजला लाव्हा, भिजले वादळ कोसळत्या बिजलीचे बनले मूर्त शिल्प लखलखते ।। २ ।। विक्रम-वैभव-वैराग्याच्या, दिग्विजयी दूतांच्या नयनी आजच जेथे दिव्य उद्याचे दर्शन

वास्तुपूजन Read More »

ततः किम् ?

उमेदीत आरंभ हो जीवनाचा, कुलीनाघरी जन्म झाला ततः किम् ? मिळे गोमटे रूप, बुद्धी कुशाग्र, सुविख्यात शाळेत आला ततः किम् ? शिकूनि कला, शास्त्र, विद्या समग्र, परीक्षेत उच्चांक केला ततः किम्?’ मिळे वैद्यकी, यांत्रिकीला प्रवेश, व्यवस्थापनी, शासनी वा ततः किम् ? क्षणाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी राष्ट्रसेवा घडे ना ।। १ ।। कबड्डीत, खोखोत

ततः किम् ? Read More »