साध्यसूत्र

ज्ञान प्रबोधिनीच्या तिसऱ्या भवितव्यलेखाचे साध्यसूत्र


महाराष्ट्राच्या सहा प्रादेशिक विभागांमध्ये ज्ञान प्रबोधिनीची मनुष्यघडणीची केंद्रे आस्थापनेसह सुस्थिर करणे आणि भारताच्या सहा राज्यांमध्ये विस्तार केंद्रे स्थापन करणे.

साध्यसूत्राचे स्पष्टीकरण

१. हा विस्तार करताना समावेशकता (inclusion), नवोन्मेषता (innovation), सेतुबंधन (integration) आणि प्रभाव (impact)
ही मार्गदर्शक तत्त्वे असतील.

२. मनुष्यघडणीचे केंद्र म्हणजे क्षमता आणि कौशल्यविकसनाच्या बरोबरीने वृत्तिघडण आणि प्रेरणाजागरण करणारे व त्यातून कर्तृत्व आणि नेतृत्व विकसित करणारे केंद्र.

३. विस्तार केंद्र म्हणजे स्थानिक संयोजक व कार्यकर्त्यांच्या गटातर्फे प्रबोधिनीचे अनौपचारिक पूरक शिक्षणाचे उपक्रम, युवक-युवतींचे संघटन, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम केले जातात असे केंद्र.

४. समावेशकता (Inclusion) – सर्व जाति धर्मांचे तसेच आर्थिक व रहिवासाचे समाजगट आणि सर्व वयोगटांमधील स्त्री-पुरुषांसाठी विस्तार करणे.

५. नवोन्मेषता (Innovation) – सर्वांमधील शैक्षणिक बुद्धिमत्तेच्या (academic intelligence) पलीकडच्या बुद्धिमत्तेच्या व व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंमधील उच्च क्षमतांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि समाजपरिवर्तनासाठी त्यांना प्रेरित करणे.

६. सेतुबंधन (Integration) – व्यक्ती, काम, तत्कालीन उद्दिष्ट, उपक्रम या सर्वांमधील वैविध्य समजून घेत, जपत, त्याचा आदर करणे. मुळात एकच असलेल्या समान राष्ट्रीयत्वाची आठवण देणे राष्ट्र घडणीच्या समान ध्येयासाठी संवाद साधत, समन्वय करत, संघटित काम करणे

७. प्रभाव (Impact) – सध्याच्या आणि नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे कार्य सुस्थिर होऊन सदस्यांचे वैयक्तिक व सामूहिक कर्तृत्व आणि नेतृत्व समाजाला आश्वासक, अभिमानास्पद तसेच स्वीकारार्ह वाटणे