राष्ट्रवाद अभ्यास मंडळ

ज्ञान प्रबोधिनीमध्ये १९८८-१९९३ या काळात ‘भारतीय एकात्मता सहचिंतन’ या विषयावर चर्चासत्र झाले. पुढे १९९४ पासून डॉ. स. ह. देशपांडे यांच्या पुढाकराने मा. यशवंतराव लेले यांनी संत्रिकेमध्ये ‘राष्ट्रवाद अभ्यास मंडळ’ या नावाच्या अंतर्गत व्याख्याने व चर्चासत्रे सुरू केली. २००८ पर्यंत राष्ट्रवाद अभ्यास मंडळाची साधारण १३० व्याख्याने झाली, ज्यात प्रामुख्याने ‘राष्ट्र’विषयक विषयांवर बोलले गेले. ही व्याख्याने मुख्यत्वेकरून ज्ञान प्रबोधिनीतील सदस्यांसाठी होती.

पुढे २००९-२०१४ मंडळाचे नाव बदलून ‘जनतंत्र उद्बोधन मंच’ असे नाव झाले. या नावाने अंदाजे ४५ व्याख्याने झाली. ही व्याख्याने बाहेरील व्यक्तींकरिता खुली झाली. या व्याख्यानांमध्ये सामाजिक, राष्ट्रीय, आर्थिक, धार्मिक इ. विषय मांडले गेले. २०१४ ते २०२० या काळात मंचाचे रूपांतर ‘मासिक वैचारिक योजने’त झाले. या योजनेच्या अंतर्गत आंतरविद्याशाखीय विषय मांडले गेले. या योजनेमध्ये ७० व्याख्याने झाली.

अशी विविध टप्प्यांवर जवळपास २५० व्याख्याने संत्रिकेतर्फे झाली. ह्या व्याख्यानांची यादी खाली दिली आहे.