औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २०

२० : गुरुकुल शिक्षणपद्धती ही प्रबोधिनीची अधिकृत शिक्षणपद्धती आहे का ?

उत्तर :- पंचकोशाधारित गुरुकुल हा प्रबोधिनीचा अधिकृत शैक्षणिक प्रयोग आहे. शैक्षणिक प्रयोगाचे शिक्षणपद्धतीत रूपांतर होण्यासाठी अ) लिखित हस्तपुस्तिका, आ) लिखित तत्त्वज्ञान,

इ) तत्त्वज्ञानाच्या आधारे कार्यपद्धतीत स्थलकालानुसार बदल व ई) कार्यपद्धती बदलली तरी परिणामाचे सातत्य या गोष्टी घडायला हव्यात. पुण्यातील प्रशाला, गुरुकुल, क्रीडाकुल हे सर्वच या दृष्टीने अधिकृत शैक्षणिक प्रयोग आहेत. या पैकी अ), आ), इ) बऱ्यापैकी जमले आहेत किंवा जमू शकतात. ई) साठी आवश्यक मूल्यमापन पद्धती अजून कोणत्याच प्रयोगात सापडलेली नाही.