प्रबोधन गीते

नमस्कार देवा……

नमस्कार देवा तुला आमुचा हाकरी आमुची मायभूमी महा॥ध्रु.॥ हिचे रूप चैतन्यशाली दिसावेजगाला कळावी हिची थोरवीस्मरूनी हिच्या त्या कथा अन्‌‍ व्यथाहीहिला न्यायचे रे पुन्हा वैभवीअशा सर्व स्वप्नास सामर्थ्य यावेम्हणूनीच देवा नमस्कार हा॥१॥ जनांचा प्रवाहो इथे चाललेलासदा संस्कृतीच्या मुळापासुनीपिढ्या नांदती भोवती बांधवांच्याअम्ही भिन्न ना त्यांचियापासुनीतयांच्या कळा जाणवाव्या अम्हालातयांच्या सुखाचीच लागो स्पृहा॥२॥ स्फुरो कल्पनाशक्ती अभ्यास यत्नेबनो शुद्ध बुद्धी […]

नमस्कार देवा…… Read More »

ध्येयाचा सुगंध

ध्येयाचा सुगंध लाभला जीवनाआता समर्पणा पूर्ण व्हावी॥ध्रु.॥ क्रोध अहंकार जावो निरसूनविशुद्ध कांचन उजळावे॥१॥ ईर्ष्या-असूयेला नाही येथ स्थाननिर्मळ चैतन्य खळाळत॥२॥ प्रबोधिनीपद्म हिंदुराष्ट्रापायीत्याचा अंश मीही धन्य झालो॥३॥

ध्येयाचा सुगंध Read More »

उपासनेची जोड हवी

इतिहासाची उलटुन पानेभविष्यवेधी कृती हवीअभ्युदयाला परमार्थाच्याउपासनेची जोड हवी ॥ ध्रु.॥ हिंदुत्वाचे पुनर्जागरणविरक्तीतही करुणासिंचनजेत्यांच्या उन्मत्त शिरावरधर्मध्वजेचे हो आरोहणअद्वैताच्या त्या पथिकासमजागृत अर्पण वृत्ति हवी ॥१॥ निःशस्त्रांची उभवुन सेनासत्यव्रताचे मार्ग निर्मिलेअंत्यजपूजा सार्थक मानुनराष्ट्रशक्तिचे मर्म जाणलेत्या द्रष्ट्याचे शब्द उमगण्याअंतःकरणा साद हवी ॥२॥ ध्येय एक, जरि भिन्न साधनेकोटि मनांचे बळ जागविणेसमर्थ वाणी – सहज कृतीतुन‌‘राष्ट्रधर्म‌’ अवघा उलगडणेत्या धर्माचे स्वत्व राखण्यातेज-सत्त्व,

उपासनेची जोड हवी Read More »

ईश्वरचरणी समर्पिता……

पृथ्वी, जल, वायू, तेजाने, आकाशाने भरलेलीशुद्ध घडो काया माझी जी महाभुतांनी व्यापियलीकोण असे मी? मी काया की तिच्यामध्ये स्थित चेतनता?ज्योति असे मी विमल निरागस, ईश्वरचरणी समर्पिता॥ध्रु.॥ प्राण, अपाने, व्यान, उदाने, समानादि पंचप्राणेव्याप्त तनू ही, चेतन राहो, प्राणांविण कुठले जगणे?कोण असे मी? पंचप्राण की? की त्यांच्यावरली सत्ता?॥१॥ शब्द कर्णिचा, स्पर्श त्वचेचा, रूप विषय हा नयनांचारस जिव्हेचा

ईश्वरचरणी समर्पिता…… Read More »

ध्येयप्रवण साधक

ध्येयप्रवण साधक, कार्यपथे साधयमृदु हसन्‌‍, मधु किरन्‌‍, मातरं सदा स्मरन्‌‍ ॥ध्रु.॥ जीवनं न शाश्वतं, वैभवं न हि स्थिरम्‌‍स्वार्थलेपनं विना, सत्कृतं हि तत्‌‍ चिरम्‌‍सरलता स्वजीवने (तान)चिंतने उदात्तता (तान)समाजपोषिता: वयं, कृतज्ञभाव रक्षयन्‌‍ ॥१॥ या च मनसि भावय, या च शिरसि धारयमातृभूमि सा सदा, हृदन्तरे सुपूजयप्रेमरूपिणी पदे (तान)जीवितं समर्पितम्‌‍ (तान)प्रसन्नवृत्ति – निर्भया: वयं भवेम संगता: ॥२॥ पूर्वजकृतं स्मर,

ध्येयप्रवण साधक Read More »

निवेदितांचे स्वप्न जयस्वी……..

चैतन्याचे नवे धुमारेलक्ष-लक्ष हृदयी निर्मूनिवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्या अथक श्रमू॥ध्रु.॥ स्वदेशभाषा, स्वदेशभूषाआग्रह स्वदेशवृत्तीचाप्रखर अस्मिता हिंदुभूमीचीगौरव निज आदर्शांचाकला-शास्त्र अन्‌‍ साहित्यातून सखोल दृष्टी प्राप्त करू॥१॥ ‌‘परिस्थतीला शरण जाऊनीकोण कधी विजयी झाले?एकरूप-एकात्म भारतीहेच एक दैवत अपुले‌’निवेदितांचे शब्दतेज हे जन जागविण्या नित्य स्मरू॥२॥ दुर्बलतेला दूर सारूनीअन्यायाशी झुंज हवीचिंतन-शिक्षण-प्रबोधनातूनवाट सापडे नित्य नवीकितीही असूदे प्रवाह बळकट उलट पोहूनी पार करू॥३॥

निवेदितांचे स्वप्न जयस्वी…….. Read More »

 हाक तुझी परी मनी वसे

तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसेअध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे॥ध्रु.॥ पार्थासम एकाग्र साधना, उग्र विरागाचीच अर्चनासंन्यस्तांच्या संघटनेला सेवेची दृढमूल प्रेरणाशतशतकांचे द्रष्टे चिंतन तुझ्या अंतरी उमलतसे…॥१॥ सप्तसिंधुच्या पार घुमविली तू हिंदूंची विजयघोषणाज्ञानकर्मयोगातुन दिधली वीरत्वासह अपार करुणाजे जे शोषित ते नारायण, पूज्य मानले देव जसे…॥२॥ आज पश्चिमा वित्तबळाने पदोपदी दुनिया झुकवीस्वत्वाला विसरला देश हा गुलामीच

 हाक तुझी परी मनी वसे Read More »

भारतमाता एकच दैवत

भारतामाता एकच दैवत येत्या दिवसांचेइतर देव हे नाममात्र अन्‌‍ केवळ नवसांचेअसे हे शब्द नरेंद्राचे॥ध्रु.॥ युगयुग अपुल्या भरणपोषणाअसुरांपासुन नित्य रक्षणाया मातेचे आशीर्वादच अपुल्या हक्काचे॥१॥ खरे, स्वयंभू, जागृत, पावनदैवत हे तर अपुले आपणनाहि दुरावा, द्वैत न उरले देवाभक्तांचे॥२॥ या देशातील हे नारीनरसन्मानाने जगावेत जरआपसातले विसरू भांडण अनंत शतकांचे॥३॥ कसले उत्सव, कसल्या यात्रादैन्य जोवरी, अन्न न पात्रावेदान्ताशी जोडू

भारतमाता एकच दैवत Read More »

उत्तिष्ठत जाग्रत !

त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजुन सांगतेउत्तिष्ठत जाग्रत ! बंधूंनो उत्तिष्ठत जाग्रत !॥ध्रु.॥ ऐन यौवनी मदन दाहुनी जे प्रलयंकर झालेवेदान्ताच्या गूढ गुंजनी जे नवशंकर झालेहिंदुधर्म अन्‌‍ हिंदुदर्शने जगात गाजविलीमानवमात्रा बंधुत्वाची साद जये घातलीअसुन विरागी नि:संगाचे जे स्वामी होत॥1॥ अखिल विलासांसह नत होती यक्षभूमि पश्चिमामनी परंतु मायभूमितिल आर्तांची वेदनाआणि भुकेल्या श्वानास्तवही मोक्षाची हेळणाहेच डोळुले शिणले होउनि बुद्धाची

उत्तिष्ठत जाग्रत ! Read More »

वंदन वंदन त्रिवार वंदन

हिंदुजातिची विजयपताका तुम्ही आणिली गंगोत्रीहुनवेदवती या यात्रेमधले पथिक तुम्हाला करतो वंदनवंदन! वंदन! त्रिवार वंदन!!॥ध्रु.॥ आक्रमकांनी धर्म बुडविला, होऊन दीप्ति मार्ग दाविलादेव मस्तकी धारण करिता, कर्तृत्वाचा वन्हि फुललामहाराष्ट्र धर्माचा दिधला शिवरायांना मंत्र नवातुमच्या स्फूततून उमलले, आनंदाचे मंगल भुवन॥१॥ निराश निद्रित विमनस्क मनी, विझल्या ज्योति पुन्हा पेटवुनिस्वधर्म सांगुन, प्रकाश दावुन, भय नाशियले तांडव बनुनिसरस्वतीचे तुम्ही उपासक, दयानंद

वंदन वंदन त्रिवार वंदन Read More »