(सिंहगडावर दि. ५/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण)
आपल्याला समाजाचे जीवन घडवणारे जीवन जगायचे आहे. त्याची पहिली पायरी म्हणून पहिली प्रतिज्ञा. मी जे काही काम करतो आहे ते देशासाठीच असे स्वतःला फसवायचे नाही. समाजाचे जीवन घडवणारे समाजाला उत्तरदायी पाहिजेत. ते शिकण्यासाठी प्रबोधिनीला उत्तरदायी राहायला शिकवायचे
आज नव्याने चिंतन करायला हवे आहे. नव्याने काम करायला हवे आहे. यासाठी लागणारे सगळे गुण प्रबोधिनीच्या कामात आहेत. प्रबोधिनीचे बनून काम करायचे म्हणजे सृजनशील कार्यकर्ता व्हायचे.
आपल्या प्रतिभेतून नवे काम उभे करायचे. नवनवोन्मेषशालिनी प्रतिभायुक्त काम हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे. आपले कामही तसेच झाले पाहिजे.
इतिहासाचा अभ्यास पाहिजे. जुन्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. काय करायचे आणि काय नाही हे ठरवणारी विवेकबुद्धी हवी. नवे नवे वैज्ञानिक शोध वापरले पाहिजेत. आपण लावलेही पाहिजेत. पण आपल्या सगळ्या कामाचे अधिष्ठान प्रबोधिनीच असली पाहिजे.
पहिली प्रतिज्ञा जर Assert yourself in Hindutva साठी घ्यायची तर दुसरी प्रतिज्ञा Assert yourself as Prabodhak यासाठी घ्यायची. आपल्या कामाचे निवेदन प्रबोधिनीत झाले पाहिजे. आर्यसमाज, हिंदू महासभा, संघ यांना वाट पुसत जायचे. पण आपल्याला नवीन वाट निर्माण करायची आहे. जुन्याची पुनरावृत्ती नाही.
प्रबोधिनीला जुन्या अनुभवावर नवीन रचायचे आहे म्हणूनच प्रबोधिनीशी समरस होण्यासाठी दुसरी प्रतिज्ञा घ्यायची.