१ : दि. १५ जुलैच्या सकाळमध्ये ‘दि. १५जुलै ला ज्ञान प्रबोधिनीचा प्रारंभ झाला’ असे छापून आले आहे. आपण दि. ८ ऑगस्ट हा प्रबोधिनीचा वर्धापन दिन मानतो. तारखांमध्ये असा फरक का ?
उत्तर :- : दि. १५ जुलै १९६२ ला पुण्यातील शिक्षण-तज्ञांची सभा भरवून त्या सभेत कै. आप्पांनी ज्ञान प्रबोधिनी स्थापन करण्याचा ठराव संमत करून घेतला. कायदेशीर दृष्ट्या त्या दिवशी ज्ञान प्रबोधिनी या संस्थेचा प्रारंभ झाला. दि. ८ ऑगस्ट १९६२ ला प्रबोधिनीतील अध्यापनाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष काम ज्या दिवशी सुरू झाले तो दिवस आपण आपल्या कामाचा वर्धापन-दिन मानतो.