शके १९३३ ते १९३६ (मार्च २०११ ते फेब्रुवारी २०१५) या पाच वर्षांमध्ये दर महिन्याला त्या आधीच्या महिन्याभरात एकेका सदस्याशी किंवा छोट्या गटांमध्ये झालेल्या संवादापैकी तीन-चार प्रश्नोत्तरे लेखी स्वरूपात साधारण ३० सदस्यांमध्ये वितरित करत होतो. अशा २२५ प्रश्नोत्तरांपैकी १०५ प्रश्नोत्तरे या पुस्तिकेत अधिक वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
या प्रश्नांची निवड व वर्गीकरण करण्यामध्ये प्रा. अभयाताई टोळ, प्रा. महेंद्र सेठिया, श्री. नितिष नरखेडकर, कु. प्रतिमा वामन, कु. मीरा शेटे यांचे साहाय्य झाले.
प्रश्नोत्तरे पुस्तिका-रूपात छापताना आशय, भाषा व औचित्य याचा विचार करून त्यांचे काही पुनर्लेखन करावे लागले. त्यासंबंधी बहुमोल सूचना प्रा. शैलजाताई देशमुख व मा. यशवंतराव लेले यांनी केल्या.
गिरीश श्री. बापट