१० : एखाद्या केंद्राचे किंवा विभागाचे काम कसे झाले किंवा कसे होते आहे हे ठरवण्याचे निकष काय ?
उत्तर :- : सर्वप्रथम प्रत्येक केंद्राचे किंवा विभागाचे प्रकट केलेले उद्देश व उपक्रम परस्पर सुसंगत आहेत की नाही या निकषांशिवाय तिसरा एक निकष आहे. प्रबोधिनीच्या प्रत्येक केंद्राने किंवा आहेत की नाहीत हे पाहिले पाहिजे. उपक्रमांमुळे उद्देश साध्य होत आहेत किंवा नाहीत हे देखील विभागाने प्रकट केलेला नसला तरी सर्वांचा एक समान उद्देश अध्याहृत आहे. तो म्हणजे तिथले सदस्य किती प्रमाणात घडले ?
विभाग किंवा केंद्राचा सदस्य, प्रभागाचा प्रबोधक व प्रबोधिनीचा कार्यकर्ता असे घडणीचे तीन टप्पे आपण कल्पिले आहेत. सदस्याचा प्रबोधक होणे व प्रबोधकाचा कार्यकर्ता होणे या प्रगतीपर प्रक्रियेमध्ये किमान तीन गोष्टी व्हाव्या लागतात १) एखाद्या सदस्याला वैयक्तिक व सामूहिक उपासनेची गोडी लागली का ? व उपासना हा त्याचा स्वभाव बनला का ? २) उपासना करणारा सदस्य कामासाठी आवश्यक असा आपल्या कार्यविषयाचा आणि देशस्थितीचा अभ्यास करायला लागला का ? व हा अभ्यास स्वतःहून चालू ठेवतो का ? ३) उपासक आणि अभ्यासक सदस्य व्यक्तिगत व आपल्या गटाचे नियमितपणे आत्मपरीक्षण करून आपल्यात आवश्यक बदल घडवून आणू शकतो का ? आवश्यकतेप्रमाणे बदलण्याइतकी लवचिकता ही त्याची वृत्ती बनली का ? या तीन प्रश्नांची होकारार्थक उत्तरे देणारे सदस्य जिथे जेवढे अधिक तेवढे तिथले काम चांगले झाले.