औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २३

२३ : तुम्ही व विवेकराव पोंक्षे बऱ्याच वेळा ‘प्रबोधिनीची शाळा special school नाही, ती school with a purpose आहे’, असे म्हणता. या दोन्ही इंग्रजी वर्णनांचा नेमका अर्थ काय ?

उत्तर :- २३ : ज्ञान प्रबोधिनी खंड २ मध्ये पृष्ठ २५ वर “Jnana Prabodhini is not a static body. It is a new experiment in purpose-oriented education” असे म्हटले आहे. म्हणजे प्रबोधिनीची एखादी शाळाच नाही तर सर्व प्रबोधिनीच हेतुपूर्ण किंवा उद्दिष्टप्रधान (purpose-oriented) शिक्षणाचा अभिनव प्रयोग आहे

खंड २च्च्याच पृष्ठ २९८ वर “Jnana Prabodhini is not a copy of anything that is existing in foreign countries. Whereas schools in the (United) States, France and other countries are course-oriented, we, at Jnana Prabodhini say that…….. it is a school with a purpose” असे म्हटले आहे. ‘course-oriented’ म्हणजे अभ्यासक्रमप्रधान. त्यालाच मी special school (उद्दिष्ट किंवा हेतूऐवजी अभ्यासक्रमाला म्हणजेच त्याच्या अवघडपणाला / वेगळेपणाला / अद्ययावतपणाला महत्त्व देणारी) असे म्हणतो. विवेकराव पोंक्षेही याच अर्थाने म्हणत असावेत.

खंड-२ च्याच पृष्ठ ४१ वर ‘Whether it is formal education through academic classes, or informal education through industrial activity or social education through agricultural service to people…’ असे म्हटले आहे. म्हणजेच शाळा, उद्योग, कृषी-सेवा या सगळ्या शिक्षणाच्याच जागा आहेत. School म्हणजे शाळा हा भारतातला रूढ अर्थ आहे. School म्हणजे कोणतीही शिकण्याची जागा हा इतर अनेक देशांमधला रूढ अर्थ आहे. ज्ञान प्रबोधिनी ही व्यापक (अनेक देशांना मान्य अशा) अर्थाने School आहे. या ‘School’ चा ‘purpose’ खंड-२च्या पृष्ठ २५ वर म्हटल्याप्रमाणे ‘serve the people and change the country for the better’ असा आहे. म्हणजेच प्रबोधिनी आणि प्रबोधिनीच्या कोणत्याही विद्यालयाचा हेतू लोकांची सेवा आणि ‘रूप पालटू देशाचे’ हाच आहे. हेतू किंवा उद्दिष्ट मुख्य. त्यासाठी त्या त्या वेळी त्या त्या गटाला उपयुक्त होईल तो अभ्यासक्रम वापरायचा असतो. अभ्यासक्रम केवळ साधन आहे. म्हणून प्रबोधिनी special school नाही, तर ‘school with a purpose’ आहे.