नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत.
कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी सुरक्षा, स्थैर्य आणि कायदा व सुव्यवस्था असणे फार महत्वाचे असते. आणि हे आंतरिक नियंत्रण सांभाळण्यासाठी पोलीस सेवा सदैव तत्पर आणि कटीबद्द असते.
आज आपण अनेकदा पोलिसांवर राग व्यक्त करतो, बदलत्या काळासोबत सेवेत बदल होत नाही म्हणून टीका करतो आणि काही निवडक लोकांमुळे संपूर्ण रचनेवर भ्रष्टाचारी असल्याचे ताशेरे ओढतो. पण या सगळ्या टीका सोसूनही आपले हे पोलीस कर्मचारी दिवसरात्र, कमी सुविधांमध्ये प्राण पणाला लावून कायदा व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतात. २६ /११ सारख्या बिकट परिस्थितीत किंवा दंगलींच्या काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावतात . पण अनेकदा या सेवेचे कार्य आणि शौर्य हे लोकांसमोर येतच नाही.
आपल्या या लेखमालिकेतील पुढील लेख याच पोलीस सेवेतील एका अधिकाऱ्याच्या प्रवासावर आधारित आहे. ते विद्यार्थी म्हणजे स्पर्धा परीक्षा केंद्र २००७ तुकडी आणि UPSC २०१० च्या तुकडीचे आणि सध्या राजस्थान येथे कार्यरत असणारे IPS श्री. परीस देशमुख.
श्री. परीस यांनी आपल्या १५ + वर्षाचा काळात पोलीस खात्यात अनेक महत्वाच्या, कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आपल्या तुकडीचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे तसेच अंतरराष्ट्रीय पातळीवर नेमबाजी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे. याही पलीकडे जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उत्तम सुविधा मिळाव्या , नागरिकांना त्यांच्या अडचणी मांडता याव्यात यासाठी उत्तम रचना उभी केली आहे. तसेच कार्य बजावताना शहिद झालेल्या सहकाऱ्यांच्या घरच्यांच्या हाकेसाठीही तत्पर प्रतिसाद दिला आहे.
त्यांच्या याच संवेदनशील नेतृत्वामुळे त्यांचे जय्यत स्वागत केले जाते आणि बदली झाल्यावर भावनिक निरोपही दिला जातो .
त्यांचा हा प्रवास, त्यामधील कार्य, अडचणी, त्याग आपण सर्वांनी नक्की वाचावेत असे आवाहन आणि शुभेच्छा!!
लेख वाचण्यासाठी: क्लिक करा
Namaskar,
On the occasion of the completion of Three decades (Tridashakpurti) of the Jnana Prabodhini Competitive Examination Centre, we are preparing a Good Practices Document highlighting our officers and students who are doing exemplary work in various fields.
For any nation’s progress, security, stability, and law & order are essential—and the police service plays a vital role in ensuring this. While the police are often criticized or judged due to a few individuals, they continue to work tirelessly, often with limited resources, risking their lives to maintain order. Be it during 26/11 attack or riots like situation, their courage and service often go unrecognized.
This article features alumnus of JPCEC 2007 Batch, Shri. Paris Deshmukh – a 2010 batch IPS officer, currently serving in Rajasthan. With over 15 years of service, he has handled key responsibilities, represented department at the national level, and participated in international shooting training. He has also worked towards better facilities for police personnel, created systems for citizen engagement, and supported families of martyred colleagues. His empathetic leadership earns him both warm welcomes and heartfelt farewells.
We suggest you to read his experiences, his journey and his contributions in this sector.
To read full article: click here
