सर्व राष्टीय नेते देशप्रश्नांपेक्षा – शेळीच्या प्रश्नांना महत्त्व देणारे गांधीजी विलक्षणच दिसतात, अशा नजरेने एकमेकांकडे बघत हताश होऊन गांधीजींची वाट पाहू लागतात.
महात्मा गांधींच्या जीवनावरील ‘गांधी’ या चित्रपटात एक दृश्य आहे. गांधीजींच्या आश्रमात नेहरू, पटेल, राजाजी, आझाद अशी सर्व पुढारी मंडळी महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी एकत्र जमली आहेत. बोलणी सुरू होणार तेवढ्यात आश्रमातील एक लहान मुलगी गांधीजींकडे तिच्या शेळीच्या प्रकृतीबद्दल सांगायला येते. सर्व पुढारी मंडळींना ‘आलोच’ असे सांगून गांधीजी त्या मुलीबरोबर शेळीच्या समाचारासाठी जातात. आणि सर्व राष्ट्रीय नेते देशप्रश्नांपेक्षा शेळीच्या प्रश्नांना महत्त्व देणारे गांधीजी विलक्षणच दिसतात, अशा नजरेने एकमेकांकडे बघत हताश होऊन गांधीजींची वाट पाहू लागतात. गांधीजींनी देशप्रश्नांना कमी महत्त्व दिले? की शेळीच्या प्रश्नांना फार महत्त्व दिले? प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकेल. चित्रपटातल्या या प्रसंगाची आठवण होण्यासारखी परिस्थिती गेल्या महिन्यात पुण्यात निर्माण झाली.
आपल्या सहनिवास-प्रमुखांना कौटुंबिक अडचणींमुळे अचानक गावी जावे लागले. सहनिवासातला दिनक्रम अंगवळणी पडल्यामुळे आठमाही परीक्षा चालू असताना देखील प्रमुखांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी सर्व कार्यक्रम पार पाडत होते. एक-दोन दिवस दुरूनच चौकशी करत होतो. विद्यार्थीच मला धीर देत होते ‘आम्ही सर्व बघतो. तुम्ही काळजी करू नका’ त्यानंतर रात्री झोपण्यासाठी एकेका कार्यकर्त्याला पाठवायला सुरुवात केली. शेवटी चार दिवसांनंतर एका अध्यापकांना सहनिवास-प्रमुख येईपर्यंत सहनिवासाची जबाबदारी घ्यायला सांगितली. असा प्रसंग ही जशी विद्यार्थ्यांना शिकायची संधी तशीच कार्यकर्त्यांना पण शिकायची संधी असते. विद्यार्थ्यांनी तर जबाबदारी घेतलीच. परंतु ज्या कार्यकर्त्यांना जेवढी जबाबदारी दिली त्यांनीही ती पाळली. सहनिवास-प्रमुखाचे काम, म्हटले तर शैक्षणिक आहे म्हटले तर व्यवस्थापकीय आहे. उद्योग, ग्रामविकसन, संघटन प्रभागात काम करणाऱ्या एकेकाने आणि नंतर एका अध्यापिकेनेही सहनिवासातले व्यवस्थापकीय काम केले.
सर्व कामे सारख्या महत्त्वाची मानणे हा एक दुर्मिळ गुण आहे. ‘किरकोळ’ कामे करायची लाज वाटणे आणि ‘महत्त्वाची’ कामे करण्यात सन्मान वाटणे यात काहीतरी घोटाळा आहे.
या सर्वांना सहनिवासातील काही जबाबदारी एकेक दिवसाकरिता घेण्यास सांगताना मला सतत सुरुवातीला दिलेला प्रसंग आठवत होता. सर्वांनीच आपापली ‘महत्त्वाची’ कामे बाजूला ठेवून हे किरकोळ ‘व्यवस्थापकीय’ काम आनंदाने केले. बऱ्याच वेळा असे घडताना दिसत नाही. प्रत्येकाचे काम इतके ‘महत्त्वाचे’ असते की ‘किरकोळ’ कामे करण्यात वेळ घालवणे त्यांना आवडत नाही. आपण सर्वच कामे महत्त्वाची मानून करू शकतो का? सर्व कामे सारख्या महत्त्वाची मानणे हा एक दुर्मिळ गुण आहे. ‘किरकोळ’ कामे करायची लाज वाटणे आणि ‘महत्त्वाची’ कामे करण्यात सन्मान वाटणे यात काहीतरी घोटाळा आहे. ‘कारकुनी’ कामे, ‘हमाली’ कामे, ‘हेलपाट्यांची’ कामे, ‘संस्थात्मक’ कामे, ‘विकासाची’ कामे, ‘संघटनाची’ कामे, ‘मनुष्यघडणीची’ कामे, ‘संपत्ती निर्माण करण्याची’ कामे, ‘प्रभावी’ कामे, ‘झंझावाती’ कामे, ‘देशव्यापी’ कामे, ‘क्रिएटिव्ह’ कामे अशी कामांची जाति-व्यवस्था काही काहीजणांच्या मनात असते. परिस्थितीनुसार सर्व कामे करता येणे, सहजपणे करता येणे, कौशल्याने करता येणे म्हणजे आपली गुणवत्तावाढ झाली. व्यक्तीच्या गुणवत्तावाढीचा संघटनेला उपयोग व्हायचा असेल तर कोणत्याही एक विशिष्ट कामातील आपले कौशल्य वाढवताना, इतर सर्व कामे करण्याची आपल्या मनाची तयारी प्रयत्नपूर्वक टिकवून धरावी लागते. ही मनाची लवचिकता आणि कौशल्ये वाढणे एकत्र गेले पाहिजे.
विविध प्रकारची कामे करणाऱ्या सर्व व्यक्तीकडे सारख्या आदराने आणि आपुलकीने बघता यावे लागते
सर्व कामांकडे सारख्याच आदराने आणि आपुलकीने बघता यायचे असेल तर विविध प्रकारची कामे करणाऱ्या सर्व व्यक्तींकडे सारख्या आदराने आणि आपुलकीने बघता यावे लागते. प्रबोधिनीच्या एका कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यासाठी मी एका मोठ्या संस्थेच्या प्रमुखांकडे गेलो होतो. त्यांच्या पंचतारांकित कार्यालयात प्रवेश केल्यावर ते खुर्चीत बसून आणि मी टेबलासमोर उभा राहून आमचा संवाद झाला. त्यांनी अध्यक्ष म्हणून येण्याचे मान्य केले आणि दिवस, वेळ डायरीत नोंदवून घेतली. शेवटी मला म्हणाले, ‘सांगा डॉ. बापटांना मी नक्की येईन’. गेल्या गेल्या मी त्यांना माझे नाव सांगितले होते. ते त्यांनी ऐकलेच नव्हते. मी म्हटले ‘मीच बापट, तुम्हाला माझे कार्ड मी दिले आहे आणि आल्यावर माझे नावही सांगितले होते’. ते भले गृहस्थ होते. लगेच म्हणाले, ‘माफ करा, मला स्टाफमधले कोणीतरी वाटलात, त्यामुळे मी कार्डही पाहिले नाही. तुम्ही काय बोलत होता तिकडेही लक्ष दिले नाही’. प्रबोधिनीत कार्यक्रमाला आल्यावर हा प्रसंग त्यांनी कार्यक्रमातही सांगितला. हा सगळा घोटाळा माझ्या साध्या कपड्युांळे झाला. हे दुसऱ्या संस्थेत जसे घडले तसे अनेकदा प्रबोधिनीतही घडते. गोऱ्या कातडीचा पाहुणा मोठा, सुटातला पाहुणा मोठा, मोटारीतून येणारा पाहुणा मोठा, मोठी देणगी देणारा पाहुणा मोठा असे नकळत होते. असा पाहुणा आला की आपण चपापून बसतो. लगबग वाढते. स्वागताची धावपळ सुरू होते. पायी येणारा, साध्या वेशातला, मोठ्या वास्तूला बुजलेला, विभागांच्या वैविध्याने गोंधळलेला असा पाहुणा आला तर बऱ्याच वेळा त्याची विचारपूस व्हायलाही वेळ लागतो. काहीजण जाणीवपूर्वक अशा लोकांचीही दखल अगत्याने घेतात. पण त्यांच्या बाबतीतही झकपक पाहुणा
आला की ‘का रे भुललासि वरलिया रंगा’ असे होतेच. अशा पाहुण्यांना अधिक अगत्याचे स्वागत मिळते. ‘चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा’ असे मानून, आपल्याकडे येणारे सर्वच जण आपल्या बरोबरीचे आहेत हे ओळखून, आपण त्यांच्याशी आस्थेने वागतो आहोत असे खरे व्हायला पाहिजे. असे झाले तर सगळ्या कामांकडे – देशप्रश्नांकडे आणि शेळीच्या प्रश्नांकडे – आपण बरोबरीच्या नजरेने बघू शकू. आपल्या गुणवत्तावाढी चा आपल्या विभागाला आणि प्रबोधिनीला लाभ व्हायचा असेल तर कौशल्यांची आणि तज्ज्ञतेची उंची वाढवताना समानतेचा पाया रुंद व्हायला पाहिजे. म्हणजेच ‘किरकोळ’ कामे आणि ‘किरकोळ’ माणसे ‘आपल्या’ इतकीच आणि ‘आपल्या’ कामाइतकीच ‘महत्त्वाची’ आहेत याचे भान राआला की ‘का रे भुललासि वरलिया रंगा’ असे होतेच. अशा पाहुण्यांना अधिक अगत्याचे स्वागत मिळते. ‘चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा’ असे मानून, आपल्याकडे येणारे सर्वच जण आपल्या बरोबरीचे आहेत हे ओळखून, आपण त्यांच्याशी आस्थेने वागतो आहोत असे खरे व्हायला पाहिजे. असे झाले तर सगळ्या कामांकडे – देशप्रश्नांकडे आणि शेळीच्या प्रश्नांकडे आपण बरोबरीच्या नजरेने बघू शकू. आपल्या गुणवत्तावाढी चा आपल्या विभागाला आणि प्रबोधिनीला लाभ व्हायचा असेल तर कौशल्यांची आणि तज्ज्ञतेची उंची वाढवताना समानतेचा पाया रुंद व्हायला पाहिजे. म्हणजेच ‘किरकोळ’ कामे आणि ‘किरकोळ’ माणसे ‘आपल्या’ इतकीच आणि ‘आपल्या’ कामाइतकीच ‘महत्त्वाची’ आहेत याचे भान राहिले पाहिजे.
‘किरकोळ’ काम आणि किरकोळ’ माणसे ‘आपल्या’ इतकीच आणि ‘आपल्या’ कामा इतकीच ‘महत्त्वाची’ आहेत.