प्रस्तावना
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, योगी अरविंद अशा थोर नेत्यांनी गीतेच्या अर्थाचे विवरण आपापल्या विचारानुसार केले. त्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी समाजाला जागृत करणे हा सर्वांचा एकच हेतू होता. गीतेचा संदेश सांगून स्वातंत्र्य चळवळीला प्रवृत्त करणे हा जागृतीचा एक प्रकार होता. स्वातंत्र्य मिळवून देशातल्या व्यक्तीने कोणत्या ध्येयासाठी जगावे या विचाराला प्रवृत्त करणे हा […]