स्थितिशील देशभक्ती
ध्वजवंदनाला उपस्थित राहणे, शालेय परिपाठ व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे, राष्ट्रीय दिवशी ध्वज लावणे, देशभक्तीपर गीते म्हणणे, पाठ्यपुस्तकांमधील प्रतिज्ञेचा उच्चार करणे, विशिष्ट प्रसंगी सभा-संमेलनांमधून सामूहिक प्रतिज्ञा म्हणणे, मातृभूमिपूजनाचे कौटुंबिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम करणे, देशातील अभागी लोकांसाठी, सैनिकांसाठी, जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण वाचवणारांसाठी प्रतीकात्मक पाठिंबा किंवा अभिनंदन दर्शवणारी कृती करणे, आपत्तीकाळात गरजूंना आर्थिक किंवा वस्तुरूप मदत करणे, देशाच्या वतीने विविध क्षेत्रांत पराक्रम किंवा विक्रम करणारांविषयीचा आनंद व अभिमान व्यक्त करणे, या सगळ्या कृतींमधून मनात देशभक्ती रुजत जाते व वाढत जाते [cite: 21]. आपण देशाचे घटक आहोत ही भावना जागी राहते [cite: 21].
अशी भावना मनात असूनही अनेक जण दैनंदिन जीवनात व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा स्नेही मंडळींच्या कामांमध्ये व कार्यक्रमांमध्ये गुंतलेले असतात [cite: 21]. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, परकीय आक्रमणाच्या वेळी त्यांची देशभक्ती जागी होते [cite: 21]. इतर वेळी ती मनात सुप्त किंवा झोपलेली राहते [cite: 21]. अशी देशभक्ती म्हणजे स्थितिशील देशभक्ती [cite: 21].
शेती, उद्योग, व्यापारामध्ये उत्तम कामगिरी करणे, नवीन संशोधन करणे, उत्तम प्रशासन किंवा व्यवस्थापन करणे या सगळ्यामुळे देशाची समृद्धी वाढते, देशात सुव्यवस्था राहते [cite: 21]. असे काम मी करतो किंवा करते म्हणजे देशभक्तीच आहे अशी अनेकांची ठाम समजूत असते [cite: 21]. ही स्थितिशील देशभक्ती [cite: 21, 22]. यातून देशाचा आर्थिक विकास होईल, व्यवस्थांमध्ये सुधारणा होईल, व्यक्तींची त्यांच्या कारकीर्दीत प्रगती होईल [cite: 22]. पण व्यक्तीची देशाविषयीची भक्ती वाढत, मानवतेविषयी, चराचर सृष्टीविषयीची, परमेश्वराविषयीची भक्ती होईलच असे नाही [cite: 22]. म्हणून तिला स्थितिशील देशभक्ती म्हणायचे [cite: 22]. पहिली पायरी म्हणून आवश्यक पण पुरेशी नाही [cite: 22].
गतिशील मातृभूमिपूजन
आपल्या मनातील देशभक्ती इतरांच्या मनात रुजवणे, म्हणजे गतिशील देशभक्ती [cite: 22]. आपल्या संपर्कात नवीन नवीन आणि अधिकाधिक लोक यावेत, त्यांच्याही मनात देशभक्ती रुजावी यासाठी प्रयत्न करणे म्हणजे गतिशील देशभक्ती [cite: 22]. इतरांच्या मनातही देशाविषयीच्या भक्तीबरोबर, मानवतेविषयीची, सृष्टीविषयीची, परमेश्वराविषयीची भक्ती वाढावी यासाठी प्रयत्न करणे म्हणजे गतिशील देशभक्तीचे रूपांतर गतिशील मातृभूमिपूजनामध्ये होणे [cite: 22]. इतरांसाठी असे काम करताना ते स्वावलंबी व्हावेत, स्वाभिमानी व्हावेत, पराक्रमी व्हावेत, संघटित व्हावेत, लोकसेवक व्हावेत असे प्रयत्न करता करता ते आधी स्थितिशील देशभक्त व मग गतिशील देशभक्त होतात [cite: 22]. एकेका व्यक्तीसाठी एकेका टप्प्यावर जितका काळ थांबावे लागेल तितका काळ थांबण्याची चिकाटी मातृभूमिपूजन करताना आवश्यक असते [cite: 22]. इतरांसाठी थांबण्यातून आपण स्वतः मनाने देशाशी एकरूप होत जातो [cite: 22]. तीच मातृभूमिपूजनातील गतिशीलता [cite: 22].
प्रबोधकांचे स्वाध्याय-प्रवचन
विभागातील नवीन सदस्यापासून संचालकांपर्यंत सर्वजण प्रबोधिनी या संघटनेतील प्रबोधक आहेत [cite: 22]. आधी स्थितिशील देशभक्ती करणे, मग गतिशील मातृभूमिपूजन करणे, यासाठी स्वतःचा स्वाध्याय प्रत्येक प्रबोधकाचा नेहमीच चालू राहिला पाहिजे [cite: 22]. स्वाध्याय चांगला होण्यासाठी प्रवचनही करावे लागते [cite: 22]. स्वाध्याय म्हणजे स्वतः शिकणे [cite: 22]. प्रवचन म्हणजे आपल्याला येते ते इतरांना शिकवणे [cite: 22]. नवीन सदस्याला जास्ती वेळ स्वाध्याय करावा लागतो [cite: 22]. दलावरचे दल-प्रतिनिधी, मार्गदर्शक, प्रतोद, सचिव, संचालक यांना क्रमशः अधिकाधिक वेळ प्रवचनासाठी द्यावा लागतो [cite: 22]. पण स्वाध्याय कोणाचाच कधीच सुटता कामा नये [cite: 22]. प्रवचन करतानाही त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगाव्या लागतात [cite: 22]. पण आपण जे सांगतो, ते आपल्या वागण्यात मात्र असले पाहिजे, आणि आपण तसे वागतो हे आपण न सांगता इतरांना दिसले पाहिजे [cite: 22, 23]. आपली स्थितिशील देशभक्ती, गतिशील मातृभूमिपूजन होण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, त्यालाच संघटना करणे असे म्हणतात [cite: 23].
युवक आणि युवती विभागाची क्रीडादले, विज्ञानदले, अभ्यासिका दले, पद्यगायन दल, गिरिभ्रमण गट, कदाचित भावी काळातील ऑनलाइन दले, आणि संवादिनीचे स्वतःसाठीच्या आणि इतरांसाठीच्या व्यक्तिमत्त्व विकसनाचे व प्रशिक्षणाचे विविध गट, या सगळ्यांचे उद्दिष्ट वरील अर्थाने संघटना करणे हे आहे [cite: 23]. ज्यांना-ज्यांना स्वतः शिकण्याशिवाय आणखी एकाला तरी शिकवायचे आहे त्या सगळ्यांनी आपले स्वाध्याय-प्रवचन संघटनासाठी आहे हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे [cite: 23].
