प्रस्तावना
ज्ञान प्रबोधिनी ही संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना आहे [cite: 3]. या संघटनेचा कणा म्हणजे समर्पित कार्यकर्त्यांची फळी [cite: 3]. ‘समाजात टिकाऊ स्वरूपात चांगले बदल व्हायचे असतील तर त्यासाठी समाजात संघटना झाली पाहिजे [cite: 3]. संघटना व्हायची असेल तर समाजात रचनात्मक काम करणाऱ्या संस्था पाहिजेत व त्या संस्थांचे नियम मनापासून पाळणारे कार्यकर्ते हवेत [cite: 3].’ संस्थेचे व संघटनेचे काम उत्तम होण्यासाठी कार्यकर्त्यांचा भावनिक आणि वैचारिक पाया पक्का झाला पाहिजे [cite: 3]. ज्ञान प्रबोधिनीचे मा. संचालक यासाठी सतत आपले चिंतन सर्व कार्यकर्त्यांसाठी मांडत असतात [cite: 3]. त्यातून प्रबोधकांची प्रबोधिनी समजून घेण्याची क्षमता वाढत जाते [cite: 3].
व्यक्तिविकासापासून राष्ट्रविकासापर्यंतची मांडणी या पुस्तिकेत करण्यात आलेली आहे [cite: 3]. अगदी सुरुवातीच्या दोन चिंतनातून व्रतपालनावर सविस्तर विवेचन करण्यात आलेलं आहे [cite: 3]. व्यक्तिविकासासाठी व्रतपालन किती महत्त्वाचे आहे ते यातून कळते [cite: 3]. ‘मात्र वृत्तीतील बदल सतत सरावाने व इच्छापूर्वक कृती करत राहिल्यानेच होऊ शकतो, यासाठी स्वतःसाठी काही नियम स्वतः ठरवून घेतल्याचा उपयोग होतो [cite: 3]. असे स्वतःच्या बाबतीतले नियम स्वतः ठरवण्याला व्रत घेणे असे म्हणतात [cite: 3]. आणि ठरवलेल्या नियमांप्रमाणे न कंटाळता वागण्याला व्रत पाळणे असे म्हणतात’ [cite: 3]. प्रबोधिनीची दुसरी प्रतिज्ञा घेतली म्हणजे आपण सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची आठ व्रतेच पाळायची असतात [cite: 3].
पुढील दोन चिंतनात संचालकानी कार्यप्रबोधनाचे विवेचन केले आहे [cite: 3]. कार्यप्रबोधन म्हणजे नेमके काय हे सांगताना मा. संचालक लिहितात, “अनेक क्षेत्रांमध्ये, प्रबोधिनीचे कार्यकर्ते स्वतः काम करत असतात, इतरांना प्रशिक्षण देत असतात [cite: 3]. प्रबोधिनीचे काम पाहून समाजातले इतर अनेक जण परस्पर त्याची आवृत्ती करत असतात [cite: 3]. अशी सर्व कामे करणे, करविणे, आणि आपल्या कामाची परस्पर आवृत्ती करणाऱ्यांना अनुमोदन व प्रोत्साहन देणे म्हणजे कार्यप्रबोधन” [cite: 3].
या सर्वात मला भावलेले चिंतन म्हणजे गतिशील मातृभूमिपूजन [cite: 3]. सुरुवातीला स्थितिशील देशभक्तीचे विवेचन केलेले आहे आणि त्यानंतर गतिशील मातृभूमिपूजन [cite: 3]. आपल्या मनातील देशभक्ती इतरांच्या मनात रुजवणे, म्हणजे गतिशील देशभक्ती [cite: 3]. यासाठी प्रयत्न करत राहणे, संपर्क करत राहणे हे महत्त्वाचे [cite: 3].
१९६२ ला प्रबोधिनीची स्थापना झाली [cite: 3]. प्रबोधिनी ही विस्तारक्षम असली पाहिजे, प्रबोधिनीचे स्वरूप अखिल भारतीय असले पाहिजे, असा सर्व प्रबोधिनीच्या विस्ताराच्या प्रयत्नांचा आढावा ‘विस्तारक्षम प्रबोधिनी’ या शीर्षकाखाली असणाऱ्या दोन चिंतनात घेतला आहे [cite: 3, 4]. शिक्षण, संशोधन, उद्योग आणि ग्रामविकसन या चार दिशांनी काम केले तर देशाचे रूप पालटता येईल असे प्रबोधिनातील त्या वेळच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटत होते [cite: 4]. एकूणच वेगवेगळ्या वेळी केलेले प्रयत्न आपल्याला या दोन चिंतनातून दिसतात [cite: 4].
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी आपल्या देशाच्या पुढील सहा समस्यांवर काम करावे लागेल असे म्हटले आहे [cite: 4]. यातील पहिल्या पाच समस्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, राजकीय, संरक्षणात्मक विकासाच्या होत्या [cite: 4]. तर सहावी समस्या इतर समस्यांना लागणारे मनुष्यबळ उभे करण्याची आहे [cite: 4]. म्हणूनच प्रबोधिनीत संघटना बांधणीला खूप महत्त्व दिले जाते [cite: 4]. मा. संचालकांनी अतिशय सविस्तरपणे संघटना या विषयावर तीन चिंतने लिहिलेली आहेत [cite: 4]. ज्ञान प्रबोधिनी ही सक्षम संघटना व्हायची असेल तर प्रबोधिनीची केंद्रे ही प्रेरणापीठ बनली पाहिजेत [cite: 4]. इतर संघटनांची केंद्रे आपले प्रेरणास्रोत असून चालणार नाहीत [cite: 4].
एका गावाचा विकास म्हणजे ग्रामविकास तर गावांच्या समूहाचा विकास म्हणजे प्रदेशविकसन [cite: 4]. ज्ञान प्रबोधिनीचे प्रदेशविकसनाचे तत्त्वज्ञान मा. संचालकांनी दोन चिंतनांतून मांडले आहे [cite: 4]. कोणालाही ‘मी देह नसून आत्मा आहे’ हे कळण्यासाठी आधी देहाच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्या लागतात [cite: 4]. भुकेचा एक वेळचा प्रश्न सोडवणे, भुकेचा प्रश्न कायमचा सोडवणे हे आधी करावे लागते [cite: 4]. भुकेचा प्रश्न सुटल्यावर स्वातंत्र्य, सामाजिक सुरक्षा, अभिव्यक्तीची संधी, संकल्पपूर्तीचा अनुभव, या मानसिक गरजा ही पूर्ण व्हाव्या लागतात [cite: 4]. ज्यांना आत्म्याची जाणीव झालेली नाही त्यांनाही या भुकेच्या आणि मानसिक गरजा जाणवतात [cite: 4].
ज्ञान प्रबोधिनीत राष्ट्रीय एकात्मता ही महत्त्वाची उद्दिष्टप्रधान कार्यदिशा मानली गेली आहे [cite: 4]. देशातील विविधतेत एकता नसून मुळात असणाऱ्या एकत्वाचे ते वेगवेगळे अविष्कार आहेत [cite: 4]. या सर्वावरील चिंतनात व्यापक अंगाने मा. संचालकांनी लेखन केले आहे [cite: 4].
एकूणच ही चिंतन पुस्तिका कार्यकर्त्यांनी परत परत वाचून सातत्याने अभ्यास करण्यासाठी वापरावी [cite: 4]. त्यातून नक्कीच आपल्यात वैचारिक परिपक्वता येण्यास मदत होईल [cite: 4].
प्रसाद चिक्षे
केंद्रप्रमुख, अंबाजोगाई विस्तार केंद्र
सचिव, भौगोलिक विस्तार कार्यदिशा
