१३. प्रदेशाचा सर्वांगीण विकास

प्रदेशविकसन शब्दाचा उगम

प्रबोधिनीचे ग्रामविकसनाचे काम कल्याण गाव, शिवगंगा खोरे, शिवगंगा आणि गुंजवणी खोरे असे क्रमशः विस्तारत गेले [cite: 42]. शिवगंगा आणि गुंजवणी खोऱ्यांमध्ये काम सुरू झाले तेव्हा दोन्ही खोऱ्यांना एकत्रितपणे आपण शिवप्रदेश म्हणू लागलो [cite: 42]. एका गावाचे विकसन म्हणजे ग्रामविकसन तर शिवप्रदेशातील सर्व गावांचे विकसन म्हणजे प्रदेशविकसन अशा अर्थाने तो शब्द आपण वापरू लागलो [cite: 42].

प्रबोधिनीच्या घटनेमध्ये अर्थविस्तार

शिक्षण, संशोधन, उद्योग, ग्रामविकसन अशा प्रबोधिनीच्या कामाच्या चार दिशा आपण सुरुवातीला मांडायचो [cite: 42]. पण या सर्व दिशांनी काम करणे हे प्रबोधिनीच्या घटनेतील उपक्रमांमध्ये स्पष्टपणे मांडलेले नव्हते [cite: 42]. काम करताना कोणतेही कायदेशीर अडथळे येऊ नयेत म्हणून मग व्यापक घटनादुरुस्ती करायचे ठरले [cite: 42]. १९८२-८३ च्या सुमारास जी कामे आपण करत होतो, किंवा ज्या कामांच्या योजना आखत होतो, त्यासंबंधीचे परिच्छेद किंवा वाक्ये आपण प्रबोधिनीच्या घटनेतील उपक्रमांच्या भागात आवर्जून घातली [cite: 42]. त्यांपैकी प्रदेशविकसनाशी संबंधित वाक्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • परिच्छेद ४.३.२ : ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीकरिता प्रबोधिनीच्या वतीने प्रत्यक्ष ग्रामविकासाचे प्रकल्प अथवा योजना अंगीकारणे व त्या चालविणे [cite: 42].
  • परिच्छेद ४.३.३ : आरोग्य आणि वैद्यकविषयक प्रकल्प अथवा योजना अंगीकारणे व त्या चालविणे [cite: 42].
  • परिच्छेद ४.३.४ : स्थापत्य, समाज-संचारण (मास कम्युनिकेशन), सर्व आधुनिक शास्त्रे (उदा. संगणकशास्त्र, संदेशवहनशास्त्र, सायबरनेटिक्स्, इ.) यांमधील प्रकल्प अथवा योजना स्वीकारणे व त्या चालविणे [cite: 43].

सर्वंकष विकास आराखडा

प्रदेशविकसन हा शब्द सर्वप्रथम १९७७ मध्ये वापरल्याची नोंद आहे [cite: 43]. प्रबोधिनीच्या घटनेतील भर १९८३ मध्ये संमत झाली [cite: 43]. मधल्या काळात शिवगंगा-गुंजवणी खोऱ्याचा सर्वंकष विकास आराखडा आपण तयार करून घेतला [cite: 43]. त्यापूर्वी १९७२ मध्ये प्रबोधिनीच्या खंड १ मध्ये फक्त शिवगंगा खोरे विकास योजनेचा आराखडा छापला होता [cite: 43]. त्यात:

  1. दळणवळण व वाहतूक,
  2. शेती व फळबाग लागवड,
  3. आरोग्य व परिसर विकास,
  4. आर्थिक व औद्योगिक विकास, आणि
  5. सर्वसाधारण समाजशिक्षण

अशी कामाची पाच क्षेत्रे मांडली होती [cite: 43]. त्या प्रत्येक क्षेत्रात पुन्हा तीन ते नऊ उपमुद्दे मांडले होते [cite: 43]. दुसऱ्या खंडातले ग्रामविकसन विभागातले पाच व उद्योग विभागातले चार लेख पाहिले, तर खोरे विकसन आराखड्यातील पाचही क्षेत्रांना आपण स्पर्श केला असल्याचे लक्षात येते [cite: 43].

राष्ट्रविकासाची क्षेत्रे आणि प्रदेशविकसनाची क्षेत्रे

कै. आप्पांनी राष्ट्रविकासाची सहा क्षेत्रे मांडली होती [cite: 43]. त्यांतील संरक्षण आणि संघटन ही दोन क्षेत्रे सोडली तर प्रदेशविकसनाच्या आराखड्यात पहिली चार क्षेत्रे ग्रामीण संदर्भात समाविष्ट झालेली आहेत [cite: 43]. त्या आराखड्यात संघटन आलेले नाही, कारण तो आराखडा तयार करणारे रेव्ह. मॅकलाउड हे मिशनरी गृहस्थ होते [cite: 43]. १९९६ साली तयार केलेल्या ग्रामविकसन संकल्पना पुस्तिकेत मात्र औपचारिक व अनौपचारिक संघटनाचा उल्लेख केलेला आहे [cite: 43].

देशाचे रूप पालटायचे तर नैसर्गिक पर्यावरण आणि सामाजिक व आर्थिक पर्यावरण या सर्वांचाच एकत्र विचार करावा लागतो [cite: 43]. या दृष्टीने रूप पालटण्याचे सर्वांत छोटे एकक म्हणून एका गावापेक्षा नैसर्गिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या परस्परसंबद्ध गावांचा गट प्रबोधिनाने जास्त उपयुक्त मानला व ठरवला [cite: 42, 43]. ‘ग्रामविकसन’ शब्दाने एका गावाचा किंवा ग्रामीण भागाचा विकास अशा दोन्हींचा बोध होऊ शकत असल्याने आपण ‘प्रदेशविकसन’ असा शब्द कार्यदिशेसाठी वापरायचे ठरवले [cite: 43]. आराखडा प्रदेशविकसनाचा करायचा [cite: 43]. मग त्याची कार्यवाही करताना एकेका गावासाठी आणि एक किंवा अधिक कुटुंबांसाठीसुद्धा नियोजन करावे लागेल [cite: 43, 44]. प्रदेशातील गावे जशी मोठी होतील तसे अंतर्गत सुरक्षा, सामाजिक ऐक्य इत्यादी विषयांचाही विचार करावा लागेल [cite: 44].

प्रदेशविकसन म्हणताना अनेक गावांच्या शिवारांमध्ये विभागलेल्या पाणलोटक्षेत्राचा भौतिक व पर्यावरणीय विकास आणि त्या आधारे प्रदेशातील लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास, यांचाच मुख्यतः विचार करायचा आहे [cite: 44]. गावठाणांचा विकास आनुषंगिक आहे आणि तो संघटित ग्रामस्थांनीच मुख्यतः करणे अपेक्षित आहे [cite: 44]. त्याबाबत तूर्त तरी प्रबोधिनीची काही स्वतंत्र योजना नाही [cite: 44]. नागरी वस्त्यांमधील काम शिवार विकासाचे नसून गावठाणातील सामाजिक विकासाचे आहे [cite: 44]. म्हणूनच ते प्रदेशविकसनाचे काम न म्हणता राष्ट्रीय एकात्मतेचे काम म्हणत आहोत [cite: 44].