प्रत्येक कामात इतरांचा विचार आणि रोजची उपासना
मागील चिंतनात विद्यार्थी-दशा संपल्यानंतर प्रौढ सदस्यांच्या व्यावहारिक आयुष्यात आठ व्रते घेण्यासारखी आहेत असे म्हटले होते [cite: 10]. त्यांपैकी पहिल्या सहा व्रतांमुळे आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, गुणवत्ता, सततची प्रगती व प्रतिभा हे गुण वाढू शकतील असेही म्हटले होते [cite: 10]. सातवे व्रत- ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ असे होते [cite: 10]. ‘इतर म्हणजे कोण?’ तर आपल्या राष्ट्रातील लोक [cite: 10]. त्यामुळे आपल्या मनातील राष्ट्राची कल्पना स्पष्ट होत जाते [cite: 10].
महाराष्ट्रात पसायदान सगळ्यांनी ऐकलेले म्हटलेले असते [cite: 10]. ती विश्वात्मक देवाला प्रार्थना आहे [cite: 10]. विश्वात्मक म्हणजे सगळे विश्व हीच ज्याची मूर्ती आहे, सगळ्या विश्वातच जो प्रतिष्ठापित झालेला आहे असा देव [cite: 10]. या देवाला प्रार्थना केली आहे, की ‘सर्व विश्व स्वधर्मसूर्य पाहू दे’ [cite: 10]. सर्व विश्व म्हणजे विश्वातील सर्व माणसे [cite: 10]. ‘स्वधर्मसूर्य पाहो’ म्हणजे आपल्यातही देवाची प्रतिष्ठापना झाली आहे हे कळण्यासाठी ‘कसे जगायला, वागायला हवे, काय करायला हवे हे कळो’ [cite: 10]. असे कळण्यासाठी इतरांमध्ये प्रतिष्ठापित असलेला देव पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो [cite: 10]. त्यासाठी ‘इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ हे व्रत घ्यावे लागते [cite: 10]. विश्वात्मक देव कळण्यासाठी आधी राष्ट्रात्मक देव कळावा लागतो [cite: 10]. त्यासाठी राष्ट्र म्हणजे काय हे कळावे लागते [cite: 10]. आपला देश, त्यात राहणारे लोक, आणि त्या लोकांनी निर्माण केलेली जीवनपद्धती, संस्कृती आणि धर्म हे सर्व मिळून राष्ट्र होते [cite: 10].
लोकांच्या हिताचा विचार करत सर्व कामे सुरू केली की राष्ट्र समजायला सुरुवात होते [cite: 10, 11]. प्रथम जीवनपद्धती समजू लागते [cite: 11]. आपण स्वतः व इतर सर्व लोक मिळूनच ती जीवनपद्धती घडवत असतो [cite: 11]. जीवनपद्धतीतील काही गोष्टी सहज बदलता येतात [cite: 11]. काही मात्र कितीही प्रयत्न केले तरी चिवटपणे टिकून राहतात [cite: 11]. जीवनपद्धतीतले चिवटपणे टिकून राहणारे काय आहे हे लक्षात यायला लागले म्हणजे आपल्या समाजाची संस्कृती काय आहे हे समजायला लागते [cite: 11]. संस्कृतीमधल्या गोष्टी अशा चिवटपणे का टिकून राहतात याचा विचार सुरू झाला की धर्म काय आहे हे हळूहळू समजायला लागते [cite: 11]. लोक, जीवनपद्धती, संस्कृती आणि धर्म या सगळ्याची जाणीव आपल्याला झाली की राष्ट्रसुद्धा देवाचे एक रूप आहे हे कळते [cite: 11].
मातृभूमी हे दैवत, समाज हे दैवत, राष्ट्र हे दैवत, राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीदेखील देवाचे रूप हे ज्यांना कळले, त्यांनी घरी येणारा प्रत्येक अतिथी हा अतिथीदेव, शिक्षक हे आचार्यदेव, आई-वडील हे मातृदेव-पितृदेव असे मानण्याची संस्कृती निर्माण केली [cite: 11]. ज्यांना हे कळले, त्यांना ते उपासनेतून कळले [cite: 11]. आपणही ते स्वतः अनुभव घेऊन जाणून घ्यावे, म्हणून ‘रोज उपासना झालीच पाहिजे’ हे आठवे व्रत घ्यायचे [cite: 11]. आई, वडील, शिक्षक, अतिथी, सर्व व्यक्ती, मातृभूमी, राष्ट्र या सर्व जणू देवाच्या मूर्ती असे पाहण्याची संस्कृती हिंदुस्थानातच निर्माण झाली [cite: 11]. म्हणून इथे राहणाऱ्या लोकांचे राष्ट्र हे हिंदुराष्ट्र [cite: 11]. आपण हे केवळ श्रद्धेने न मानता श्रद्धा अधिक अनुभवाच्या आधारे मानावे यासाठी ‘रोज उपासना करण्याचे’ व्रत घ्यायला हवे [cite: 11].
व्रतस्थ जीवनशैली
व्रतस्थ म्हणजे व्रतपालनामध्ये स्थिर असलेले [cite: 11]. व्रतपालनात स्थिर होण्यासाठी आपला सगळा दिनक्रम व्रतांना अनुकूल बनवावा लागतो [cite: 11]. आपले झोपेचे, जेवणा-खाण्याचे, खेळाचे, कामाचे, करमणुकीचे, अभ्यासाचे, व्यायामाचे, कौटुंबिक कर्तव्यांचे, शेजारधर्माचे, मित्रकर्तव्याचे वेळापत्रक व्रते व्यवस्थित पाळता येतील या दृष्टीने आखावे लागते [cite: 11]. असे आखीव वेळापत्रक पाळता यायला लागले म्हणजे आपली जीवनशैली व्रतानुकूल झाली [cite: 11]. व्रतांना सर्वोच्च प्राधान्य लगेच देता येईल असे नाही [cite: 11]. सुरुवातीला ‘करून पाहू’ म्हणून व्रते घेतली जातात [cite: 11]. मग व्रतपालनातही ‘आनंद मिळतो’ हे कळल्यामुळे व्रते पाळली जातात [cite: 11]. नंतर कधीतरी आपल्या आयुष्याला काही हेतू आहे, काही उद्दिष्ट आहे व ते गाठण्यासाठी व्रतपालन हे ‘सुलभ साधन’ आहे हे कळते [cite: 11]. आपण व्रतांमध्ये स्थिर होतो [cite: 11]. व्रतानुकूल जीवनशैली ही व्रतस्थ जीवनशैली बनते [cite: 11, 12]. व्रतानुकूल जीवनशैली म्हणजे पंचकोशाधारित जीवन असे म्हटले तर युवकांसाठी व प्रौढांसाठी नमुन्यादाखल अन्नमय व प्राणमय कोशांच्या विकासाला पूरक जीवनशैलीचे काही घटक पुढे सुचवले आहेत [cite: 12].
- युवकांसाठी जीवनशैली: व्यायाम नित्य, ठरवलेला असावा [cite: 12]. आठवड्याचे सहा दिवस नक्की व्हावा [cite: 12]. आठवड्यातून दोन वेळेला तरी किमान मैदानी खेळ मित्रांसह खेळावेत [cite: 12]. सध्याच्या पद्धतीप्रमाणे कंपनीचे काम रात्री करावे लागते पण तरीही चोवीस तासात सात तास पुरेशी शांत झोप आवश्यक [cite: 12]. शारीरिक स्वच्छता नियमित व पुरेशी हवीच [cite: 12]. आहार शक्यतो रोज घरी तयार केलेल्या पदार्थांचा [cite: 12]. पण दोन वेळेला थोडा बदल जर करावा लागला तर हरकत नाही [cite: 12]. ताज्या व स्वच्छ ठिकाणी तयार केलेल्या अन्नाचे ग्रहण आवश्यक [cite: 12]. मित्रांना बरोबर घेऊन कधी खाण्याची (फळे, गोड पदार्थ) अशी पैज लावून आपल्या क्षमता आणि पराक्रम जसा बघता येईल, तसा पायी प्रवास, सायकल सवारी, गड चढणे असे पराक्रम ठरवून करावेत (अन्नमय कोशाचा विकास) [cite: 12].
युवकांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत [cite: 12]. शिकण्याचे वय हेच, त्याचा उपयोग करावा [cite: 12]. नळ दुरुस्ती, विजेच्या जोडणी व दुरुस्तीचे काम, घरात साध्या-साध्या गोष्टींना माणसे बोलवण्यापेक्षा ती कौशल्ये स्वतः शिकून त्यांचा वापर करावा [cite: 12]. काम अडून राहता कामा नये याची जबाबदारी माझी, असे ठरवता आले पाहिजे [cite: 12]. प्राणायाम शिकून प्रयोग करावेत [cite: 12]. संपर्क आणि संवाद कौशल्य कौटुंबिक आणि सामाजिक या दोन्ही ठिकाणी उत्तम वापरण्यास शिकण्याची संधी वारंवार घेऊन मनुष्यजोडणी करता आली पाहिजे (प्राणमय कोशाचा विकास) [cite: 12]. - प्रौढ सदस्यांसाठी जीवनशैली: रोजचा तीस-चाळीस मिनिटे चालणे अथवा घरातील व्यायाम, सूर्यनमस्कार ठरवून [cite: 12]. संयमित आहार, अति गोड, अति तिखट टाळावे [cite: 12]. भूक असेल तेवढेच खावे [cite: 12]. जेवणाच्या, न्याहारीच्या वेळा ठरलेल्या असाव्यात [cite: 12]. अति पराक्रम टाळावेत [cite: 12]. पण पूर्ण बंद करावेत असेही नाही [cite: 12]. विश्रांती सहा तास किमान अपेक्षित [cite: 12]. शारीरिक कष्टाची कामे आठवड्यातून एकदा करावीत [cite: 12]. महिन्यात एकदा घराची साफसफाई करावी [cite: 12]. रोज एक वेळ घरातील सर्वांनी सहभोजन अवश्य करावे [cite: 12]. आयुर्वेद पद्धतीने प्रथमोपचार करावेत व त्यासाठी आग्रही असावे [cite: 12]. भारतीय आहाराचा आग्रह असावा (अन्नमय कोशाचा विकास) [cite: 12].
युवावस्थेत शिकलेली कौशल्ये आपल्या मुलांना शिकवता आली पाहिजेत व अजून काळाला सुसंगत कौशल्ये शिकण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे [cite: 12, 13]. प्राणायाम दोन प्रकारे रोज करावेत [cite: 13]. आपला एखाद दुसरा छंद जोपासण्यासाठी आठवड्याचे काही तास दिले पाहिजेत [cite: 13]. कौटुंबिक संवाद कौशल्यपूर्ण रीतीने करून घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवावे [cite: 13]. अनावश्यक खरेदी टाळावी [cite: 13]. अनावश्यक खर्च टाळावा [cite: 13]. बाजारातील मोहाला बळी पडू नये [cite: 13]. अंथरूण पाहून पाय पसरावेत हे कौशल्य घरातील अन्य व्यक्तींना शिकवून त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे [cite: 13]. ताणरहित जीवन असण्यासाठी प्रयत्न (प्राणमय कोशाचा विकास) [cite: 13].
व्रतस्थ जीवनशैलीमध्ये आपण तनमनधनपूर्वक व्रतपालन करत असतो [cite: 13]. आपले शरीर, आपला विचार, आपल्या कल्पना, आपला वेळ, आपल्या जवळची संपत्ती या सर्वांचा उपयोग व्रतपालन चांगले व्हावे यासाठी होऊ लागला म्हणजे तनमनधनपूर्वक व्रतपालन होऊ लागले [cite: 13]. आपली शक्ती, वेळ, संपत्ती, व्रतपालनाशिवाय आणखी कुठेही विनाकारण किंवा अनवधानाने खर्च होऊ नये याबाबतीत आपण सदैव जागरूक राहायला लागलो म्हणजे आपण आपले आयुष्य जबाबदारीने किंवा उत्तरदायी राहून जगायला लागलो [cite: 13].
प्रबोधिनीची दुसरी प्रतिज्ञा घेतली म्हणजे आपण सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची आठ व्रतेच पाळायची असतात [cite: 13]. प्रबोधिनीचे काम आपण दिवसाचे काही तासच करत असू [cite: 13]. पण ते उत्तम करता यावे यासाठी आपला सर्व दिनक्रमच त्याला अनुकूल बनवावा लागतो [cite: 13]. सर्वसाधारण प्रबोधिनीपणाच्या व्रतांचे आपल्या आयुष्यातील प्राधान्य वाढावे लागते [cite: 13]. असे प्राधान्य वाढले की व्रतांच्या हेतूंकडे आपले लक्ष वाढायला लागते [cite: 13]. आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, कामातील गुणवत्ता, कामातील सततची प्रगती, प्रतिभासंपन्नता याने व्यक्तीच्या आयुष्याची गुणवत्ता वाढतेच [cite: 13]. पण राष्ट्रार्थ आणि धर्मसंस्थापनार्थ प्रबोधिनीचे काम करण्यासाठी आपला दिनक्रम आखायचा व पाळायचा आहे याची जाणीवही वाढायला लागते [cite: 13]. म्हणजेच आपली जीवनशैली व्रतानुकूल बनायला लागते [cite: 13].
