११. व्यापक जनसंघटन

तत्त्वशरण आम्ही, ध्येयशरण आम्ही, कार्यशरण आम्ही

युवक-युवती कार्य म्हणजे, संघटन हे उद्दिष्ट व सर्व उपक्रम हे साधन [cite: 38]. या कार्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत [cite: 38]. म्हणजेच कार्यशरण आहोत [cite: 38]. ‘रूप पालटू देशाचे’ या ध्येयाशी एकनिष्ठ आहोत [cite: 38]. म्हणजेच आम्ही ध्येयशरण आहोत [cite: 38]. तत्त्वसप्तकामधील धर्मसंस्थापना म्हणजेच समाजसंस्थापना या तत्त्वाशी आम्ही एकनिष्ठ आहोत [cite: 38]. म्हणजेच तत्त्वशरण आहोत [cite: 38]. तत्त्व, ध्येय आणि कार्य या तीन्हींशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करणे हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे [cite: 38].

संशोधन आणि आरोग्य

तत्त्वसप्तकाची पहिली व्याख्यानमाला झाल्यानंतर संशोधिकेतील एका सदस्याने म्हटले की संघटना, विकास, उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता एवढी तत्त्वे मला पुरेशी वाटतात [cite: 38]. संजीवन रुग्णालय सुरू झाल्यानंतर, तिथल्या एका डॉक्टरने, तत्त्वसप्तकाबद्दल वाचल्यावर, ‘संघटना, विकास, उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही तत्त्वे रुग्णालय चालवायला पुरेशी आहेत’ असे उद्‌गार काढले होते [cite: 38]. मी दोघांनाही म्हटले, की तुम्हाला संघटना हे तत्त्व आवश्यक वाटते हे चांगले आहे [cite: 38]. त्यामुळे तुमच्यातले प्रबोधिनीपण वाढण्याची आशा आहे [cite: 38]. कार्यशरणतेसाठी उत्तमता, विज्ञानाभिमुखता, विकास ही तत्त्वे आवश्यक आहेतच [cite: 38].

शालेय शिक्षण आणि ग्रामविकसन

ग्रामविकसन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या एका शिबिरात तीन-चार जणांनी वरील चार तत्त्वांशिवाय ‘जनी जनार्दन …’ हे तत्त्व आवश्यक आहे असे म्हटले होते [cite: 38]. तर शालेय शिक्षणात काम करणाऱ्या अनेक जणांना विद्याव्रत संस्काराचे मोल कळल्यामुळे वरील चार तत्त्वांशिवाय ‘हिंदू जीवनदृष्टी’ हे तत्त्व आवश्यक आहे असे वाटते [cite: 38].

शिक्षणातल्या सदस्यांना संघटना म्हणजे शाळा किंवा शिक्षणसंस्थांचे जाळे (नेटवर्किंग) असे वाटत होते [cite: 38, 39]. तर ग्रामविकसनातल्या कार्यकर्त्यांना संघटना म्हणजे ग्रामविकसन संस्थांचे आणि ग्रामविकसन संस्थांमधील समान विषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे (नेटवर्किंग) असे वाटत होते [cite: 39]. शिक्षकांची गटबांधणी, गावकऱ्यांची एकजूट, रुग्णालयातील डॉक्टरांचा कार्यसंच, संशोधकांच्या गटाने मिळून केलेले संशोधन, असे या सर्वांच्या मनातील संघटनाचे आणखी एक रूप आहे [cite: 39].

युवक-युवती कार्यातील संघटन

नेटवर्किंग किंवा कार्यसंचाची बांधणी एवढेच संघटनाचे मर्यादित रूप प्रबोधिनीला अपेक्षित नाही [cite: 38, 39]. अर्थात हे रूपही उपयुक्त आहे [cite: 38, 39]. युवक-युवती कार्य करणाऱ्यांना यासाठी आवश्यक कौशल्ये त्यांच्या विभागांच्या कामातून अधिक चांगली शिकता आली पाहिजेत [cite: 38, 39]. पण ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, राष्ट्रसमर्पित कार्यकर्त्यांची घडण आणि व्यापक जनसंघटन ही संघटनेची रूपेदेखील युवक-युवती कार्यातून घडली पाहिजेत [cite: 38, 39]. संघटना या तत्त्वाचे चारही पैलू (कार्यसंच बांधणी, जाळे (नेटवर्किंग), कार्यकर्ते घडण, जनसंघटन) प्रबोधिनीला अपेक्षित आहेत [cite: 39].

संघटना हे तत्त्व मध्यभागी आहे [cite: 39]. शिक्षण संपल्यानंतर आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, प्रशासकीय किंवा संरक्षणात्मक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना संघटनाबरोबर एका बाजूला उत्तमता, विज्ञानाभिमुखता, विकास ही तत्त्वे अंगी मुरवणे आवश्यक आहे [cite: 39]. पण कार्यशरणतेबरोबर ध्येयशरण व तत्त्वशरणही होण्यासाठी दुसऱ्या बाजूला धर्मसंस्थापना, हिंदू जीवनदृष्टी व जनी जनार्दन या तत्त्वांचा आधार त्यांना आवश्यक आहे [cite: 39].

या सर्व क्षेत्रांसाठी कर्तृत्ववान, समर्पित, गटकार्यकुशल कार्यकर्ते प्रेरित व प्रशिक्षित करण्याचे काम करणाऱ्या युवाशक्ती प्रबोधन व स्त्री-शक्ती प्रबोधन करणाऱ्या विभागांना संघटनाबरोबर एका बाजूला धर्मसंस्थापना, हिंदू जीवनदृष्टी, जनी जनार्दन ही तत्त्वेदेखील अंगी मुरवण्याची योजना करावी लागेल [cite: 39]. पण त्यांच्या उपक्रमांचा समाजामध्ये स्वीकार होण्यासाठी दुसऱ्या बाजूला उत्तमता, विज्ञानाभिमुखता व विकास या तत्त्वांची कास त्यांनाही धरावी लागेल [cite: 39].

सर्व तत्त्वांच्या मध्यभागी असलेल्या संघटना या तत्त्वाच्या चार पैलूंचा प्रथम कार्यकर्ते घडण, मग कार्यसंचबांधणी, नंतर जाळे (नेटवर्किंग) व शेवटी जनसंघटन हा प्राधान्यक्रम आपल्याला व आपल्या विभागाला मान्य आहे का, याचा सर्वांनीच विचार करावा [cite: 39].