निगडी केंद्र

केंद्रस्तरावरील उद्दिष्टे

१. परिसरातील अन्य संस्था व व्यक्तींच्या साहचर्याने विद्यार्थ्यांसाठी अनुभव शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून तो राबवणे.
२. पिंपरी–चिंचवड शहरात पर्यावरणविषयक जागृती आणि प्रत्यक्ष उपक्रम राबविणे.
३. प्रबोधिनीच्या साळुंब्रे व चिखली येथील केंद्रांवर औपचारिक शिक्षणात आवश्यक ते सहकार्य करणे.
४. माध्यमिक आणि महाविद्यालयीन वयोगटाच्या उद्योजकता विकसनाची रचना निर्माण करणे.
५. अंतर्गत गुणवत्ता – प्रशासन, व्यवस्थापन व जनसंपर्काच्या रचना स्थिर करणे व व्यावसायिक उत्तमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण रचना बसवणे.

इतर विभागांची उद्दिष्टे

६. प्राथमिक विभाग – शिक्षण संकल्पव्रतातील बारा गुणांच्या विकसनासाठीची रचना प्रयोग करून स्थिर करणे.
७. पूर्व-माध्यमिक विभाग – विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमतेप्रमाणे गट करून त्यानुसार अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन पद्धती बसवणे.
८. माध्यमिक मराठी विभाग – इ. ८ ते १०वीच्या वर्गांसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयाचा स्वत:चा अभ्यासक्रम तयार करून शिकविणे.
९. गुरुकु ल – पंचकोश शिक्षण प्रणालीमधील विविध कोशांच्या मूल्यमापन पद्धतींचे प्रयोग करून त्या रूढ करणे.
१०. क्रीडाकु ल – नवीन जागेवर स्थलांतर करून भव्य प्रशिक्षण व संशोधन कें द्र उभारणे.
११. अटल धडपडालय – STEM आधारित विना शिक्षक मुक्त प्रयोग केंद्राचेप्रयोग करून त्याची रचना स्थिर करणे.
१२. मुक्तिसोपान कला विभाग – भारतीय संगीताच्या मूलभूत संकल्पनांनुसार संगीत व नाट्य या विषयांचा नवीन अभ्यासक्रम कार्यान्वित करणे.
१३. युवक विभाग – पिंपरी–चिंचवडच्या दहा नवीन भागांत शालेय व महाविद्यालयीन दलांचा विस्तार करणे.
१४. युवती विभाग – पिंपरी–चिंचवड मधील अन्य शाळांमध्ये युवती विभागाचे काम सुरू करणे.
१५. पालक महासंघ – ‘प्रबोधक कु टुंब’ ही संकल्पना रुजवून त्या अंतर्गत कु टुंबांनी एकत्र येऊन करायचे विविध उपक्रम परिसरामध्ये रूढ करणे.