चित्रभाषा

प्रस्तावना

'प्रत्येक चित्र बोलते', 'बोलक्या चित्रांविषयी बोलले जाते', हे बोलणे अधिक अर्थपूर्ण व्हावे, यासाठी 'चित्रभाषा' हे शैक्षणिक साधन आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. मुलांच्या भाषिक, भावनिक, बौद्धिक विकासात हे साधन निश्चित उपयुक्त ठरेल हा विश्वास आहे.

'चित्रभाषा' प्रकल्पातील सर्व चित्रे ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी ही चित्रे पूरक ठरणार आहेत. तसेच भारतीय संस्कृती, मूल्ये, जीवनकौशल्ये इत्यादी घटक प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रुजण्यासाठी ही चित्रे महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. मुलांमधील निरीक्षणक्षमता, विचारक्षमता, कृतिशीलता यांसही या चित्रवाचनातून संधी मिळणार आहे.

'प्रत्येक मुलाची प्रत्येक चित्राकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी असते' हा विचार ठेवून सुलभकांनी दिलेल्या मार्गदर्शका सूचनांचा अभ्यास करावा व त्यांचा अवलंब करावा. स्व-अभिव्यक्तीकडे जाणारा मुलांचा प्रवास या चित्र - अभ्यासातून कसा सुकर होत जाईल, हे पाहणे सुलभकांसाठी महत्त्वाचे आहे.

'चित्रभाषा' प्रकल्पातील सहभागी मुलांचा भाषा शिकण्यातील 'आनंद' हा 'चित्रभाषा' या शैक्षणिक साधनाने द्विगुणित व्हावा, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

स्वाती ताडफळे
मार्गदर्शिका
शैक्षणिक साधन केंद्र, पुणे

चित्रभाषा भाग १, भाग २ आणि चित्रभाषा भाग ३ - डिजिटल चित्रसंग्रह

मुलांच्या कल्पनाशक्तीला उभारी देत, त्यांचे भाषाशिक्षण समृद्ध करणारी चित्रभाषाची दोन पुस्तके १ ली ते ८ वी साठी प्रकाशित केली. चित्रांतून भाषा शिक्षण ही संकल्पना नवीन नाही. आपण लहानपणापासून चित्र, दृश्य, आवाज यांतून भाषा शिकतो भाषा शिकण्याची प्रक्रिया ही अक्षरे शब्द यावर अवलंबून असली तरी, चित्रांच्या माध्यमातून ती सहज, सोपी होते.

आपली प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे आणि आपण आधी त्याच भाषेत बोलायला शिकतो. शाळेत गेल्यावर आपल्याला प्रमाणभाषेत बोलावे आणि लिहावे लागते. ही पायरी मुलांसाठी कठीण होते. भाषा शिकणे ही एक अनुभवात्मक प्रक्रिया आहे. जिथे मूल विचार करते, भावना व्यक्त करते आणि संवाद साधते, हे पुस्तक याच उद्दिष्टाने तयार केले आहे.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की. चित्र मलांना विचार करण्यास प्रवृत्त करेल. गोष्टी, संवाद आणि खेळ इ. द्वारे शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न होईल. सहज संवादाने, संवेदनशील आणि चित्राच्या माध्यमातून सर्वसमावेशक, सांस्कृतिक आणि सामाजिक अनुभव मुलांसमोर मांडले जातील, जे मुलांच्या भाषा विकासास पूरक ठरतील.

शिक्षक आणि पालकांसाठीही या पुस्तकासोबत मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे, ज्यामुळे ते मुलांसोबत भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतील.

मुले जेव्हा भाषेच्या जगात पाऊल ठेवतात, तेव्हा ती केवळ बोलायला शिकत नाहीत, तर विचार करून त्यांची मांडणी त्यांच्या शब्दांत करायला शिकतात. भाषेच्या मूलभूत साक्षरतेसाठीचा हा प्रवास आधिक रंगतदार, गमतीदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चित्रभाषा हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.

चित्रभाषा भाग १ हा १ ली ते ५ वी साठी आणि भाग २ हा ६ वी ते ८ वी साठी प्रकाशित केल्यावर अशीच वेगवेगळ्या विषयावरील अनेक चित्र डिजिटल माध्यमातून द्यावी अशी मागणी आली. त्यासाठी चित्रभाषा भाग ३ - डिजिटल चित्रसंग्रह उपलब्ध करून देत आहोत. चित्रभाषा प्रकल्पात आपले मनः पूर्वक स्वागत !

पल्लवी पराडकर
विभाग प्रमुख,
शैक्षणिक साधन केंद्र, पुणे

चित्रभाषा भाग १

Chitra bhasha bhag 1
Rs. 200

चित्रभाषा भाग २

Chitra bhasha bahg 2
Rs. 200

चित्रभाषा भाग ३

For booking contact us at
Phone : 24207194
Phone : ‎+91 99233 12597
Email  : [email protected]