संत्रिका सुवर्ण महोत्सव

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ४

४ : प्रबोधिनीचा विस्तार करायचा म्हणजे कशाचा विस्तार करायचा ? उत्तर :- प्रबोधिनीच्या भवितव्य लेखात आपण दोन प्रकारचा विस्तार मांडला आहे. पहिला कार्य विस्तार आणि दुसरा भौगोलिक विस्तार. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, आरोग्य, प्रदेशविकसन या प्रभागांमध्ये कार्यविस्तार म्हणजे वेगळा वयोगट, वेगळे कौशल्य, वेगळी साधने, वेगळे विषय, वेगळा समाजगट, वेगळा व्यवसायगट डोळ्यासमोर ठेवून काम करणे. आधी फक्त […]

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ४ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ३

३ : ज्ञान प्रबोधिनीचे वर्णन सामाजिक संघटना म्हणून करावे की शैक्षणिक संस्था म्हणून करावे ? उत्तर :- आपल्या मनात आपले उद्दिष्ट स्पष्ट राहावे या साठी प्रबोधिनीचे वर्णन सामाजिक संघटना म्हणूनच करावे असे मला अलीकडे जास्त तीव्रतेने वाटते आहे. एखाद्या समविचारी गटाने केवळ आपल्या उमेदीच्या काळात सामाजिक कार्य करणे पुरेसे नाही. सामाजिक कार्याचा वसा त्या गटाने

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ३ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक २

२ : धर्मादाय संस्था व विश्वस्त संस्था यात नेमका काय फरक आहे ? प्रबोधिनी यापैकी कोणत्या प्रकारात येते ? उत्तर :- प्रबोधिनीची शासनाकडे सार्वजनिक संस्था म्हणून सर्वप्रथम नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्रात सर्व सार्वजनिक संस्थांना विश्वस्त संस्था म्हणूनही नोंदणी करावी लागते. म्हणून प्रबोधिनीची विश्वस्त संस्था म्हणून ही नोंदणी झालेली आहे. विश्वस्त संस्थेची मालमत्ता कोणाही एकाच्या मालकीची

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक २ Read More »

निवेदन व आभार

शके १९३३ ते १९३६ (मार्च २०११ ते फेब्रुवारी २०१५) या पाच वर्षांमध्ये दर महिन्याला त्या आधीच्या महिन्याभरात एकेका सदस्याशी किंवा छोट्या गटांमध्ये झालेल्या संवादापैकी तीन-चार प्रश्नोत्तरे लेखी स्वरूपात साधारण ३० सदस्यांमध्ये वितरित करत होतो. अशा २२५ प्रश्नोत्तरांपैकी १०५ प्रश्नोत्तरे या पुस्तिकेत अधिक वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या प्रश्नांची निवड व वर्गीकरण करण्यामध्ये प्रा. अभयाताई

निवेदन व आभार Read More »

जिज्ञासापूर्ती भाग १ – प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनी ही एक शिक्षणसंस्था म्हणून सामान्यतः समाजात परिचित आहे. ग्रामविकसन, स्त्रीसबलीकरण, युवक व युवती संघटन, मानसशास्त्र संशोधन, संस्कृत-संस्कृति-संशोधन, शैक्षणिक उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या प्रांतात ज्ञानसेतूचे म्हणजेच पर्यायाने राष्ट्रीय एकात्मतेचे काम करणे, राष्ट्रीय आपत्प्रसंगी शक्यतो मदतीसाठी धावून जाणे, वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालये चालवणे, अशी नानाविध कामे करणारी ज्ञान प्रबोधिनी एक संघटना आहे याची माहिती फारच थोड्यांना असते. तसेच

जिज्ञासापूर्ती भाग १ – प्रस्तावना Read More »

संघटनेचे पर्यावरण

१. सामूहिक द्रष्टेपणा यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण झाले. त्या दिवशी रात्री अनेकांनी ते ग्रहण अनेक ठिकाणांहून पाहिले. कोणी नुसत्या डोळ्यांनी पाहिले. आणखी कोणी दुर्बिणीतून पाहिले. विविध शक्तीच्या अनेक दुर्बिणी अनेक गच्च्यांमधून व टेकड्यांवरून ग्रहणाच्या आधीपासूनच चंद्राकडे रोखल्या गेल्या होत्या. ज्यांनी नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले, त्यापेक्षा जास्त तपशील दुर्बिणीतून पाहणाऱ्यांना बघायला मिळाले. दुर्बिण

संघटनेचे पर्यावरण Read More »

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना

लेख क्र. ५६ ३०/०८/२०२५ गणेशोत्सव भारतीय मनाला आनंद देणारा आहे. कुटुंबाला, समाजाला संघटित करणारा आहे. गणेशाची स्थापना झाल्यापासून त्याच्या विसर्जनापर्यंत केली जाणारी आरती हा सुद्धा भारतीय मनाला आस्था असणारा विषय आहे. आर्तभावाने ईश्वराला मारलेली हाक म्हणजे आरती. आरती म्हणून झाल्यावर हातात फुले आणि अक्षता घेवून मंत्रपुष्प वाहिले जाते. पूजेतील सोळा उपचारातील हा शेवटचा उपचार मानला

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना Read More »

अभ्युदय व नि:श्रेयसाची दीक्षा देणारा जैन धर्म

लेख क्र. ५४ २३/०८/२०२५ ‘यज्ञ’ या मासिकाच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती विशेषांक, दिपावली २००८’ मध्ये डॉ. मनीषा शेटे यांचा जैन धर्माचा परिचय करून देणारा लेख प्रकाशित झाला. जैन धर्म आपल्याला नि:श्रेयसाचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग शिकवतो. हा मार्ग शिकवणारे तीर्थंकर व या मार्गावर जाताना आवश्यक असणारी तत्वे आणि त्यातून मिळणारे फळ यांचीही माहिती या लेखात आहे. असा

अभ्युदय व नि:श्रेयसाची दीक्षा देणारा जैन धर्म Read More »