प्रकट चिंतन ३ राष्ट्रीयत्वाचे पैलू

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी

इतरांच्या तुलनेत भारत तुलना दोन प्रकारांनी करता येते. एकाच प्रकारच्या कामात कोणी कमी, कोणी जास्त काम केले हे बघता येते. जे इतर कोणी करत नाही असे वेगळे काय करतो हे पण बघता येते. पहिल्या तुलनेला ‘प्रमाणाची’ तुलना म्हणता येईल. दुसऱ्या तुलनेला ‘प्रकाराची’तुलना म्हणता येईल. जे मोजता येते त्याची प्रमाणाची तुलना करता येते. लोकसंख्या, उत्पादन, आर्थिक […]

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी Read More »

व्यवहार्य, म्हणजे आयुष्य जगण्यात आणता येईल असे अध्यात्म

बाह्य सृष्टीला प्रेमाने जिंकणे, साधनपूजा, प्रतीकपूजा आणि आपल्याला पाहिजे ते प्रतीक आणि साधन निवडा असे स्वातंत्र्य, या सगळ्याला भारतीय जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती किंवा संस्कृती म्हटले, तर त्याशिवाय हिंदू धर्मात आणखी काय राहिले? हिंदू धर्म हे समूहवाचक नाम आहे. एक डझन म्हणजे बारा वस्तू, एक किलो म्हणजे हजार ग्रॅम, एक रीम म्हणजे ४४० कागद, एक एकर

व्यवहार्य, म्हणजे आयुष्य जगण्यात आणता येईल असे अध्यात्म Read More »

साधनपूजा आणि प्रतीकपूजा

आपले आयुष्य सुखी-समाधानी करायचे असेल, तर सृष्टीतली अनेक साधने नैसर्गिक स्थितीत किंवा त्यावर प्रक्रिया करून वापरावी लागतात. या सर्व साधनांची पूजा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. भूमिपूजन, वास्तुपूजन, शस्त्रपूजन, यंत्रपूजन, ग्रंथपूजन, वृक्षपूजन, गोपूजन या सगळ्या पद्धती या जीवनदृष्टीतूनच आलेल्या आहेत. पूर्वी चुलीची आणि उखळाची पूजा करायचे, तर आज दिवाळीच्या पाडव्याला वहीपूजनाबरोबर संगणकाचीही पूजा करतात. नवीन

साधनपूजा आणि प्रतीकपूजा Read More »

बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय

हिंदू संस्कृतीचे असे वैशिष्ट्य आहे, की भारतीयांना कधीच महासत्ता व्हावेसे वाटले नाही. पूर्वीच्या काळीही नाही, आणि आजही नाही. भारतीय समाजाने स्वप्न पाहिले, ते विश्वगुरू होण्याचे. सामान्य मनुष्यापासून देवमाणूस कसे बनायचे हे सगळ्या जगाला शिकवावे, अशी भारतीयांची इच्छा होती. जगाला शिकवणे म्हटल्याने किंवा विश्वगुरू म्हटल्यानेही आपण इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू शकते. तशी श्रेष्ठत्वाची भावनाही भारतीयांनी

बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय Read More »

संस्कृतीचे पहिले लक्षण : बाह्य सृष्टीवर विजय

बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून हिंदू समाजाने प्राचीन काळात विज्ञान संशोधनामध्ये मोठी आघाडी मारली होती. गणितातील दशमान पद्धती आणि शून्याची कल्पना, खगोलशास्त्रातील पृथ्वीला गती आहे, पण ती स्थिर भासते हा सिद्धांत, रसायनशास्त्र, वैद्यक आणि शल्यचिकित्सा या सगळ्यांमध्येच हिंदू समाजाने आघाडी घेतलेली होती. अगदी पेशवाईच्या काळापर्यंत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान हिंदू समाजाने सांभाळले. इंग्लंडमध्ये

संस्कृतीचे पहिले लक्षण : बाह्य सृष्टीवर विजय Read More »

संस्कृती : जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती

जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती यांना मिळून आज संस्कृती असा शब्द वापरतात. पूर्वीच्या काळी भारतीय भाषांमध्ये संस्कृती हा शब्द वापरात नव्हता. त्याऐवजी धर्म हा शब्द आपण बापरायचो. समाजाची धारणा करणारा म्हणजे समाजाला एकसंध व प्रगतिशील ठेवणारा तो धर्म, अशी धर्माची व्याख्या आहे. निश्चित जीवनदृष्टी आणि त्यानुसार बनलेली जीवनपद्धती असेल तरच समाजाची धारणा होते. म्हणजे समाजातील सर्व व्यवस्था

संस्कृती : जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती Read More »

जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे

आपण बारकाईने निरीक्षण करत गेलो, तर सर्वसामान्य लोकांच्या साध्या-साध्या कृतीतून ही जीवनदृष्टी व्यक्त होत जाते. एखाद्या समाजाची ओळख त्याच्या जीवनदृष्टी वरूनच होते. जीवनाकडे बघायचा भारतीय दृष्टिकोन सांगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका फुलाचे उदाहरण घेऊन म्हटले आहे, अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती । कोणी त्यांची महती गणती केली असे । परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीचरणीं ठेविले

जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे Read More »

राष्ट्रीयत्वाचे पैलू- समाजाचे राष्ट्रत्व आणि व्यक्तीचे राष्ट्रीयत्व – जीवनदृष्टी

जीवनदृष्टी जपानमध्ये एखाद्या उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तिथे जपानी पद्धतीच्या चहाचे दुकान आढळते. जर्मनी, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंडमध्ये डोंगराच्या निसर्गरम्य ठिकाणी कॉफीची किंवा वाईन आणि बिअरची दुकाने सापडतात. अमेरिकेतल्या डोंगरांवरच्या प्रेक्षणीय स्थळी उंच ठिकाणी किंवा कड्याच्या टोकाशी एक दुर्बिण बसवलेली असते. कुठल्या दिशेने पाहिल्यावर कोणती स्थळे दिसतील याचा नकाशाही तिथे लावलेला असतो. मात्र २५ सेंटचे

राष्ट्रीयत्वाचे पैलू- समाजाचे राष्ट्रत्व आणि व्यक्तीचे राष्ट्रीयत्व – जीवनदृष्टी Read More »