२ : धर्मादाय संस्था व विश्वस्त संस्था यात नेमका काय फरक आहे ? प्रबोधिनी यापैकी कोणत्या प्रकारात येते ?
उत्तर :- प्रबोधिनीची शासनाकडे सार्वजनिक संस्था म्हणून सर्वप्रथम नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्रात सर्व सार्वजनिक संस्थांना विश्वस्त संस्था म्हणूनही नोंदणी करावी लागते. म्हणून प्रबोधिनीची विश्वस्त संस्था म्हणून ही नोंदणी झालेली आहे. विश्वस्त संस्थेची मालमत्ता कोणाही एकाच्या मालकीची नसते. विश्वस्त मंडळाकडे संस्थेची मालमत्ता सांभाळणे व तिचा संस्थेच्या उद्दिष्टांसाठी वापर करणे याची जबाबदारी असते. परंतु विश्वस्तांना संस्थेची मालमत्ता स्वतः साठी वापरता येत नाही. धर्मादाय संस्था मुख्यतः आरोग्य, वंचितांचे शिक्षण, अनाथालय चालवणे, अन्नदान करणे, इ. कामे करते. कोणती कामे धर्मादाय मानावीत हे शासन वेळोवेळी ठरवत असते. प्रबोधिनीची काही कामे धर्मादाय मानली जातात. तर काहींना शासन धर्मादाय म्हणून मान्यता देत नाही. मात्र प्रबोधिनीचे प्रत्येक काम सार्वजनिक हिताची दृष्टी ठेवूनच केलेले असते.
