कोणत्या भाषेतून विचार ?
मागच्या चिंतनात राष्ट्रीय एकात्मतेसाठी १९८८ साली प्रबोधिनीच्या पुढाकाराने झालेल्या एका संपर्क अभियानाचे स्वरूप व त्याचे निष्कर्ष यांची माहिती दिली होती [cite: 48]. त्या काळात आपली प्रतिसादात्मक कामे समाज ऐक्य समिती या नावाने चालायची [cite: 48]. अभ्यास करताना बऱ्याच वेळा आपल्याला इंग्रजी भाषेतील वैचारिक साहित्याचे संदर्भ शोधावे लागतात, वापरावेही लागतात [cite: 48]. ‘एकात्मता’ या शब्दाचे इंग्रजी प्रतिशब्द व अर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशात पाहिले तर integrity, identity व solidarity हे तीन शब्द अनेक कोशांमध्ये दिसतात [cite: 48]. The unity of spiritual essence आणि the doctrine of universal spirit हे दोन अर्थही दिसतात [cite: 48]. गंमत म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी सहजपणे national integration हे इंग्रजी शब्द वापरले जातात [cite: 48]. पण कोणत्याही शब्दकोशात एकात्मतेसाठी integration हा शब्द दिलेला नाही [cite: 48].
मग integration या शब्दाचे मराठी प्रतिशब्द इंग्रजी-मराठी शब्दकोशात पाहिले, तर तिथे एकात्मता हा शब्द दिसेना [cite: 48]. एकत्रीकरण, ऐक्य, एकात्मीकरण, समाकलन हे चार प्रतिशब्द दिसले [cite: 48]. एकात्मता ही स्थिती आणि एकात्मीकरण ही कृती आहे [cite: 48]. तसेच integrity ही स्थिती व integration ही कृती आहे [cite: 48]. त्यामुळे national integration वरचे साहित्य शोधले-वाचले तर ऐक्य प्रस्थापित करण्यातले प्रश्न व संभाव्य उत्तरे सापडतील [cite: 48]. एकात्मता नाहीच आहे, एकात्मीकरण करायचे आहे, अशी सगळ्या चिंतनाची दिशा national integration म्हणून विचार करताना राहील [cite: 48].
दोन स्तरांवर काम
एकात्मता आहेच, ऐक्य प्रस्थापित करायचे आहे, असे चिंतन करण्यासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागेल [cite: 49]. आपले ‘राष्ट्र’ हे १९४७ मध्ये देश म्हणजे राष्ट्रराज्य स्वतंत्र होण्यापूर्वीही अस्तित्वात होते [cite: 49]. सण-समारंभ, तीर्थयात्रा, आदर्श स्त्री-पुरुष, वेद-उपनिषदे व रामायण-महाभारत यांचा वारसा, बौद्ध, जैन, शीख इ. पंथांमधील भिन्नता असूनही समान मान्यता ही शेकडो वर्षांमध्ये घडलेल्या एकात्मतेची लक्षणे होत [cite: 49]. पाश्चिमात्य दृष्टिकोन स्वीकारलेले लोक विविधतेत एकता शोधतात [cite: 49]. आपण विविधतेला एकत्वाचे विविध आविष्कार मानतो [cite: 49]. समाजगटांमध्ये, प्रांतीय किंवा प्रादेशिक गटांमध्ये, भाषिक गटांमध्ये, आर्थिक गटांमध्ये, जाती-जातींमध्ये, धार्मिक-सांप्रदायिक गटांमध्ये ऐक्य तर प्रस्थापित करायचे आहे [cite: 49]. पण सर्व गटा-गटांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये सुद्धा, ते सर्व एका राष्ट्राचे आहेत म्हणून एकात्मता आहेच, ही national integration पेक्षा वेगळी भूमिका होईल [cite: 49]. राजकीय, आर्थिक, सामाजिक बाबतीत ऐक्य प्रस्थापित करायचे आहे [cite: 49]. सांस्कृतिक, मानसिक बाबतीत असलेल्या एकात्मतेचेच स्मरण द्यायचे आहे [cite: 49]. असे दोन स्तरांवर काम करणे म्हणजे प्रबोधिनीने राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणे [cite: 49].
कार्यपद्धत
समान मुळाचे आणि समान स्वत्वाचे स्मरण करून दिले तर विखुरलेल्या शक्तींचे (विभिन्न शक्तींचे नव्हे) एकत्रीकरण सोपे जाते [cite: 48, 49]. भेदांची दखल घेत, पण त्यावर भर न देता, मूळच्या एकात्मतेचे स्मरण देत विखुरलेल्या शक्तींचे एकत्रीकरण करता येते [cite: 48, 49]. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्यांची कार्यपद्धती कशी असावी? ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ या पुस्तकात कै. आप्पांनी लिहिले आहे:
- हिंदू समाजातील कृत्रिम भेद न पाहता सर्वांवर प्रेम करणे हा आमच्या कार्यपद्धतीतील पहिला विशेष असला पाहिजे [cite: 49].
- दुसरे असे की विचारांना इथे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे [cite: 49].
- समाज-अंतर्गत अशा, पण मूलग्राही विरोधातसुद्धा हृदय-परिवर्तन हीच पद्धत हवी [cite: 49].
- केवळ परमत सहिष्णुताच नव्हे तर अन्य मत धारण करणाऱ्या व्यक्तीबद्दलही अंतःकरणात आत्मीयताच अनुभवणे हेच हिंदू संस्कृतीच्या दृष्टीनेही विहित असणार यात शंका नाही [cite: 49, 50].
यामध्ये ‘अंतःकरणात आत्मीयताच अनुभवणे’ म्हणजे आधी स्वतःला मूळच्या राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव येणे [cite: 50]. मगच इतरांना अनुभव देऊन मूळच्या एकात्मतेचे स्मरण करून देता येईल [cite: 50]. ही एकात्मता सांस्कृतिक आहे [cite: 50]. या संस्कृतीची मुख्य लक्षणे तीन आहेत: बाह्य परिस्थितीवर विजय मिळविण्याची इच्छा, ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति’ ही भूमिका आणि मन-बुद्धीवर नियंत्रण मिळवून अंतरात्म्याचा अनुभव घेण्याचे ध्येय [cite: 50].
परिघावरील गटांविषयीचा भाव
या एकात्मतेचा शोध स्वतःच्या आतमध्ये घेत असतानाच बाहेरून जटिल वाटणाऱ्या पण वरवरच्या असणाऱ्या भेदांमध्ये ऐक्य प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावे लागणारच आहेत [cite: 50]. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्रात (प्रकाशन २००४) परिघावरील सात समाजगटांचे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता मांडली आहे [cite: 50]:
- स्त्रिया
- दलित
- आदिवासी व भटक्या विमुक्त जमाती
- भूमिहीन शेतमजूर
- धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त विस्थापित
- ईशान्य भारतातील जमाती
- पंजाबी व काश्मिरी जनता
काळानुसार हे गट कमी-जास्त होतील [cite: 50]. २०२० साली करोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात स्थलांतरित असंघटित श्रमजीवी हा वेगळाच मोठा गट लक्षात आला [cite: 50]. अशांचे प्रश्न सुटल्यावर त्यांना जो आनंद होईल तोच माझा आनंद म्हणजे ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ [cite: 50]. तो भाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी मार्गदर्शक असला पाहिजे [cite: 50].
