भविष्यवेध आणि भवितव्य लेख
भविष्यवेधात आपण स्वप्ने पाहून त्यांचे वर्णन भविष्यचित्रात करत असतो [cite: 51]. नंतर त्या चित्रांमधून आपल्याला भविष्यासाठी विविध उद्दिष्टे निश्चित करता येतात [cite: 51]. भविष्यचित्रे वाचून आधी जेवढी उद्दिष्टे सुचतील किंवा सापडतील तेवढी नोंदवून ठेवावीत [cite: 51]. नंतर त्यांच्यावर सहज नजर टाकली आणि गटात थोडी चर्चा केली तर त्यांचे पुढीलप्रमाणे गट पाडता येतील:
- एकदाच करायचे उपक्रम
- काही वर्षे चालणारे उपक्रम किंवा प्रकल्प
- कार्यपद्धतीत भर किंवा बदल
- नवीन उपविभाग किंवा विभागाचा प्रारंभ
- धोरणात्मक किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट
उद्दिष्टांचे असे गट केले तर नंतर लॉगफ्रेम तंत्राचा वापर करून कार्यवाहीचा आराखडा करताना कोणते उद्दिष्ट किती महत्त्वाचे हे ठरवणेदेखील सोपे जाऊ शकेल [cite: 51]. या पद्धतीने विचार केला तर भवितव्य लेख लिहिणे कदाचित सोपे जाईल [cite: 51]. पहिला भवितव्य लेख लिहिताना असा विचार केला नव्हता [cite: 51]. पण दोन-दोन वर्षांनी आढावा घेताना भवितव्य लेखात मांडलेल्या उद्दिष्टांचे असे गट पाडणे सोयीचे गेले [cite: 51]. या वेगवेगळ्या प्रकारांची थोडी उदाहरणे पाहू [cite: 51].
उद्दिष्टांच्या प्रकारांची उदाहरणे
- एकदाच करायचे उपक्रम:
- तीन शैक्षणिक संस्कार कार्यक्रमांच्या ध्वनिफिती तयार करणे [cite: 51].
- ग्रामीण प्रज्ञा विकास कार्यक्रमामध्ये पूरक उपक्रमांच्या पुस्तिका तयार करणे [cite: 51].
- शैक्षणिक गुणवत्ता परिसंवाद घेणे [cite: 52].
- नेतृत्वविकसन व ग्रामविकसन संकल्पना पुस्तिका तयार करणे [cite: 52].
- स्त्री-शक्ती प्रबोधन संकल्पना पुस्तिका तयार करणे [cite: 52].
- काही वर्षे चालू राहणारे उपक्रम/प्रकल्प:
- प्रशासनातील राखीव जागांमध्ये निवडीकरिता प्रयत्न करणाऱ्यांसाठी प्रशिक्षणामध्ये आर्थिक सवलतीची योजना करणे [cite: 52].
- स्त्री-प्रश्न अभ्यासगट सुरू करणे [cite: 52].
- शंभर तालुक्यांमध्ये शैक्षणिक उपक्रमांचा प्रसार करणे [cite: 52].
- स्त्री नेतृत्व अभ्यास प्रकल्प करणे [cite: 52].
- पंचवीस शाळांमधून शैक्षणिक उपक्रमांचा विस्तार करणे [cite: 52].
- कार्यपद्धतीत भर:
- कुष्ठरोगाबरोबर क्षयरोग निर्मूलन योजना सुरू करणे [cite: 52].
- पालक प्रशिक्षण वर्ग घेण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प करणे [cite: 52].
- छात्र प्रबोधनची व्हीडिओ आवृत्ती सुरू करणे [cite: 52].
- स्त्री विषयक कायद्यांच्या संदर्भात स्त्रियांसाठी महाराष्ट्रात प्रबोधन चळवळीचे संघटन करणे [cite: 52].
- नवीन विभाग अथवा उपविभाग सुरू करणे:
- बुद्धिमत्ता विकास मंचाची स्थापना करणे [cite: 52].
- स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या औद्योगिक वसाहतीचा नमुना उभा करणे [cite: 52].
- स्वयंपूर्ण दृक्-श्राव्य कार्यक्रम निर्मिती केंद्र सुरू करणे [cite: 52].
- धोरणात्मक/दीर्घकालीन उद्दिष्ट:
- प्रशासकीय सेवांमध्ये १०० जणांचे विविध स्तरावर नेतृत्व [cite: 52].
- शहर/तालुका/जिल्हा व त्यापेक्षा वरच्या स्तरांवर विविध क्षेत्रांत प्रत्येकी २५ ग्रामीण तरुण, २५ अनुसूचित जाती-जमातींमधील व्यक्ती व २५ महिलांना नेतृत्वाची संधी [cite: 52].
- महाराष्ट्राबाहेर पाच राज्यांत शैक्षणिक उपक्रम संशोधिका/मुक्त विद्या केंद्र/प्रशाला सुरू [cite: 53].
पहिला भवितव्य लेख करताना मनुष्यबळ व अर्थबळाचा विचार केला नव्हता [cite: 53]. गृहीते स्पष्ट मांडली नव्हती [cite: 53]. काही उद्दिष्टे काळाच्या खूप पुढची पाहिली होती [cite: 53]. लॉगफ्रेम तंत्रात उद्दिष्टांची उतरंड किंवा शिडी तर्काधारित विचार करून तयार होते [cite: 53]. स्वतंत्रपणे सुचलेल्या उद्दिष्टांचे वर्गीकरण करूनही त्यांना नंतर निवेश, निष्पत्ती, मध्यंतर उद्दिष्ट, कार्यपरिणाम, कार्यविधान, ध्येयविधान/साध्यसूत्र अशा शिडीवर बसवता येईल [cite: 53].
