१७. कामातील समग्रता

समग्रता

मागील चिंतनामध्ये भवितव्य लेखात मांडायच्या उद्दिष्टांच्या विविध प्रकारांबद्दल लिहिले होते [cite: 54]. या चिंतनामध्ये उद्दिष्टांच्या आशयासंबंधी काही विचार मांडत आहे [cite: 54]. प्रबोधिनीच्या वैशिष्ट्यांमध्ये समग्रता हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे [cite: 54]. ‘समग्र व्यक्तिगत व सामूहिक जीवनाचे तत्त्वज्ञान व आचार’ हे वैशिष्ट्य सोयीसाठी लघुरूपामध्ये समग्रता या एक शब्दामध्ये मांडले आहे [cite: 54]. भवितव्य लेखामध्ये तत्त्वज्ञान फारसे मांडायचे नसते [cite: 54]. परंतु कोणासाठी काम करायचे ? व त्या कामाची साधने आणि मार्ग कोणते याचा उल्लेख भवितव्य लेखामध्ये अत्यावश्यक आहे [cite: 54]. भवितव्य लेख तयार करण्याची सुरुवात आपण भविष्यवेध घेऊन करतो [cite: 54].

स्वप्नांचे तीन गट

कोणासाठी स्वप्ने पहायची? याचे मला तीन गट करावेसे वाटतात [cite: 54]:

  1. माझ्या स्वप्नातील मी, माझ्या स्वप्नातील प्रातिनिधिक प्रबोधक, माझ्या स्वप्नातील प्रबोधक कुटुंब [cite: 54].
  2. माझ्या स्वप्नातील माझा विभाग, माझ्या स्वप्नातील माझे केंद्र, माझ्या स्वप्नातील माझी कार्यदिशा, माझ्या स्वप्नातील माझी प्रबोधिनी [cite: 54].
  3. माझ्या स्वप्नातील गाव/खोरे/प्रदेश/तालुका, माझ्या स्वप्नातील भारत, माझ्या स्वप्नातील मानवजात [cite: 54].

अशा सगळ्यासंबंधी स्वप्ने पाहता येणे म्हणजेच समग्रता [cite: 54]. आपण ज्यांना आदर्श राष्ट्रसंत मानले आहे ते रामदास, दयानंद…