फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ दल

🚩 फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ दल 🚩

नमस्कार! 🙏🏻

आपल्या परिसरातील मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनीचे नियमित दल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

📅 दलाची सुरुवात: २७/०७/२०१५

👥 दल सुरू करणारे: तुषार दादा जोशी, गौरव दादा शिंदे

या दलामध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात.

💪🏻 दलामध्ये काय असते?

▪️ व्यायाम व शारीरिक प्रशिक्षण

▪️ विविध खेळ

▪️ पद्य

▪️ प्रासंगिके

▪️ सांघिक उपक्रम

▪️ नेतृत्व व जबाबदारीचे अनुभव

▪️ व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम

▪️ विविध कौशल्ये शिकण्याच्या संधी

▪️ वेळोवेळी विशेष उपक्रम व कार्यक्रम

या सर्व उपक्रमांमधून मुलांना केवळ खेळ आणि व्यायामच नाही, तर शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि जबाबदारी यांसारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळतात. 🤝🏻

दल म्हणजे फक्त रोज एकत्र येणे नाही, तर एकत्र शिकणे, खेळणे, अनुभव घेणे आणि स्वतःचा विकास घडवणे हा वर्षभराचा प्रवास आहे. 🚩

मुलांना मोबाईल आणि स्क्रीनच्या पलीकडे खेळ, व्यायाम, संस्कार आणि विविध अनुभवांची संधी मिळावी, यासाठी आपल्या परिसरातील मुलांनी दलावर नियमित सहभागी व्हावे. 🙌🏼

📍 दलाचे ठिकाण:सोसायटीचे मैदान, श्री महालक्ष्मी नगर सोसायटी, लेक टाऊन रोड, बिबवेवाडी

📌Location:

⏰ दलाची वेळ:संध्याकाळी ७.०० ते ८.३०

📅 शनिवार वगळता दररोज दल नियमित सुरू असते.मुलांना नवीन अनुभव मिळावेत, नवीन गोष्टी शिकता याव्यात आणि त्यांच्यातील क्षमता विकसित व्हाव्यात, यासाठी आजच दलाचा भाग बनूया! 🚩

काहीही अडचण किंवा प्रश्न असल्यास संपर्क साधा:

📞 ८७९९९७३३९२

चला, खेळूया • शिकूया • घडूया! 🚩