युवक-युवती कार्य
गेल्या वर्षभरात मध्यवर्ती युवक समितीच्या बैठकी नियमितपणे सुरू झाल्या [cite: 33]. त्या बैठकीत प्रबोधिनीच्या तीन केंद्रांवरचे युवक प्रतिनिधी आहेत [cite: 33]. गेली दोन वर्षे युवती संघटन बैठक चालू आहे [cite: 33]. त्या बैठकीला प्रबोधिनीच्या चार केंद्रांवरच्या युवती प्रतिनिधी येत असतात [cite: 33]. म्हणजे ती मध्यवर्ती युवती समितीसारखीच आहे [cite: 33]. महाविद्यालयीन वयोगटातील युवक-युवतींना प्रबोधिनीत येण्याचे नवे-नवे उपक्रम काय असू शकतील याचा विचार करणाऱ्या युवशक्ती प्रबोधन कार्यदिशेचा चिंतनगट गेल्या वर्षभरात सुरू झाला [cite: 33]. गेली आठ वर्षे नेतृत्व संवर्धन केंद्र काम करत आहे [cite: 33]. त्यातही महाविद्यालयीन युवक नव्याने प्रबोधिनीत प्रवेश करतात [cite: 33]. या सगळ्या बैठकी, गट, कार्यदिशा, विभाग यांच्या कामांना प्रबोधिनीच्या घटनेत ‘युवक-युवती कार्य’ असे म्हटले आहे [cite: 33].
स्वतंत्र संघटन आणि संपूरक समानता
युवक-युवतींचे व्यक्तिमत्त्वविकसन, युवक-युवतींचे संघटन आणि विकसित व्यक्तिमत्त्वाच्या व संघटित युवक-युवतींचा देशप्रश्न सोडवण्यात व राष्ट्रघडणीच्या कामात सहभाग व पुढाकार, हे युवक-युवती कार्याचे स्वरूप आहे [cite: 33]. यांपैकी युवकांचे व युवतींचे संघटन स्वतंत्रपणे करण्याचे प्रबोधिनीचे धोरण आहे [cite: 33]. त्यासाठी व्यक्तिमत्त्वविकसनही स्वतंत्रपणे करणे उपयुक्त असते [cite: 33]. फक्त काही शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक गुण किंवा कौशल्य वाढवणे एवढेच व्यक्तिमत्त्वविकसनाच्या उपक्रमांचे उद्दिष्ट असले तर त्या उपक्रमांमध्ये एक वेळ युवक-युवतींचे ‘सहशिक्षण’ चालून जाईल [cite: 33]. फक्त नेतृत्वगुण किंवा नेतृत्वकौशल्यांचे विकसन असे एखाद्या नेतृत्व विकसनाच्या उपक्रमाचे उद्दिष्ट असेल तर तिथे एक वेळ युवक-युवतींचे सहशिक्षण चालून जाईल [cite: 33, 34]. पण संघटनाचे साधन म्हणून व्यक्तिमत्त्वविकसन व नेतृत्वविकसनाचे उपक्रम घ्यायचे असतील तर ते स्वतंत्रपणेच घ्यावेत [cite: 34].
युवक-युवती कार्य म्हणताना संघटन हे उद्दिष्ट व इतर उपक्रम त्याचे साधन अशीच कल्पना आहे [cite: 34]. अनेक संघटनांमध्ये युवक-युवतींचे उपक्रम एकत्र चालतात [cite: 34]. मग प्रबोधिनीत स्वतंत्र उपक्रमांचा आग्रह का? सुरुवातीपासून ‘धर्मसंस्थापनेसाठी संघटना’ असे उद्दिष्ट प्रबोधिनीमध्ये मांडलेले आहे [cite: 34]. चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना ही कल्पना प्रबोधिनीमध्ये स्वीकारलेली नाही [cite: 34]. परंतु आश्रमव्यवस्थेवर आधारित व्यक्तिगत व कौटुंबिक जीवन ही भारतीय संकल्पना ग्राह्य व पुरस्कार केला पाहिजे अशी संकल्पना आहे असे प्रबोधिनी मानते [cite: 34]. त्यामुळे ब्रह्मचर्याश्रमाचा कालावधी संपेपर्यंत व पुढे ब्रह्मचर्याश्रमातच राहायचे की गृहस्थाश्रमात जायचे हे ठरेपर्यंत युवक व युवतींचे संघटन स्वतंत्रच असावे असे आपण प्रबोधिनीत म्हणत आलो आहोत [cite: 34]. गृहस्थाश्रमी झाल्यावर युवक-युवतींनी विविध कार्यदिशांनी आवश्यकतेप्रमाणे परस्परपूरक होऊन एकत्र काम करणे हे संपूरक समानतेचे प्रकटीकरणच आहे [cite: 34].
संघटना हे सूत्र बनावे
प्रबोधिनीच्या घटनेत पहिल्या पाच परिच्छेदांमध्ये नेतृत्वविकसन, व्यक्तिमत्त्व विकसन आणि त्यासाठी शिक्षणप्रणालीची निर्मिती अशी उद्दिष्टे मांडली आहेत [cite: 34]. सातव्या परिच्छेदात ही उद्दिष्टे कशासाठी त्या ध्येयाचे वर्णन केले आहे [cite: 34]. घटनेच्या परिशिष्टामध्ये हे वर्णन केलेले ध्येय म्हणजेच एका शब्दात धर्मसंस्थापना असे सांगितले आहे [cite: 34]. मधल्या सहाव्या परिच्छेदात नेतृत्वविकसन व व्यक्तिमत्त्वविकसनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे प्रबोधिनीशी जडलेले विद्याव्रताचे नाते महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणकाळात व नंतरही टिकावे असे म्हटले आहे [cite: 34]. आयुष्यभर विद्याव्रताचे नाते टिकण्यासाठीचे तंत्र म्हणजे संघटना [cite: 34]. विद्याव्रताच्या नात्यातून राष्ट्रीय कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी प्रथम मैत्री व स्नेहाच्या सूत्राने बांधले जावे लागते व नंतर समान ध्येयाच्या सूत्राने बांधले जावे लागते [cite: 34]. हे स्नेहबंधन, ध्येयबंधन व कार्यपद्धतीचे बंधन म्हणजे संघटना करणे [cite: 34].
