८. विस्तारक्षम प्रबोधिनी – २

कोणत्याही नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे काम सुरू होणे म्हणजे, शैक्षणिक कार्य, युवक-युवती कार्य व सामाजिक ऐक्याचे काम सुरू होणे असे या आधीच्या महिन्यात लिहिले होते [cite: 30]. युवक-युवती कार्य म्हणजे युवक-युवतींमध्ये समूहगुणविकसन व नेतृत्वगुण विकसनाचे काम [cite: 30]. त्याबरोबर युवक-युवतींमध्ये भारतीय संस्कृती व परंपरेचा अभिमान, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय प्रेरणा व स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव निर्माण करण्याचे काम [cite: 30]. सामाजिक ऐक्याचे काम म्हणजे संप्रदाय, जात, भाषा, प्रांत, आर्थिक गट, शारीरिक दुर्बलता या भेद पाडू शकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सर्वांमधील समान राष्ट्रीयत्वाच्या भावनेला पुढावा देणे [cite: 30].

युवक-युवती कार्य

युवक-युवती कार्याची उदाहरणे म्हणजे क्रीडादले, विज्ञानदले, उपासनाकेंद्रे, कलादले, अभ्यासिका, विकासिका, अभ्यासबैठकी या सारखे नियमित जमण्याचे उपक्रम आणि या नियमित उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या युवक-युवतींसाठी अभ्यासदौरे, अभ्याससहली, साहससहली, अभ्यासशिबिरे, प्रात्यक्षिके, प्रकल्प व प्रदर्शने, श्रमकार्य, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, मदतकार्य, ग्रामीण परिचय शिबिरे, समूहजीवन शिबिरे यासारखे प्रासंगिक उपक्रम [cite: 30]. शालेय व महाविद्यालयीन गटांसाठी या नियमित व प्रासंगिक उपक्रमांचे स्वरूप वयानुसार वेगवेगळे असू शकेल [cite: 30]. काही युवक-युवती प्रासंगिक उपक्रमांच्या निमित्ताने येतील, त्यांना नियमित उपक्रमांना येण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल [cite: 30]. काही युवक-युवती नियमित उपक्रमांना उपस्थित असतील, त्यांना प्रासंगिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल [cite: 30]. योजक गटाला नियमित व प्रासंगिक उपक्रम योजण्याचे कौशल्य मिळवावे लागेल [cite: 31].

सामाजिक ऐक्याचे उपक्रम

सामाजिक ऐक्याचे उपक्रम योजताना आवर्जून प्रयत्नपूर्वक समाजातील विविध गटांशी संपर्क साधून, त्यांतील व्यक्तींना उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल [cite: 31]. सभा, संमेलन, परिसंवाद, पथनाट्य, अभिवादन फेरी, भजन, प्रवचन, सामूहिक उपासना, मातृभूमिपूजन, स्नेहमेळावा, हळदीकुंकू अशासारख्या कार्यक्रमांमध्ये भेदांवर भर न देता आवर्जून ऐक्येच्या समान भूमिकेला आवाहन करावे लागते [cite: 31]. योजक गटाचा समाजात व्यापक लोकसंपर्क त्यासाठी असायला लागतो [cite: 31].

स्त्री-शक्ती प्रबोधन

चाळीस वर्षांपूर्वी युवक-युवती कार्य व सामाजिक ऐक्याचे काम ही कामे सांगितली होती [cite: 31]. या यादीत वीस वर्षांपूर्वी स्त्री-शक्ती प्रबोधनाच्या कामाची भर पडली आहे [cite: 31]. स्त्रियांसाठीचे बचत गट, भजनी मंडळ, वाचन-चर्चा बैठक, व्याख्यान व चर्चा, अभ्यास व कृतीगट असे उपक्रम स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी, परंतु त्यांचेही समूहगुण विकसन व नेतृत्व विकसन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून योजले पाहिजेत [cite: 31].

नवीन संपर्क केंद्रात, उपक्रम केंद्रात व विस्तार केंद्रात शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकसनासाठी विकासिका व विद्याव्रत संस्कार आणि/किंवा स्त्री-शक्ती प्रबोधनासाठी प्रौढ महिलांचे संवादिनी दल या उपक्रमांपासून कामाला सुरुवात होते [cite: 31]. काही वर्षांनंतर त्यामध्ये युवक-युवती कार्य व सामाजिक ऐक्याच्या कामाची भर पडायला हवी [cite: 31]. विकासिका, विद्याव्रत संस्कार, संवादिनी दल हे व्यक्तिमत्त्व विकसनासाठी अनुभवातून शिकण्याचे उपक्रम आहेत [cite: 31]. सुरुवातीच्या कामांच्या यादीत शैक्षणिक कार्य म्हटले आहे ते हेच [cite: 31].

शैक्षणिक कार्य

विस्तार केंद्रांच्या ठिकाणी नवीन शाळा सुरू करायच्या नाहीत असे धोरण ठरल्याचे या आधीच्या महिन्याच्या चिंतनात लिहिले होते [cite: 31]. मग शैक्षणिक कार्य म्हणजे काय असा प्रश्न वरवरचा विचार करणारांना पडतो [cite: 31]. व्यक्तीने कोणतेही काम करायचे झाले तर त्या व्यक्तीच्या क्षमता व कौशल्ये विकसित व्हावी लागतातच [cite: 31]. तो व्यक्तिमत्त्वविकसनाचा भाग आहे [cite: 31]. प्रबोधिनीला अपेक्षित व्यक्तिमत्त्वविकसनात त्याबरोबर समूहगुणविकसन, नेतृत्वविकसन, सामाजिक व राष्ट्रीय चारित्र्याचे व प्रेरणेचे विकसनही अपेक्षित आहे [cite: 31]. यासाठीच विद्याव्रत संस्कारामध्ये राष्ट्रअर्चनेचे व्रत समाविष्ट केलेले आहे [cite: 32].

योजक गट महत्त्वाचा

ही सगळी कामे करणाऱ्या योजक गटाला त्यासाठी सहविचार व स्वावलंबनाची कार्यपद्धती शिकून घ्यायला लागेल [cite: 32]. त्यासाठी विस्तार केंद्रांमधील सदस्यांचा वार्षिक प्रशिक्षण वर्ग व वार्षिक प्रदीर्घ बैठक आपण योजत असतो [cite: 32]. नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे काम सुरू करणे म्हणजे कोणते उपक्रम योजायचे व ते का योजायचे हे आपण पाहिले [cite: 32]. त्या त्या ठिकाणच्या योजक गटाने काय शिकायला पाहिजे त्याचाही उल्लेख केला [cite: 32]. कोणतेही संपर्क केंद्र, उपक्रम केंद्र किंवा विस्तार केंद्र चालवणारा तिथला योजक गट हा या सगळ्या कामाचा गाभा आहे [cite: 32]. या योजक गटाला नियोजन कौशल्ये, कार्यवाहीची कौशल्ये, आर्थिक चोखपणा, संवाद व संपर्क कौशल्ये, प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करणे हे शिकावे लागते [cite: 32]. प्रबोधिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमधील उपासना, प्रार्थना, वर्षारंभ, वर्षान्त, प्रतिज्ञाग्रहण, परिस्थिती ज्ञान, भवितव्य लेख, इत्यादी शब्दांची ओळख करून घ्यावी लागते [cite: 32]. त्यांचा आशय समजून घ्यावा लागतो [cite: 32].