द्वितीय प्रतिज्ञेमध्ये राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापनेचा संकल्प आहे [cite: 14]. प्रबोधिनीच्या घटनेतच धर्मसंस्थापनेच्या अर्थाचे स्पष्टीकरण दिले आहे [cite: 14]. प्रबोधिनीच्या घटनेतील उद्देशांच्या सात परिच्छेदांपैकी सातव्या आणि शेवटच्या परिच्छेदात ‘देशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, देशात पुनर्जागरण होऊन देशात व समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे’ हा सर्व कार्यामागचा मुख्य हेतू आहे, असे लिहिले आहे [cite: 14]. घटनेच्या दुसऱ्या परिशिष्टात ज्ञान प्रबोधिनीचे अंतिम ध्येय धर्मसंस्थापना करणे आहे, असे लिहिले आहे [cite: 14]. अपेक्षित धर्मसंस्थापना म्हणजे उद्देशांच्या परिच्छेदात लिहिलेली विचारप्रबोधन ते नवचैतन्य निर्माण होणे ही पाच कामे असे पुढे सूचित केले आहे [cite: 14].
प्रबोधिनीच्या तिसऱ्या खंडातील तत्त्वसप्तक लेखमालेमध्ये धर्मसंस्थापनेवरील लेखात धर्मसंस्थापनेसाठी काय करावे लागेल अशा पाच गोष्टी दिल्या आहेत [cite: 14]. घटनेतील हेतू व या पाच गोष्टी यांची एकास एक अशी संगती काही प्रमाणात लावता येते [cite: 14]. अर्थात घटनेतील हेतू व्यापक आहेत तर तत्त्वसप्तक लेखातील गोष्टी नमुन्यादाखल दिल्या आहेत असे मला वाटते [cite: 14]. आपल्या संघटनेच्या ध्येयाच्या ‘आड आणि आडव्या येणाऱ्या भ्रष्ट, दुष्ट, विध्वंसक, स्वमतांध व्यक्ती आणि शक्ती यांचा पौरुषयुक्त प्रतिकार’ हे तत्त्वसप्तकातील लेखात दिलेले काम ‘कार्यप्रबोधन’ या हेतूसाठीचा केवळ एक भाग आहे [cite: 14].
कार्यप्रबोधन म्हणजे स्वतःला काम करण्याला प्रवृत्त करणे व इतरांनाही कामाला उद्युक्त करणे [cite: 14]. हे काम का करायचे, कसे करायचे, कुठे, किती करायचे, हे सर्व आधी ठरवता येणे आणि मग कामाला लागणे म्हणजे कार्यप्रबोधन [cite: 15]. प्रबोधिनीच्या घटनेत उद्देशांच्या सात परिच्छेदांनंतर उपक्रमांचे नऊ परिच्छेद आहेत [cite: 15]. ते वाचताना कार्यप्रबोधन म्हणजे काय हे हळूहळू उलगडत जाते [cite: 15].
‘व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी, शेती-बागायती किंवा अन्य प्रकारच्या स्वतंत्र क्षेत्रांत विशेष कर्तृत्व संपादन करण्याची ईर्ष्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे’ असा एक उपक्रम घटनेत सुचवला आहे (परिच्छेद ४.३.१) [cite: 15]. हे वाक्य वाचल्यावरच ‘…. भव्य कृति काहि पराक्रमाची ईर्ष्या निजांतरि धरूनि ….’ या प्रार्थनेतल्या ओळी आठवतात [cite: 15]. ‘अन्य प्रकारच्या स्वतंत्र क्षेत्रांत’ संशोधन, व्यवस्थापन, प्रशासन, संरक्षण, शिक्षण, पत्रकारिता अशा कितीतरी क्षेत्रांचा समावेश करता येईल [cite: 15]. उपक्रमांच्या परिच्छेदांमध्ये पुढेही यासारख्या अनेक क्षेत्रांचा उल्लेख आला आहे [cite: 15].
घटनेत उल्लेख नसलेले पाणलोट क्षेत्र विकास, ऊर्जा विकास, बचत गट चालवणे, संस्कार पोथ्यांची निर्मिती, अभिव्यक्ती विकास, शिशु शिक्षण, समुपदेशन, बुद्धिमापन व कलचाचण्या घेणे, अशाही अनेक क्षेत्रांमध्ये, प्रबोधिनीचे कार्यकर्ते स्वतः काम करत असतात, इतरांना प्रशिक्षण देत असतात [cite: 15]. प्रबोधिनीचे काम पाहून समाजातले इतर अनेक जण परस्पर त्याची आवृत्ती करत असतात [cite: 15]. अशी सर्व कामे करणे, करविणे, आणि आपल्या कामाची परस्पर आवृत्ती करणाऱ्यांना अनुमोदन व प्रोत्साहन देणे म्हणजे कार्यप्रबोधन [cite: 15].
विद्यार्थ्यांमध्ये ईर्षा निर्माण करणे हा कार्यप्रबोधनाचा एक भाग [cite: 15]. ‘ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीकरिता प्रबोधिनीच्या वतीने प्रत्यक्ष ग्रामविकासाचे प्रकल्प अथवा योजना अंगीकारणे व त्या चालविणे’ असेही वाक्य उपक्रमांच्या परिच्छेदांमध्ये आहे (परिच्छेद ४.३.२) [cite: 15]. ‘जनतेच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीकरिता’ असे म्हटल्यावर त्यात अनुक्रमे समाजसंघटनाचे, आणि समाजविकासाचे, प्रदेशविकासाचे सर्वच उपक्रम येतात [cite: 15]. ग्रामीण जनतेला स्वावलंबन शिकवले पाहिजे [cite: 15]. शहरी जनतेला सेवा शिकवली पाहिजे [cite: 15]. पण यातून फक्त प्राधान्य कळते [cite: 15]. ग्रामीण जनतेला स्वावलंबनाबरोबर सहकार्य आणि सेवा करायला शिकवावे लागते [cite: 15]. आणि शहरी जनतेला इतरांच्या सेवेसाठी जाण्याबरोबर सहकार्य आणि स्वावलंबन शिकवावे लागते [cite: 15]. स्वावलंबन, सहकार्य व सेवेची प्रेरणा आणि वृत्ती निर्माण करणे म्हणजेच सांस्कृतिक उन्नतीकरिता प्रयत्न करणे [cite: 15, 16]. ग्रामीण व शहरी जनता असे घटनेत म्हटल्यामुळेच आपण नागरी वस्त्यांमध्येही काम सुरू केले [cite: 16].
१८५० ते १९५० आणि १९५० ते २०२० या कालखंडांतील अनेक व्यक्तींचे चरित्र आणि कार्य समोर ठेवले तर कार्यप्रबोधन म्हणजे काय हे समजू शकेल [cite: 16]. जमशेटजी टाटा, वालचंद हिराचंद, लक्ष्मणराव किर्लोस्कर, महर्षी कर्वे, विश्वेश्वरय्या, भगिनी निवेदिता, दुर्गाबाई देशमुख, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, कमलाबाई सोहोनी ही पहिल्या कालखंडातली (१८५० ते १९५०) काही नावे आहेत [cite: 16]. तर नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी, एस. एम. जोशी, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई, वसंतराव गोवारीकर, अब्दुल कलाम, धनंजयराव गाडगीळ, विलासराव साळुंके, इलाबेन भट्ट ही दुसऱ्या कालखंडातील (१९५० ते २०२०) काही नावे आहेत [cite: 16]. अशी विविध क्षेत्रांतली आणखी अनेक नावे आणि त्यांचे काम आपल्याला सुचले म्हणजे कार्यप्रबोधन ही संकल्पना आपल्याला अधिक समजली [cite: 16].
