४. कार्यप्रबोधन व कार्यपद्धती

कोरोनामुक्तीसाठी लोकसहभाग

दि. १ चैत्रला कार्यप्रबोधन या विषयावर मासिक चिंतन लिहिले [cite: 17]. दि. २ चैत्रला दिवसभर जनता कर्फ्यू होता [cite: 17]. तेव्हापासून दि. ३१ चैत्र म्हणजे कालपर्यंत पूर्ण ३० दिवस म्हणजे एक महिनाभर कोरोनाची साथ पसरतच आहे [cite: 17]. आता देशाच्या काही भागात संचारबंदी-व्यवसायबंदी थोडी सैल होईल, काही भागात ती आणखी कडकही होईल [cite: 17]. गेल्या महिनाभराकडे मी कार्यप्रबोधनाचा एक वस्तुपाठ म्हणून पाहतो; आदर्श म्हणून नाही, तर काय करावे, कसे करावे आणि काय व कसे करू नये हे कळावे यासाठी [cite: 17]. कार्यप्रबोधनामध्ये प्रबोधन हे साधन आहे आणि कार्य हा अपेक्षित परिणाम आहे [cite: 17]. प्रबोधन व्हावे म्हणून जाहिराती, सूचना, मुलाखती, भाषणे, अनुभवकथन, चित्रफिती, प्रचाराची गाणी खूप झाली [cite: 17]. पण त्यातून लोकांच्या वागण्यात म्हणजे काम करण्यात बदल झाला नाही, तर त्याला कार्यप्रबोधन म्हणता येणार नाही [cite: 17]. साथ पसरू नये यासाठी सर्व लोकांनी कसे वागले पाहिजे, हे विविध मार्गांनी सांगणे म्हणजे प्रबोधन [cite: 17]. त्यात सांगणे, शिकवणे, धाक दाखवणे, शिक्षा करणे हे सगळेच आले [cite: 17]. लोक सांगितल्याप्रमाणे वागायला लागले व साथ आटोक्यात आली तर कार्यप्रबोधन झाले म्हणायचे [cite: 17]. नाही आटोक्यात आली तर नाही झाले म्हणायचे [cite: 17].

मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure – S.O.P.)

सर्व लोकांचे कार्यप्रबोधन झाले नाही, तरी डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय व्यवस्थापक, प्रशासनातील अधिकारी व सेवक, पोलीस कर्मचारी व अधिकारी, स्वच्छता कर्मचारी अशा अनेकांचे कोरोना साथीच्या संदर्भात कार्यप्रबोधन निश्चित झाले [cite: 17, 18]. या सर्वांचे साथीच्या रोगाच्या काळात कसे वागायचे याचे काही ना काही प्रशिक्षण मानक कार्यपद्धतीनुसार म्हणजे ठरवून दिलेल्या चाकोरीनुसार आधी झालेले होते [cite: 18]. यापूर्वीच्या साथीच्या काळात काहींना त्यानुसार काम करण्याचा अनुभवही मिळाला असेल [cite: 18]. पण पाण्यातून, खाण्यातून, कीटक चावण्यातून संसर्ग व्हायच्याऐवजी श्वासातून संसर्ग होणारा रोग आल्यावर साथसोवळे (सोशल डिस्टन्सिंग) या नवीन उपाययोजनेबाबत त्या सर्वांना शिकायला लागले [cite: 18]. रूढीनुसार, सवयीनुसार किंवा मानक कार्यपद्धतीनुसार असलेल्या वागण्यामध्ये बदल करून, नव्या प्रकारे वागायला शिकणे व त्यातून अपेक्षित परिणाम घडवणे म्हणजे कार्यप्रबोधन [cite: 18].

कामाला काही शिस्त किंवा पद्धत नसेल तर मानक कार्यपद्धती शिकणे किंवा शिकवणे म्हणजे कार्यप्रबोधन १.० [cite: 18]. पण उद्दिष्टानुसार किंवा अपेक्षित परिणामांनुसार मानक कार्यपद्धतीत सुधारणा करणे म्हणजे कार्यप्रबोधन २.० [cite: 18].

उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता

प्रबोधिनीमध्ये कार्यप्रबोधनाचा विचार करताना तत्त्वसप्तकापैकी उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता या तत्त्वांची दखल घ्यायला पाहिजे [cite: 18]. आपल्या कामाची बहिरंग उत्तमता म्हणजे वेग, कार्यक्षमता, कुशलता, साधनांची देखभाल, या सर्व गोष्टी वाढवत नेण्यासाठी कार्यपद्धतीत छोट्या-मोठ्या सुधारणा सतत कराव्या लागतात [cite: 18]. ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार कार्यपद्धतीत बदल करण्याबरोबर, हेतू (प्रयोजन), प्रभाव, अभिनवता व आशयपूर्णता या चार गोष्टींचा विचार करून कामातील गुणवत्ता वाढवण्यासाठीही बदल सुचणे व करणे म्हणजे कार्यप्रबोधन ३.० [cite: 18].

काम करत असताना उपजात किंवा सहज हालचालींमध्ये कलात्मकता आणणे, कला-कौशल्यांचे शास्त्र (म्हणजेच मानक कार्यपद्धती) तयार करणे, अनेक शास्त्र-परंपरांमधून नवनवीन प्रयोगांच्या आधारे नवे विज्ञान तयार करत जाने आणि न सुटलेल्या प्रश्नांची सीमारेषा पुढे रेटत असताना नव्या प्रयोगांसाठी अंतःस्फूर्ती आणि प्रतिभेचा आधार घेणे म्हणजे विज्ञानाभिमुखता [cite: 18]. अशी विज्ञानाभिमुखता कामात आणायला शिकणे आणि शिकविणे म्हणजे कार्यप्रबोधन ४.० [cite: 18].

समूहाचे प्रेरणाजागरण

व्यक्तीचे प्रेरणाजागरण झाले पाहिजे असे आपण म्हणतो [cite: 18]. राष्ट्रार्थ पराक्रमाची कृती करण्यासाठी सर्व समाजाचे व त्यातल्या अनेक लोकसमूहांचे प्रेरणाजागरण करणे, म्हणजे समाजात कार्यप्रबोधन करणे [cite: 18, 19]. देशाचे भौतिक रूप पालटायचे असेल तर ते मध्यपूर्वेतल्या देशांप्रमाणे पैसे खर्च करूनही पालटता येईल [cite: 19]. पण देशाचे भौतिक व सांस्कृतिक रूप आपल्या कार्यशक्तीने पालटायचे असेल तर ते कार्यप्रबोधन करूनच पालटायला लागेल [cite: 19]. सामूहिक पराक्रमाचे अनेक मार्ग व नवीन संधी दाखवूनच हे कार्यप्रबोधन करायला लागेल [cite: 19].

आधीच्या चिंतनात प्रबोधिनीच्या घटनेतील उपक्रमांच्या परिच्छेदांचा मी उल्लेख केला होता [cite: 19]. नऊपैकी दोन परिच्छेदांची त्यात तपशिलात चर्चा केली होती [cite: 19]. पुढच्या परिच्छेदांमध्ये एकूण अकरा प्रकारच्या कामांचा उल्लेख आला आहे [cite: 19]. विज्ञानाभिमुख राहून, उत्तमतेचा आग्रह धरत, विविध कार्यगटांसाठी मानक कार्यपद्धती तयार करत या आधीच्या महिन्याच्या चिंतनात उल्लेख केलेल्या कामांशिवाय ही कामेदेखील करणे आणि करविणे म्हणजे कार्यप्रबोधन करणे [cite: 19]. अकरा प्रकारची कामे अशी:

  1. युवक-युवती कार्य : क्रीडा केंद्रांचे संचालन, क्रीडा-संस्कृतीला प्रोत्साहन (कबड्डी, मुष्टियुद्ध, फुटबॉल इ. खेळ; पक्षी-निरीक्षण, पदभ्रमण, गिर्यारोहण, समुद्र-पर्यटन, ग्लायडिंग) [cite: 19].
  2. यांत्रिकी, विद्युत्-यांत्रिकी, विद्युत्-अणुशास्त्र, स्थापत्य, मास-कम्युनिकेशन, संगणकशास्त्र, संदेश-वहन शास्त्र, सायबरनेटिक्स्, इ. शास्त्रांतील प्रकल्प [cite: 19].
  3. जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, इ. विविध विद्याशाखांचा शास्त्रीय, तात्त्विक, तांत्रिक अभ्यास व संशोधन [cite: 19].
  4. आरोग्य आणि वैद्यकीविषयक प्रकल्प, रुग्ण सेवा, नैसर्गिक आपत्तीनंतरचे मदत कार्य [cite: 19].
  5. व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय माहिती केंद्र चालवणे [cite: 19].
  6. राष्ट्रीय अथवा सामाजिक ऐक्येचे उपक्रम व सामाजिक समतेचे उपक्रम चालवणे [cite: 19].
  7. अनौपचारिक शिक्षण, तंत्रज्ञानाचा विकास, नवीन शेती-तंत्रांचा प्रसार, व्याख्यानमाला व चर्चासत्रे चालवणे, पुस्तके व पत्रके काढणे [cite: 19].
  8. सामाजिक दुरितांचे म्हणजेच अन्याय, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, इ. चे निर्मूलन [cite: 19].
  9. भौतिक, सामाजिक व औद्योगिक विकासाला चालना देणे, बचतीची सवय लावणे [cite: 19].
  10. अनेकांमध्ये निःस्वार्थ वृत्तीने कामाची आवड निर्माण करण्याचे म्हणजेच संघटनाचे गाभ्याचे काम (कै. आप्पांच्या लेखात आले आहे) [cite: 20].
  11. विविध प्रकारच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी व सार्वजनिक अशा अन्य संस्थांच्या बरोबर काम करण्याचे म्हणजेच पूल बांधण्याचे काम [cite: 20].

असे कार्यप्रबोधन करणे म्हणजेच धर्मसंस्थापना-समाजसंस्थापना-राष्ट्रघडण करण्याला सुरुवात करणे [cite: 20].