समाजसंस्थापनेसाठी तत्त्वसप्तक
आधीच्या चिंतनात स्थितिशील देशभक्ती आणि गतिशील मातृभूमिपूजन यासंबंधी लिहिले आहे [cite: 24]. पूजा हा तमिळ शब्द आहे [cite: 24]. फुलं देऊन एखाद्याला प्रसन्न करणे म्हणजे पूजा करणे [cite: 24]. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या प्रसिद्ध कवितेमध्ये ‘गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे’ अशी ओळ आहे [cite: 24]. मातृभूमिपूजन करायचे ते आपल्या गुणांची फुले मातृभूमीला वाहून [cite: 24]. आपले गुण मातृभूमीला वाहायचे म्हणजे आपल्या गुणांचा उपयोग मातृभूमीसाठी, म्हणजेच आपल्या मातृभूमीत राहणाऱ्या सर्व लोकांसाठी करणे [cite: 24].
पूजा हा जसा तमिळ शब्द आहे तसा ‘अर्चना’ हा संस्कृत शब्द आहे [cite: 24]. त्याचा अर्थ शास्त्रोक्त पूजा करणे असा आहे [cite: 24]. ‘हे वीर विवेकानंद’ या पद्यामध्ये “जी जीवनपुष्पे सतेज नवरक्ताची। स्थापावा त्यांनी धर्म आत्म अर्पूनी। त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची” असे एक कडवे आहे [cite: 24]. गुणांनी पूजा करायच्या ऐवजी आपले जीवनच मातृभूमीला वाहायचे आणि ते वाहताना शास्त्रानुसार वाहायचे, म्हणजे निश्चित पद्धतीनुसार वाहायचे असे त्यात म्हटले आहे [cite: 24].
गती म्हटली तर, दिवाळीतल्या बाण आणि चमनचिडी या शोभेच्या दारूच्या प्रकारांनादेखील, त्यांची वात पेटवल्यावर गती मिळते [cite: 24]. पण ते कुठल्या दिशेने जातील हे कुणालाच सांगता येत नाही [cite: 24]. गतिशील मातृभूमिपूजनामध्ये गतीबरोबर दिशासुद्धा निश्चित असणे अपेक्षित आहे [cite: 24]. मातृभूमीला गुण वाहण्यापासून सगळे जीवन वाहण्यापर्यंत पूजन करणाऱ्याची प्रगती झाली पाहिजे [cite: 24]. आणि लोकांना आपले गुण उपयोगी पडण्यापासून समाजसंस्थापना होईपर्यंत काम करणे ही मातृभूमिपूजनाची दिशा असली पाहिजे [cite: 24, 25]. समाजसंस्थापना म्हणजे काय, आणि ती कशी करायची, हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीची सात मूलभूत तत्त्वे किंवा तत्त्वसप्तक मांडले आहे [cite: 25]. (गाण्यातील सा-रे-ग-म-प-ध-नी या सात सुरांना एकत्रितपणे सप्तक म्हणतात [cite: 25]. त्याच चालीवर आपल्या सात तत्त्वांना एकत्रितपणे तत्त्वसप्तक असे म्हटले आहे [cite: 25].)
प्रबोधिनीचे काम आवडणारे आणि प्रबोधिनीचे काम करू इच्छिणारे अनेक जण असे असतात, की त्यांना विचार करायचे वावडे म्हणजे अॅलर्जी असते [cite: 25]. ते असे म्हणताना मी ऐकले आहे, की संघटना, विकास, उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही प्रबोधिनीची चार तत्त्वे आम्हाला काम करण्यासाठी पुरेशी आहेत [cite: 25]. हे शब्द समाजात अनेकजण वापरत असल्याने ते ऐकल्यावर ओळखीचे वाटतात आणि त्यामुळे आपल्याला ते समजले असे वाटते [cite: 25]. पण, यांतल्या एक, दोन किंवा सर्व तत्त्वांप्रमाणे काम करण्यासाठी अनेक संस्था आहेत [cite: 25]. त्यासाठी वेगळ्या ज्ञान प्रबोधिनीची तशी गरज नाही [cite: 25].
याशिवाय जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी आणि समाजसंस्थापना अशी प्रबोधिनीची आणखी तीन तत्त्वे आहेत [cite: 25]. प्रबोधिनीसाठी ती महत्त्वाची तत्त्वे आहेत [cite: 25]. ज्या कामात उत्तमता आणि वैज्ञानिक दृष्टी आहे त्या कामांनीच विकास होतो [cite: 25]. पण एकट्या दुकट्याने अशी कामे करून समाजात विकास झाल्याचे जाणवत नाही [cite: 25]. विकास झाल्याचे जाणवण्यासाठी अनेकांच्या संघटित प्रयत्नाने, उत्तमता राखत आणि वैज्ञानिक दृष्टी जपत कामे करावी लागतात [cite: 25]. पण, अशी कामे झाल्याने समाजसंस्थापना होतेच असे नाही [cite: 25].
विवेकानंदांनी म्हटले आहे विराटाची पूजा करा [cite: 25]. म्हणजे आपल्या देशातील आर्त, अज्ञ, दीन, दरिद्री आणि रुग्णांची सेवा करा [cite: 25]. अशांची सेवा म्हणजेच मातृभूमिपूजन किंवा विराटाची पूजा [cite: 25]. पूजा करत आहोत अशा भावनेने अशा लोकांची सेवा करणे म्हणजे जनी जनार्दन ऐसा भाव [cite: 25]. जन म्हणजे सर्व लोक, ज्याच्याकडे अर्दन करतात म्हणजे मागणे मागतात, तो जनार्दन म्हणजे परमेश्वर [cite: 25]. जनांची सेवा करणे, म्हणजे जनांमधील जनार्दनाची सेवा करणे असा भाव मनात ठेवणे, हे हिंदू जीवनदृष्टीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे [cite: 25].
याशिवाय हिंदू जीवनदृष्टीची इतर लक्षणेही समजून घेतली पाहिजेत [cite: 25]. अशा जीवनदृष्टीने काम करणे म्हणजे ज्यांच्याकडे विद्या, संपत्ती, आरोग्य, सामर्थ्य नाही त्यांना ते देणे एवढेच नाही [cite: 25, 26]. त्याबरोबर समाजात नेहमीच नीतिमंत श्रीमंती, वैभव आणि सर्व क्षेत्रांत जय मिळतो, अशी स्थिती येण्यासाठी हिंदू जीवनदृष्टीने काम करावे लागते [cite: 26]. अशी स्थिती आणणे म्हणजेच समाजसंस्थापना करणे [cite: 26].
समूहगुण विकसनाचे आणि संघटनेचे काम करणाऱ्यांनी, काम करता करता ही तत्त्वे समजून घेतली, तर ते प्रबोधिनीला अपेक्षित काम म्हणजेच गतिशील मातृभूमिपूजन करू शकतील [cite: 26].
हे समजून घेण्यासाठी एक क्रम मी सुचवतो [cite: 26]. देशाचे रूप पालटायचे म्हणजे देशाचे भौतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रूप पालटावे लागते [cite: 26].
- भौतिक रूप: पालटण्यासाठी विकास या तत्त्वातील ‘व्यक्तिविकासाच्या कल्पना’ आणि ‘कौशल्यपूर्ण काम’ हे दोन मुद्दे आधी समजून घ्यावेत [cite: 26]. नंतर विज्ञानाभिमुखता या तत्त्वातील ‘वस्तुनिष्ठ निरीक्षण’ आणि ‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा संबंध’ हे दोन मुद्दे समजून घ्यावेत [cite: 26].
- सामाजिक रूप: पालटण्यासाठी, संघटना या तत्त्वातील ‘संचाधारित संघटना’ आणि ‘कार्यकर्त्याचे गुण’ हे दोन मुद्दे समजून घ्यावेत [cite: 26]. त्यानंतर उत्तमता या तत्त्वातील ‘उत्तमतेच्या साधनेतील धोके’ व ‘समान संधीऐवजी विशेष संधी’ हे दोन मुद्दे समजून घ्यावेत [cite: 26].
- सांस्कृतिक रूप: पालटण्यासाठी हिंदू जीवनदृष्टी या तत्त्वातील, आप्पांनी केलेली ‘चार श्लोकांमधील हिंदूपणाची व्याख्या’, आणि ‘ज्याला बहुसंख्याक लोक भारतीयत्व म्हणतात तेच हिंदुत्त्व आहे’, हे दोन मुद्दे समजून घ्यावेत [cite: 26]. त्याबरोबर जनी जनार्दन ऐसा भाव हे तत्त्व समजण्यासाठी ‘ज्यांच्याभोवती अनुकूल परिस्थिती नाही त्यांची सेवा’ आणि ‘त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून, त्यांच्यामधूनच त्यांच्या समाजगटाची सेवा करणारे कार्यकर्ते उभे करणे’, हे दोन मुद्दे समजून घ्यावेत [cite: 26].
या सहा तत्त्वांमधील हे बारा मुद्दे समजले, तर आपल्याला समाजसंस्थापना म्हणजे काय हे समजू लागले [cite: 26]. ते अधिक स्पष्ट होण्यासाठी ‘धर्म म्हणजे उपासना पंथ नव्हे’, आणि ‘समाजात जीवनमूल्यांचे महत्त्व प्रस्थापित करणे व त्या जीवनमूल्यांमध्ये कोणत्याही पद्धतीने व कोणत्याही आदर्शाची उपासना करण्याचे स्वातंत्र्य हे मूल्य समाविष्ट असणे’, हे मुद्दे पण समजून घ्यावेत [cite: 26].
शालेय युवक-युवतींची दले असोत, महाविद्यालयीन युवक-युवतींची दले असोत, ग्रामीण किंवा शहरातील किशोरी विकासाचे कार्यक्रम असोत, नागरी वस्त्यांमधील किंवा गावागावांमधील युवकांचे स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे कार्यक्रम असोत, महिला बचत गट असोत किंवा संवादिनीचे बैठकगट किंवा कार्यगट असोत, यांपैकी कोणतेही काम करणाऱ्या प्रबोधक-प्रबोधिकांनी प्रबोधिनीच्या मूलभूत विचार तत्त्वांमधील वरील चौदा मुद्दे काम करता करता समजून घेतले पाहिजेत [cite: 26, 27]. समजलेले आपल्या कामात उतरवले पाहिजे [cite: 27]. हा स्वाध्याय आपण सर्वांनी केला, तर आपल्या स्थितिशील देशभक्तीचे रूपांतर गतिशील मातृभूमिपूजनात होईल [cite: 27].
