अनौपचारिक शिक्षण प्रश्न क्र. ३०

आपण प्रबोधिनातील सर्वांसाठी योगासने अनिवार्य का करत नाही?

योग म्हणजे संयमित जीवन. भोग म्हणजे स्वच्छंद जीवन. या दोन वेगवेगळ्या जीवनशैली आहेत. जीवनशैली स्वतःच निवडावी लागते. तिची सक्ती करता येत नाही. जीवनशैली अनिवार्य केली की फक्त तिचे वरवरचे नाटक होते. संधी मिळताच दुप्पट वेगाने वेगळी जीवनशैली विरोधासाठी विरोध म्हणून स्वीकारली जाते.

योगासने ही योग या जीवनशैलीचा एक भाग आहेत असे आपण मानतो, म्हणून ती अनिवार्य करत नाही. एखाद्या उपक्रमापुरती किंवा अभ्यासक्रमापुरती त्यात सहभागी सदस्यांसाठी केवळ एक व्यायामप्रकार म्हणून किंवा केवळ एक उपचार पद्धती म्हणून योगासने अनिवार्य करता येतील. तसे आपण करतोही. परंतु कायमाची व सर्वांसाठी योगासने अनिवार्य करणे व्यवहार्य नाही. आपल्या जीवनशैली विषयक भूमिकेला ते छेद देणारेही होईल.