प्रत्येक अभ्यास शिबिरामध्ये साधारणपणे शेवटच्या दिवशी आपण परिसंवाद ठेवत असतो. आणि त्या परिसंवादामध्ये आधीच्या दोन-तीन-चार दिवसात काय अभ्यास झाला, त्यातला कुठलातरी एक विषय घेऊन प्रत्येकाने मांडायचा असतो. तसं आजही त्याला परिसंवाद म्हटलं नसलं तरी परिसंवाद झाला दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत. प्रत्येकानेच एक-एक विषय निवडून त्याच्यावरती काहीतरी आपलं म्हणणं मांडलं आहे, प्रश्नही मांडलेले आहेत.
तसं जे लेख लिहिलेले असतात ते बराच मोठा गट डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले असतात आणि त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही त्याच्यामध्ये आलेली नसतात. त्यामुळे वाचता-वाचता आपल्याला प्रश्न पडणं नैसर्गिक आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांनाही देता येतात, ज्यांना माहिती आहे त्यांनाही विचारता येतात आणि त्याच्यातून त्या लेखातला आशय सुद्धा अधिक पक्का होतो.
तर सगळ्यांचे विषय मी काल पाहिले. शुभंकरनी पाठवली होती यादी कोण कुठल्या विषयावर आज बोलणार आणि असं लक्षात आलं की तत्वसप्तकापैकी धर्मसंस्थापना या तत्वावरती कोणीच बोलणार नाही. त्यामुळे समारोपामध्ये त्या तत्वावरतीच थोडसं बोलावं असं वाटतं.
पहिल्यांदा त्या शब्दाबद्दल, तो शब्द वापरावा न वापरावा त्याच्या ऐवजी राष्ट्रघडण म्हणावं का समाजसंस्थापना म्हणावं, तर आता शब्दांच्या वापरापेक्षा कुठला शब्द वापरतोय याच्यापेक्षा त्या शब्दातून कुठला आशय आपल्याला कळतोय त्याच्याकडे बघायला पाहिजे. मग शब्द कुठला वापरायचा हा तुमचे आग्रह काय आहेत त्याप्रमाणे ठरतं.
उदाहरणार्थ, भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही जी पुस्तिका आपण केली, आपल्या राष्ट्रीयत्वाला हिंदुत्व म्हणायचं का भारतीयत्व असा उगीच वाद अनेक वर्षे आपल्या देशामध्ये चालू आहे. मग शब्दाबद्दल भांडण असेल तर मग त्या शब्दामधला आशय काय आपल्याला हवाय त्या आशयाकडे लक्ष देऊया म्हणून भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही पुस्तिका तयार केली. मग त्याच्यापेक्षाही आणखीन मुळाशी जायला पाहिजे असं वाटलं म्हणून राष्ट्रीयत्वाचे पैलू ही पुस्तिका तयार केली आणि राष्ट्रीयत्व कशा कशावरून ठरतं हे पैलू एकदा निश्चित झाले की मग त्याला नाव काहीही दिलेलं चालेल. विष्णू सहस्त्रनाम आहे आपल्याकडे तसं राष्ट्र सहस्त्रनाम असायला हरकत नाही.
ज्या नावातून राष्ट्रीयत्वाची भावना वाढेल असं कुठलंही नाव वापरायला हरकत नाही. आपण हिंदुत्व हे नाव का वापरायचं त्याला कारण म्हणजे विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की हिंदुत्व हा शब्द म्हणजे काहीतरी मागासलेलं, कर्मठ असा अर्थ जर का होत असेल तर तो कोणीतरी त्याला तो दिलेला आहे अर्थ. आपण आपल्या कृतीनी त्याला हिंदुत्व म्हणजे जे काही उदात्त आहे, व्यापक आहे, विशाल आहे असा अर्थ आपण आपल्या कामाने निर्माण करूया. म्हणजे आपल्या राष्ट्रीयत्वामध्ये या सगळ्या गोष्टी येतील.
तसं धर्मसंस्थापना या शब्दाबद्दल मी विचार करतो. म्हणजे वेगळ्या काळी ज्या काही प्रतिक्रिया आल्या असतील त्याच्यातूनच आपणास सुचलं की धर्मसंस्थापनाच्या ऐवजी आपण समाजसंस्थापना शब्द वापरून पाहूया किंवा राष्ट्रघडण वापरून पाहूया, पण म्हणजे त्याच्यामध्ये आशय काय, तो जास्ती महत्त्वाचा. आता धर्मसंस्थापना लेखामध्येच धर्माच्या जुन्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्या व्याख्यांपेक्षा त्या व्याख्यांमधून काय सांगितलं आहे असं मी बघायचा प्रयत्न केला.
एकाच पानावरती चारी व्याख्या दिलेल्या आहेत:
- एक व्याख्या आहे “आचार प्रभव धर्मा” किंवा “चोदना लक्षणो धर्म”. म्हणजे कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही, असे आदेश म्हणजे धर्म आणि ते सगळे व्यक्तिगत आचरणाबद्दलचे आदेश आहेत. समाजसंस्थापना म्हणा, राष्ट्रघडण म्हणा, त्याच्यामध्ये व्यक्तिगत आचरण कसं असलं पाहिजे हा भाग त्याच्यामध्ये यायला पाहिजे.
- दूसरी व्याख्या आहे जी धर्माची दहा लक्षणं अशी दिली आहेत: धृति, क्षमा, दमो, अस्तेयं, शौचमिन्द्रियनिग्रहः, धीर्विद्या, सत्यं, अक्रोधो, दशकं धर्मलक्षणम्. हे काय आहे सगळं? तर हे कोणाचे तरी मूल्य आहेत. व्यक्तिगत आचरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, तर ही मूल्य ज्याच्यामुळे तुमच्या वागण्यातून व्यक्त होतील असं व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे. म्हणजे धर्मसंस्थापना, समाजसंस्थापना, राष्ट्रघडण याच्यामध्ये तुम्ही कुठली मूल्यं मानता, मूल्य व्यवस्था तुमची काय आहे हा भाग त्याच्यामध्ये आला पाहिजे.
- तिसरी व्याख्या दिलेली आहे “धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मो धारयते प्रजाः”. ज्याच्यामुळे समाज व्यवस्था टिकून राहते, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे धर्म आणि समाजाची रचना कशी असली पाहिजे.
- आणि चौथी व्याख्या दिलेली आहे “यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः”. अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन शब्द मगाशी आपण पाहिले. अभ्युदय म्हणजे नीतिमान श्रीमंती. भरपूर समृद्धी मिळवायची पण ती नीतीच्या मार्गाने मिळवायची म्हणजे अभ्युदय. आणि निःश्रेयस म्हणजे आयुष्यात पूर्णत्व कशामुळे येईल याचा शोध घेणे.
नीतिमान श्रीमंती मिळवणं ज्याच्यातून लौकिक जीवन आपलं सुख-समाधानाचं होऊ शकेल आणि पूर्णत्वाचा शोध घेणे, हे आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे शब्द कुठला वापरायचा हे नंतर पाहता येईल पण आपल्याला जे काम करायचं आहे त्या सगळ्याचं उद्दिष्ट काय, की समाजामध्ये अशी समाज रचना असली पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळी मूल्यं टिकून राहतील, मूल्य व्यवस्था टिकून राहील आणि त्याच्यानुसार लोकांच आचरण असेल.
“आणि हे सगळं व्यक्तिगत आचरणाबद्दलचे आदेश आहेत. धर्मसंस्थापना म्हणा, समाजसंस्थापना म्हणा, राष्ट्रघडण म्हणा, त्याच्यामध्ये व्यक्तिगत आचरण कसं असलं पाहिजे, हा भाग त्याच्यामध्ये यायला पाहिजे.
मग दुसरी व्याख्या आहे जी धर्माची दहा लक्षणं अशी दिली आहेत: धृति, क्षमा, दमो, अस्तेयं, शौचमिन्द्रियनिग्रहः, धीर्विद्या, सत्यं, अक्रोधो, दशकं धर्मलक्षणम्. हे काय आहे सगळं? तर हे गुण किंवा मूल्य आहेत. व्यक्तिगत आचरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, तर ही मूल्य ज्याच्यामुळे तुमच्या वागण्यातून व्यक्त होतील, असं व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे. म्हणजे धर्मसंस्थापना, समाजसंस्थापना, राष्ट्रघडण याच्यामध्ये तुम्ही कुठली मूल्यं मानता, मूल्य व्यवस्था तुमची काय आहे, हा भाग त्याच्यामध्ये आला पाहिजे.
मग तिसरी व्याख्या दिलेली आहे ‘धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मो धारयते प्रजाः’. ज्याच्यामुळे समाज व्यवस्था टिकून राहते, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे धर्म आणि समाजाची रचना कशी असली पाहिजे.
आणि चौथी व्याख्या दिलेली आहे ‘यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः’. अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन शब्द मगाशी आपण पाहिले. अभ्युदय म्हणजे नीतिमान श्रीमंती. असा आपल्याला त्याचा अर्थ करता येईल की भरपूर समृद्धी मिळवायची पण ती नीतीच्या मार्गाने मिळवायची म्हणजे अभ्युदय. आणि निःश्रेयस म्हणजे आयुष्यात पूर्णत्व कशामुळे येईल याचा शोध घेणे.
नीतिमान श्रीमंती मिळवणं ज्याच्यातून लौकिक जीवन आपलं सुख-समाधानाचं होऊ शकेल आणि पूर्णत्वाचा शोध घेणे, हे आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे शब्द कुठला वापरायचा हे नंतर पाहता येईल, पण आपल्याला जे काम करायचं आहे त्या सगळ्याचं उद्दिष्ट काय, की समाजामध्ये अशी समाज रचना असली पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळी मूल्यं टिकून राहतील, मूल्य व्यवस्था टिकून राहील, त्याच्यानुसार लोकांचं आचरण असेल आणि सर्व लोकांच्या समोर आपल्या आयुष्यात काय करायचं हे उद्दिष्ट अगदी स्पष्ट असेल.
तर हे करणं म्हणजे धर्मसंस्थापना. धर्म शब्द या अर्थाने आलेला आहे, हे चारी पैलू त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता याच्यामध्ये ती समाज रचना प्रस्थापित करणं, काही मूल्यं ती निश्चित असणं आणि तिथल्या व्यक्तींना त्या मूल्यांप्रमाणे कसं जगायचं आणि आयुष्याचा उद्दिष्ट काय आहे हे त्याच्यातून कळलं पाहिजे असं करायचं. हे सगळ्या जगात आम्हाला करायचं आहे असं म्हटलं तर धर्मसंस्थापना हे उद्दिष्ट आहे आमचं. आमच्या देशात करायचं आहे आम्हाला असं म्हटलं, तर राष्ट्रघडण करायची आहे आम्हाला, हे त्याचं उद्दिष्ट.
आणि अप्पांनीच एक लेख लिहिलेला राष्ट्रत्वावरती ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ त्या पुस्तकामध्ये तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जीवनदृष्टी ही जास्त स्थिर असते. जीवन पद्धती ही काळानुसार जसं तंत्रज्ञान बदलतं, जागतिक राजकारण बदलतं, त्याप्रमाणे जीवन पद्धती बदलू शकते. त्यामुळे आधी काय आणि नंतर काय? कारण काय आणि त्याचा परिणाम काय? कारण काय आणि कार्य काय? कार्यकारण हा जुना तो शास्त्रीय शब्द आहे, कार्यकारण भाव. म्हणजे कारण काय आणि परिणाम काय असं बघायचं झालं तर समाज हे कारण आहे.”
“आणि जीवन पद्धती हा त्याचा परिणाम, तो समाज ठरवत असतो कसं जगायचं. त्यामुळे धर्म हा परिणाम आहे आणि धर्म आपला काय असला पाहिजे ते समाज ठरवतो. त्यामुळे मग धर्मसंस्थापना याच्यापेक्षा सुद्धा आजच्या काळामध्ये सगळ्यांना समजू शकेल आणि त्याचं जर का कंटेंट काय आहे ते सांगितलं, आशय काय त्या शब्दाचा सांगितला, तर धर्मसंस्थापना शब्द हा कदाचित भारतात समजेल लोकांना, समाजसंस्थापना हा जगभर समजू शकेल असा शब्द आहे. आणि भारतापुरतं समाजसंस्थापना म्हणजेच राष्ट्रघडण, असं त्याचं आपल्याला विचार करता येईल.
मग व्यक्तिगत आचरण कसं असलं पाहिजे? मगाशी सगळे शब्द वेगवेगळ्या याच्यामध्ये आलेलेच आहेत की व्यक्तिगत आरोग्याची काळजी ज्याची त्याने घ्यायला पाहिजे. आरोग्याचं स्वावलंबन असलं पाहिजे. व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या क्षमता वापरण्यासाठी जास्तीत जास्त कौशल्य वापरणं आणि मिळवणं, कार्यक्षमता आपली वाढवणं, हे एक उद्दिष्ट सगळ्यांचं असलं पाहिजे.
परस्परांच्या व्यवहारामध्ये जिव्हाळा असला पाहिजे, नातेसंबंध जोपासले पाहिजेत. जगात काय चाललेलं आहे, आपल्या आजूबाजूला काय आहे, याच्याबद्दलचं कुतूहल किंवा जिज्ञासा सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे आणि ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे.
आणि काय करावं, काय करू नये, याचा विवेक सगळ्यांना करता यावा, निवड सगळ्यांना करता यावी, असं व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे. त्याचे नियम या पद्धतीने – आरोग्य, कौशल्य, जिव्हाळा, विवेक आणि सगळ्यांबद्दलची कृतज्ञता, हे व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे.
मग आरोग्यासाठी काय करायचं, कौशल्य मिळवण्यासाठी काय करायचं, नातेसंबंध कशाच्या आधारावर असले पाहिजेत, त्याच्यासाठीचा मूल्यांचा विचार हा आपल्याला करायला लागतो. मगाशी जी मूल्य आपण ऐकली, त्याला मी एक विशेषण लावतो.
की समता असली पाहिजे, पण ती आत्मिक समता असली पाहिजे. म्हणजे सगळ्यांमध्ये समान शक्ती आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ती शक्ती व्यक्ती कशी होईल सगळ्यांच्या मनात ती कमी-अधिक प्रमाणात होऊ शकते, पण सगळ्यांमध्ये तीच शक्ती आहे, समान शक्ती आहे, अशी आत्मिक समता असली पाहिजे.
बंधुता म्हणतात ती खरी कुठे व्यक्त होते? ती आर्थिक बाबतीत बंधुता व्यक्त होते जसं कुटुंबामध्ये असतं. कुटुंबामध्ये तीन माणसं मिळवती असतील तर तिघांच्या मिळकतीची बेरीज होऊन मग कुटुंबासाठी तो खर्च होतो. जर का कोणी आपलं उत्पन्न लपवायला लागलं किंवा वेगळं डिपॉझिट करायला लागलं तर ते कुटुंब टिकून राहत नाही. कुटुंब एकत्र राहतं, बांधलं जातं ते सगळ्यांची मिळकत सगळ्यांची आणि ती सगळ्यांसाठी खर्च होणार, त्यामुळे बंधुता ही मुख्य आर्थिक बाबतीमध्ये दिसायला लागते.
तसं आत्मिक समता, आर्थिक बंधुता, सामाजिक न्याय असला पाहिजे. म्हणजे अधिकारावरच्या लोकांना वेगळा न्याय आणि अधिकार नसलेल्यांना वेगळा न्याय, श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय, ओळख असलेल्यांना वेगळा न्याय, ओळख नसलेल्यांना वेगळा न्याय, असं असून चालणार नाही. सामाजिक न्याय म्हणजे समाजात सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे.
स्वातंत्र्य हे राजकीय तर आहेच आणि ते मिळालेलं आहे. आणि निर्णयाचं स्वातंत्र्य सुद्धा प्रत्येकाला असायला लागलं. तो निर्णय जबाबदारीने कसा घ्यायचा हा विवेक शिकवला पाहिजे, पण आधी ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे, ते स्वातंत्र्य वापरतानाच मग विवेक हा शिकत जातो.
आणि व्यक्ती म्हणून प्रत्येकाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. तर ही आधुनिक काळातली मूल्यं आहेत आणि ती पूर्वी होती किंवा नव्हती, खणून काढलं तर सापडतं इतकं संस्कृत साहित्य भारतात की कुठल्यातरी ग्रंथात हे सापडतंच. पण त्या ग्रंथात असो किंवा नसो, ही आधुनिक काळातली मूल्यं आहेत, आजच्या काळात समाज म्हणून जगायचं असेल तर ही सगळी मूल्यं आमच्या समाजात असली पाहिजेत आणि या मूल्यांना अनुसरून व्यक्तीने वागायला पाहिजे.”
प्रत्येक अभ्यास शिबिरामध्ये साधारणपणे शेवटच्या दिवशी आपण परिसंवाद ठेवत असतो. आणि त्या परिसंवादामध्ये आधीच्या दोन-तीन-चार दिवसात काय अभ्यास झाला, त्यातला कुठलातरी एक विषय घेऊन प्रत्येकाने मांडायचा असतो. तसं आजही त्याला परिसंवाद म्हटलं नसलं तरी परिसंवाद झाला दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत. प्रत्येकानेच एक-एक विषय निवडून त्याच्यावरती काहीतरी आपलं म्हणणं मांडलं आहे, प्रश्नही मांडलेले आहेत.
तसं जे लेख लिहिलेले असतात ते बराच मोठा गट डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले असतात आणि त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही त्याच्यामध्ये आलेली नसतात. त्यामुळे वाचता-वाचता आपल्याला प्रश्न पडणं नैसर्गिक आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांनाही देता येतात, ज्यांना माहिती आहे त्यांनाही विचारता येतात आणि त्याच्यातून त्या लेखातला आशय सुद्धा अधिक पक्का होतो.
तर सगळ्यांचे विषय मी काल पाहिले. शुभंकरनी पाठवली होती यादी कोण कुठल्या विषयावर आज बोलणार आणि असं लक्षात आलं की तत्वसप्तकापैकी धर्मसंस्थापना या तत्वावरती कोणीच बोलणार नाही. त्यामुळे समारोपामध्ये त्या तत्वावरतीच थोडसं बोलावं असं वाटतं.
पहिल्यांदा त्या शब्दाबद्दल, तो शब्द वापरावा न वापरावा त्याच्या ऐवजी राष्ट्रघडण म्हणावं का समाजसंस्थापना म्हणावं, तर आता शब्दांच्या वापरापेक्षा कुठला शब्द वापरतोय याच्यापेक्षा त्या शब्दातून कुठला आशय आपल्याला कळतोय त्याच्याकडे बघायला पाहिजे. मग शब्द कुठला वापरायचा हा तुमचे आग्रह काय आहेत त्याप्रमाणे ठरतं.
उदाहरणार्थ, भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही जी पुस्तिका आपण केली, आपल्या राष्ट्रीयत्वाला हिंदुत्व म्हणायचं का भारतीयत्व असा उगीच वाद अनेक वर्षे आपल्या देशामध्ये चालू आहे. मग शब्दाबद्दल भांडण असेल तर मग त्या शब्दामधला आशय काय आपल्याला हवाय त्या आशयाकडे लक्ष देऊया म्हणून भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही पुस्तिका तयार केली. मग त्याच्यापेक्षाही आणखीन मुळाशी जायला पाहिजे असं वाटलं म्हणून राष्ट्रीयत्वाचे पैलू ही पुस्तिका तयार केली आणि राष्ट्रीयत्व कशा कशावरून ठरतं हे पैलू एकदा निश्चित झाले की मग त्याला नाव काहीही दिलेलं चालेल. विष्णू सहस्त्रनाम आहे आपल्याकडे तसं राष्ट्र सहस्त्रनाम असायला हरकत नाही.
ज्या नावातून राष्ट्रीयत्वाची भावना वाढेल असं कुठलंही नाव वापरायला हरकत नाही. आपण हिंदुत्व हे नाव का वापरायचं त्याला कारण म्हणजे विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की हिंदुत्व हा शब्द म्हणजे काहीतरी मागासलेलं, कर्मठ असा अर्थ जर का होत असेल तर तो कोणीतरी त्याला तो दिलेला आहे अर्थ. आपण आपल्या कृतीनी त्याला हिंदुत्व म्हणजे जे काही उदात्त आहे, व्यापक आहे, विशाल आहे असा अर्थ आपण आपल्या कामाने निर्माण करूया. म्हणजे आपल्या राष्ट्रीयत्वामध्ये या सगळ्या गोष्टी येतील.
तसं धर्मसंस्थापना या शब्दाबद्दल मी विचार करतो. म्हणजे वेगळ्या काळी ज्या काही प्रतिक्रिया आल्या असतील, त्याच्यातूनच आपणास सुचलं की धर्मसंस्थापनाच्या ऐवजी आपण समाजसंस्थापना शब्द वापरून पाहूया किंवा राष्ट्रघडण वापरून पाहूया, पण म्हणजे त्याच्यामध्ये आशय काय, तो जास्ती महत्त्वाचा. आता धर्मसंस्थापना लेखामध्येच धर्माच्या जुन्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्या व्याख्यांपेक्षा त्या व्याख्यांमधून काय सांगितलं आहे, असं मी बघायचा प्रयत्न केला.
एकाच पानावरती चारी व्याख्या दिलेल्या आहेत:
- एक व्याख्या आहे “आचार प्रभव धर्मा” किंवा “चोदना लक्षणो धर्म” म्हणजे कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही, असे आदेश म्हणजे धर्म आणि ते सगळे व्यक्तिगत आचरणाबद्दलचे आदेश आहेत. समाजसंस्थापना म्हणा, राष्ट्रघडण म्हणा, त्याच्यामध्ये व्यक्तिगत आचरण कसं असलं पाहिजे हा भाग त्याच्यामध्ये यायला पाहिजे.
- दुसरी व्याख्या आहे जी धर्माची दहा लक्षणं अशी दिली आहेत: धृति, क्षमा, दमो, अस्तेयं, शौचमिन्द्रियनिग्रहः, धीर्विद्या, सत्यं, अक्रोधो, दशकं धर्मलक्षणम्. हे काय आहे सगळं? तर हे कोणाचे तरी मूल्य आहेत, व्यक्तिगत आचरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, तर ही मूल्य ज्याच्यामुळे तुमच्या वागण्यातून व्यक्त होतील, असं व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे. म्हणजे धर्मसंस्थापना, समाजसंस्थापना, राष्ट्रघडण याच्यामध्ये तुम्ही कुठली मूल्यं मानता, मूल्य व्यवस्था तुमची काय आहे हा भाग त्याच्यामध्ये आला पाहिजे.
- तिसरी व्याख्या दिलेली आहे “धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मो धारयते प्रजाः”. ज्याच्यामुळे समाज व्यवस्था टिकून राहते, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे धर्म आणि समाजाची रचना कशी असली पाहिजे.
- आणि चौथी व्याख्या दिलेली आहे “यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः”. अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन शब्द मगाशी आपण पाहिले. अभ्युदय म्हणजे नीतिमान श्रीमंती, भरपूर समृद्धी मिळवायची पण ती नीतीच्या मार्गाने मिळवायची म्हणजे अभ्युदय. आणि निःश्रेयस म्हणजे आयुष्यात पूर्णत्व कशामुळे येईल याचा शोध घेणे.
नीतिमान श्रीमंती मिळवणं ज्याच्यातून लौकिक जीवन आपलं सुख-समाधानाचं होऊ शकेल आणि पूर्णत्वाचा शोध घेणे, हे आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे शब्द कुठला वापरायचा हे नंतर पाहता येईल, पण आपल्याला जे काम करायचं आहे त्या सगळ्याचं उद्दिष्ट काय, की समाजामध्ये अशी समाज रचना असली पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळी मूल्यं टिकून राहतील, मूल्य व्यवस्था टिकून राहील आणि त्याच्यानुसार लोकांचं आचरण असेल.
आणि जीवन पद्धती हा त्याचा परिणाम, तो समाज ठरवत असतो कसं जगायचं. त्यामुळे धर्म हा परिणाम आहे आणि धर्म आपला काय असला पाहिजे ते समाज ठरवतो. त्यामुळे मग धर्मसंस्थापना याच्यापेक्षा सुद्धा आजच्या काळामध्ये सगळ्यांना समजू शकेल आणि त्याचं जर का कंटेंट काय आहे ते सांगितलं, आशय काय त्या शब्दाचा सांगितला, तर धर्मसंस्थापना शब्द हा कदाचित भारतात समजेल लोकांना, समाजसंस्थापना हा जगभर समजू शकेल असा शब्द आहे. आणि भारतापुरतं समाजसंस्थापना म्हणजेच राष्ट्रघडण, असं त्याचं आपल्याला विचार करता येईल.
मग व्यक्तिगत आचरण कसं असलं पाहिजे? मगाशी सगळे शब्द वेगवेगळ्या याच्यामध्ये आलेलेच आहेत की व्यक्तिगत आरोग्याची काळजी ज्याची त्याने घ्यायला पाहिजे. आरोग्याचं स्वावलंबन असलं पाहिजे. व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या क्षमता वापरण्यासाठी जास्तीत जास्त कौशल्य वापरणं आणि मिळवणं, कार्यक्षमता आपली वाढवणं, हे एक उद्दिष्ट सगळ्यांचं असलं पाहिजे.
परस्परांच्या व्यवहारामध्ये जिव्हाळा असला पाहिजे, नातेसंबंध जोपासले पाहिजेत. जगात काय चाललेलं आहे, आपल्या आजूबाजूला काय आहे, याच्याबद्दलचं कुतूहल किंवा जिज्ञासा सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे आणि ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे.
आणि काय करावं, काय करू नये, याचा विवेक सगळ्यांना करता यावा, निवड सगळ्यांना करता यावी, असं व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे. त्याचे नियम या पद्धतीने – आरोग्य, कौशल्य, जिव्हाळा, विवेक आणि सगळ्यांबद्दलची कृतज्ञता, हे व्यक्तिगत आचरण असलं पाहिजे.
मग आरोग्यासाठी काय करायचं, कौशल्य मिळवण्यासाठी काय करायचं, नातेसंबंध कशाच्या आधारावर असले पाहिजेत, त्याच्यासाठीचा मूल्यांचा विचार हा आपल्याला करायला लागतो. मगाशी जी मूल्य आपण ऐकली, त्याला मी एक विशेषण लावतो.
की समता असली पाहिजे, पण ती आत्मिक समता असली पाहिजे. म्हणजे सगळ्यांमध्ये समान शक्ती आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ती शक्ती व्यक्ती कशी होईल सगळ्यांच्या मनात ती कमी-अधिक प्रमाणात होऊ शकते, पण सगळ्यांमध्ये तीच शक्ती आहे, समान शक्ती आहे, अशी आत्मिक समता असली पाहिजे.
बंधुता म्हणतात ती खरी कुठे व्यक्त होते? ती आर्थिक बाबतीत बंधुता व्यक्त होते जसं कुटुंबामध्ये असतं. कुटुंबामध्ये तीन माणसं मिळवती असतील तर तिघांच्या मिळकतीची बेरीज होऊन मग कुटुंबासाठी तो खर्च होतो. जर का कोणी आपलं उत्पन्न लपवायला लागलं किंवा वेगळं डिपॉझिट करायला लागलं तर ते कुटुंब टिकून राहत नाही. कुटुंब एकत्र राहतं, बांधलं जातं ते सगळ्यांची मिळकत सगळ्यांची आणि ती सगळ्यांसाठी खर्च होणार, त्यामुळे बंधुता ही मुख्य आर्थिक बाबतीमध्ये दिसायला लागते.
तसं आत्मिक समता, आर्थिक बंधुता, सामाजिक न्याय असला पाहिजे. म्हणजे अधिकारावरच्या लोकांना वेगळा न्याय आणि अधिकार नसलेल्यांना वेगळा न्याय, श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय, ओळख असलेल्यांना वेगळा न्याय, ओळख नसलेल्यांना वेगळा न्याय, असं असून चालणार नाही. सामाजिक न्याय म्हणजे समाजात सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे.
स्वातंत्र्य हे राजकीय तर आहेच आणि ते मिळालेलं आहे. आणि निर्णयाचं स्वातंत्र्य सुद्धा प्रत्येकाला असायला लागलं. तो निर्णय जबाबदारीने कसा घ्यायचा हा विवेक शिकवला पाहिजे, पण आधी ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे, ते स्वातंत्र्य वापरतानाच मग विवेक हा शिकत जातो.
आणि व्यक्ती म्हणून प्रत्येकाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. तर ही आधुनिक काळातली मूल्यं आहेत आणि ती पूर्वी होती किंवा नव्हती, खणून काढलं तर सापडतं इतकं संस्कृत साहित्य भारतात की कुठल्यातरी ग्रंथात हे सापडतंच. पण त्या ग्रंथात असो किंवा नसो, ही आधुनिक काळातली मूल्यं आहेत, आजच्या काळात समाज म्हणून जगायचं असेल तर ही सगळी मूल्यं आमच्या समाजात असली पाहिजेत आणि या मूल्यांना अनुसरून व्यक्तीने वागायला पाहिजे.
“हे दलावरच्या उपक्रमांमधनं प्रशिक्षणातनं झालं पाहिजे असं आपण तिथे लिहून ठेवलंय. आणि स्पर्धेप्रमाणेच सामूहिक निर्मिती ही कशी असली पाहिजे, किती असली पाहिजे हे ठरवायला. आणि मग आयुष्याचं उद्दिष्ट पूर्णत्व हे काय असावं कसं असावं, त्याचा एक मार्ग जसा कामाच्या दृष्टीने प्रतिज्ञा मांडलेल्या आहेत, तसं हे आयुष्याचं उद्दिष्ट आपल्याला दिसावं या दृष्टीने प्रतिज्ञा मांडल्या आहेत.
ते शब्द जे सगळे आपण सलोकता, सविपता, सरूपता, सायुज्यता वगैरे ऐकतो, ते पूर्णत्वाकडे जाण्याचे टप्पे आहेत. कधीतरी त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. पण समाजसंस्थापना हे सगळ्या जगात करायची आणि राष्ट्रघडण म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्याला करायचं. टप्पा तोच आहे, जगातली एक सप्तमांश लोकसंख्या आपल्या देशात आहे. जगातले सगळे धर्म आपल्या देशात आहेत, जगातले सगळे पर्यावरणाचे नमुने आपल्या देशात आहेत.
करण्यासारखं खूप आहे आणि ज्या देशांमध्ये विकास झाला असं वाटतं आपल्याला, हॅप्पीनेस इंडेक्स जिथे जास्त येतो असं थोडं वाटतं आपल्याला, तिथे सगळी ३० लाख, ४० लाख, ५० लाख, ६० लाख, एक कोटी, याच्या पलीकडे कुठली लोकसंख्या नाहीये. त्यामुळे एवढ्या लोकसंख्येचं संघटन कसं करायचं? हा वेगळा प्रश्न आहे आणि १३० कोटी लोक झाल्यावर त्याचं संघटन कसं करायचं, हा वेगळा प्रश्न आहे.
पहिला आपल्याला तो प्रश्न आणि त्या गोष्टी सोडवाव्या लागणार आहेत आणि बाकीच्यांना ते पटकन सोडवता आलं आणि विकासाचं काम ते करू शकले. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे तसे मोठे देश आहेत युरोपातले, ५ कोटी ८ कोटी अशा लोकसंख्या असलेल्या. त्यांना संघटन कसं करायचं, विकास कसा करायचा हे प्रश्न बरं सावकाश सोडवता आले. १००-२०० वर्ष लागली. पण युरोपातले छोटे छोटे देश आहेत ज्यांना स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणतात – स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड – हे इतके छोटे छोटे देश आहेत आणि ते झपाट्याने प्रगत देश झाले, कारण त्यांच्यापुढे संघटनाचे प्रश्न फार छोटे होते.
डेन्मार्क या देशामध्ये १८४३ मध्ये संघटनाची चळवळ सुरू झाली आणि त्या संघटनेतनं तयार झालेले सर्व खासदार डेन्मार्कच्या लोकसंख्येत आहेत असं १९०५ साली झालं. ६० वर्ष लागली त्याला. लोकसंख्या ४०-४५ लाख. आपल्याला किती वर्ष लागतील? आणि तेवढं झाल्याशिवाय आम्ही विकास करायचा नाही असं आपल्याला म्हणता येईल का? तर नाही म्हणता येणार, मग आपण मागे पडू.
त्यामुळे समाजसंस्थापना हे मुख्य आमचं साध्य. राष्ट्रघडण हे आमचं मुख्य साध्य. आणि त्याच्यासाठीची साधन तत्त्वं म्हणजे संघटन आणि विकास अशी आपण तत्त्वसप्तकामध्ये मांडलेली आहेत. मग ही दोन साधन तत्त्वं आहेत तर त्याच्यासाठी आपली वृत्ती काय असली पाहिजे? वृत्ती काय असली पाहिजे हे सांगण्यासाठी ‘जन जनार्दन असा भाव’, ‘हिंदू देव आणि उपासक’, ‘उत्तमता’, ‘विज्ञानाधिष्ठित’, ही चारी तत्त्वं पायाभूत आपली वृत्ती काय असली पाहिजे सांगणारे किंवा स्थायी दृष्टिकोन काय असला पाहिजे सांगणारे.
त्याच्या आधारे आपल्या देशात करायचं तर संघटन आणि विकास, आणि हे दोन्ही जर का आपल्याला एकत्र करता आलं तर त्याच्यातून राष्ट्रघडण होणार आहे, म्हणजे समाजसंस्थापना होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? तर कंटेंटकडे आपण जास्ती लक्ष दिलं पाहिजे. नावांबद्दलचे वाद चालू राहतील, सोयीनुसार वेगवेगळी नाव लोक वापरतील.
तर व्यक्तीचं आचरण कसं असलं पाहिजे? समाजातील मूल्य व्यवस्था कशी असली पाहिजे? समाजरचना कशी असली पाहिजे? आणि व्यक्तीच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? या चार गोष्टी म्हणजे राष्ट्रघडणीचा किंवा समाजसंस्थापनेचा आशय. व्यक्तीचं आचरण कसं असलं पाहिजे, मूल्य व्यवस्था काय असली पाहिजे, हे तर आपल्याला दलावरती सुद्धा विचार करायला लागतो, आणि दलाच्या माध्यमातून आपण समाजसंस्थापनेचं, राष्ट्रघडणीचं काम करतोय. राष्ट्रातल्या एका छोट्या गटासाठी, छोट्या लोकसंख्येसाठी, आणि म्हणूनच ते अनेक ठिकाणी करायला लागणार आहे, म्हणून त्याच्यासाठी अनेक ठिकाणी दल असायला हवेत.”
“मग त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि विस्तार करण्यासाठी कार्यकर्ते घडवणं त्याच्यासाठी झालं पाहिजे. पण असं हे सगळं सूत्र आपल्या मनामध्ये जर का तयार झालं – काय करायचंय, त्याच्यासाठी काय करायचंय, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण कुठे आहोत, तिथे आपल्याला काय करता येईल – हा सगळा विचार आपला जर का झाला, तर अधिक चांगलं आपण काम करू शकू.
अप्पांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने परिसंवाद झालेला होता, आणि त्याच्यामध्ये समाजसंस्थापना – भारत महासत्ता होणं म्हणजे समाजसंस्थापना किंवा राष्ट्रघडण आहे का? भारत विश्वगुरू होणं म्हणजे समाजसंस्थापना किंवा राष्ट्रघडण आहे का? भारत जगाला अध्यात्म शिकवेल असं आपण म्हणावं का? पण भारताला ही जगाकडून शिकलं पाहिजे असं आपल्याला दिसतंय प्रत्यक्ष.
विवेकानंदांनी स्पिरीट ऑफ इक्वलिटी (Spirit of equality), फ्रीडम (freedom), वर्क अँड एनर्जी (work and energy), या गोष्टी आपल्याला इतरांकडून शिकल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. किंवा संघटनेचं तत्व आपल्याला इतरांकडून शिकलं पाहिजे असं म्हटलं होतं. आणि त्यांनी पाहिलं तेव्हा फक्त पाश्चात्य देश विकसित झालेले होते. आज चीन, जपान, कोरिया, ब्राझील, मेक्सिको, व्हेनेझुएला, इस्रायल असे ही देश विकसित होताना दिसतायत.
भूतान आणि क्युबा यांचा हॅप्पीनेस इंडेक्स भारतापेक्षा जास्ती आहे आणि ठरवून त्यांनी हॅप्पीनेस इंडेक्स हे आमचं उद्दिष्ट, जीडीपी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर यांच्याकडूनही आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि जगाला आम्ही शिकवू असं म्हणण्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, तसं इतरांकडून शिकण्यात काही कमीपणा नाही असं वाटणं हे सुद्धा आत्मविश्वास असण्याचं लक्षण.
असं भारताने इतर देशांकडून शिकलं पाहिजे तसं प्रबोधिनीने इतर संघटनांकडून शिकलं पाहिजे, काही हरकत नाही म्हणायला. आम्ही इतर संघटनांना काहीतरी देऊ शकू आणि इतर संघटनांकडून शिकू.
जगाला अध्यात्माशिवाय भारत काय काय शिकवू शकेल? योग शिकवायला लागलोय आता, आयुर्वेद शिकवायला लागलोय, संस्कृत भाषाही शिकवायला लागलोय. पण आधुनिक तंत्रज्ञानही शिकवता येईल. माशेलकर अशी उदाहरणं गोळा करतायत की जे भारतातच झालं आहे आणि इतर ठिकाणी झालं नाही अशी कुठली कुठली तंत्रज्ञानं आहेत. मोठी लोकसंख्या असताना सातत्याने यशस्वीपणे निवडणुका कशा घ्यायच्या आणि लोकशाहीने सरकार कसं बदलायचं, हे शिकवता येईल जगाला.
स्वस्तात उपग्रह कसे तयार करायचे हे शिकवता येईल. महासंगणक कसे तयार करायचे हे शिकवता येईल. औषध निर्माणाचा पेटंटचा कायदा कसा असावा? त्याच्यात आपल्या देशातल्या कायद्यातल्या तरतुदी खूप चांगल्या आहेत, ते शिकवता येईल. पारंपारिक सामुदायिक ज्ञानाचे पेटंटचे प्रश्न कसे सोडवायचे? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी – आंबेमोहोर, हळद हे सगळे जसे आपण जिंकेल, तर अनेक देशांमध्ये असं पारंपारिक सामुदायिक ज्ञान आहे की ज्याची एका कोणाची मालकी किंवा एकाचा शोध असं सांगता येत नाही. तर त्या त्या देशांकडे ते हक्क कसे अबाधित राहतील हे आपण इतरांना शिकवू शकतो.
तर हे सगळं करणं म्हणजे जगाशी देवाण-घेवाण करणं. त्याच्यातून जगात समाजसंस्थापना होणार आहे, पण ही देवाण-घेवाण करण्यासाठी आपण समर्थ होण्यासाठी आपल्याला राष्ट्रघडण केली पाहिजे. आणि त्यासाठी मग तो सगळा तत्वसप्तकाचा आपण अभ्यास केला, तो आपल्या मनात संगती राहिली पाहिजे की आपण काम करत असताना आज दलात प्रत्यक्ष पाऊल घ्यायचं, तर स्पर्धा किती तापवायची आणि सहकार्य किती करायला शिकवायचं? हे आपल्याला त्या त्या ठिकाणी निर्णय घेता आले पाहिजेत, ठरवता आले पाहिजेत.
आणि हे करणं म्हणजे राष्ट्रघडणीचं आजचं आपलं अप्लिकेशन आपल्या दलावरचं आहे, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. हा राष्ट्रघडणीचा आशय आपण लक्षात घेतला, मग धर्मसंस्थापना का समाजसंस्थापना का राष्ट्रघडण या शब्दांच्या गुंफ्यामध्ये आपण अडकण्याचं कारण नाही, आशय हा महत्त्वाचा आहे. आणि तो आशय सगळ्याजगभर मान्य होऊ शकेल असा आहे. आणि हा सगळा म्हणलं तसं हे चारी संस्कृत शब्द हे काही हजार वर्षांपूर्वीचे आहेत, त्यामुळे अस्सल स्वदेशी आशय आहे हा राष्ट्रघडण कशी करायची याचा.
त्याच्या आधारावरती आपल्याला प्रबोधिनीचं काम करायचं आहे, असं लक्षात ठेवूया. आणि आज आपण आपल्या दलावर काम करत असू तर काही हरकत नाही. सुभाषरावांचे अनुभव चांगले आहेत जेव्हा एकच दल होतं, आणि ते एक दल चालवणारे १५ मार्गदर्शक होते, त्यामुळे सोळावे सुभाषराव सहज मोकळे करता आले वेगळे अनुभव घेण्यासाठी.
पण त्यांनी जे काही प्रयोग केले आणि जे काही अनुभव घेतले, ते सगळे अनुभव घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा सतत पुरवठा एकाच दलातून नाही होऊ शकत. त्यामुळे तो सगळा पसारा जर का मांडायचा असेल, तर त्याची जबाबदारी घेणारे कार्यकर्ते घेण्यासाठी दलांचा पसारा सुद्धा आपल्याला खूप वाढवायला लागणार आहे. आणि म्हणूनच दलांचा विस्तार करणं हे सुद्धा राष्ट्रघडणीचंच काम आहे. पण तेवढाच फक्त विस्तार करत राहायचा नाही, तर म्हणजे ते फक्त खराटी पसरत जाते तसं होईल फक्त.
तर त्याच्या बरोबर त्यातली काही बीजं ही मोठी झाडं झाली पाहिजेत याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. म्हणून आपल्या दलातल्या मुलांकडे त्या पद्धतीने लक्ष देऊन कोणाला दलाचा विस्तार कर म्हणायचं, कोणाला नवीन दल सुरू कर म्हणायचं, कोणाला याच दलावर काम कर म्हणायचं, कोणाला तू दलाच्या पलीकडे गेलास आता जरा दुसऱ्या एखाद्या विभागाचा अनुभव घे असं म्हणायचं, असा सगळा विचार आपण सगळ्यांनी करायला लागला पाहिजे.
आणि त्याच्यासाठी आपण ही सर्वसाधारण प्रबोधिनी आणि विशेषतः प्रबोधिनी आणि तत्वसप्तकाचा अभ्यास आपण केलेला आहे. तसं आपापल्या दलावरती आपण आपल्या दलातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांचं पुढचं नियोजन करताना हे सगळे संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी काय काय करावं असं त्यांना मार्गदर्शन करू शकतो. निर्णय स्वातंत्र्य अर्थातच त्यांना आहे, त्यांनी ठरवायचं. पण असं वातावरण तयार करायचं की हेच करण्यासारखं काम आहे असं त्यांना वाटलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला वाटलं पाहिजे की हेच करण्यासारखं काम आहे.”