अनौपचारिक शिक्षण प्रश्न क्र.२७

पद्य-गायनाचा व्यक्तिमत्त्त- विकसनाला काय उपयोग होतो ?

: उत्तम काव्य आणि उत्तम संगीत अशी जोडी जमते तेव्हा अशी पद्ये पुन्हा पुन्हा म्हणावीशी वाटतात. एकट्यानेही म्हटली जातात व समूहातही गायली जातात. सामूहिक गायन करताना लय-ताल-सूर यांच्या प्रवाहाबरोबर गाणाऱ्यांचा गटच्या गट त्या पद्याच्या प्रवाहात एकत्र ओढला जातो. गटातील व्यक्ती आपले वेगळेपण काही काळ विसरतात व गटाचा भाग बनून जातात. सामूहिक गायनात स्वतःला विसरण्याचा अनुभव व्यक्तिमत््त-विकसनात उपयोगी होतो. कारण आपले व्यक्तिगत वैशिष्ट्य प्रकट करणे व आपले वैशिष्ट्य गटात विरघळवून टाकणे हे दोन्ही ज्याला जमते त्याचे व्यक्तिमत््त जास्त विकसित झाले असे म्हणता येईल. व्यक्तिगत पद्य- गायनामध्ये संगीत-शब्दयोजना-शब्दार्थ-भावार्थ या क्रमाने आपले आकलन हळुहळू वाढत जाते. भावार्थाचे जेवढे चिंतन होत जाईल तेवढे आपले व्यक्तिमत््त विकसन होते. या चिंतनाने पद्यात वर्णन केलेले गुण आपल्यात आले पाहिजेत असे वाटायला लागते. तसेच भावार्थ आपल्या आयुष्यात आणण्यासाठीच आपण जगावे असे ही वाटायला लागते. या दोन्ही  प्रकारच्या वाटण्याचेच पुढे कृतीत  रूपांतर होऊ लागते. पद्य-गायन हा एक प्रकारचा जपयज्ञच आहे. कोणत्याही सात्त्विक अज्ञाने, म्हणजे निरपेक्षपणे केलेल्या कृतीने व्यक्तिमत्त्व विकसन होते.