विसुभाऊ व सुभाषराव : काव्य कृतज्ञता

मा. विसुभाऊ गुर्जर

तत्त्वज्ञ आणि उदासिन । बहुश्रुत आणि परायण।
दीर्घायुषी सनातन । बुद्धिमंत ॥

दक्ष मूर्त योग्य तार्किक । वैयाकरण नेमक भेदक ।
कुशळ चपळ संघटक । नानाप्रकारे ॥

सुघडसंगीत गुणग्राही। सर्वमित्र लोकसंग्रही ।
धनाध्यक्ष स्पष्ट वचनी । सर्वकाळ ।।

माधुर्य तव कंठस्यम् देहे चापल्यमेव च ।
पुनरेवानु संदध्यात् देवः कल्याणकारकः ॥

कवी: प्रा रामभाऊ डिंबळे

सुभाषराव

द्वैभाषिक कवी कणखर वक्ता टिपणपटू भारी…
अखंड कामाची लगबग जग उपासने लावी….१

अद्भुतची कार्य करी अनपेक्षी लोकसंग्रही..
वाड्माधुर्य परशोकहारी सत्यवंत सुकृती….२

जेणे बहुतांश मिळे शक्ती
ती ही रोकडी प्रबोध भक्ती..
बहुतांंचे मनोगत हाती, घेतले जयाने….३

सुखद जलद मार्गप्रद हसरा प्रसन्न बैरागी …
वय पाऊणशे तरीही तरुणच निसंग व्यवसायि ..४

कवी: प्रा रामभाऊ डिंबळे

दोघांनाही  कार्यक्षम दीर्घायु होण्यासाठी शुभेच्छा लिहिल्या आहेत.
प्रबोधिनीमध्ये जसं गद्य अफाट काम करतं तितकंच पद्यही सर्वांनाच आवडतं. त्यामुळे या शुभेच्छा पद्यात बांधल्या आहेत.
या दोघांचे कार्य काही मोजक्या शब्दात मांडणे निव्वळ कठीण. पण हा छोटासा प्रयत्न हे दोघेही गोड मानून घेतील याची खात्री आहे 🙏

कवयित्री डॉ.आर्या जोशी

💐💐💐💐💐💐💐

विनायकाचे सुपुत्र दोन्ही
ज्ञानाचा चेतविला वह्नि
समर्थ राष्ट्रा घडविता जाता
क्षण अमृतमय होती
येते कृतार्थ एक प्रचिती..

मा. सुभाषराव 🙏
फुलवीत हास्या ग्रामअंगणी
व्यवस्थापने करीत उजळणी
उद्योगाला अर्थ मिळाला
तुमच्या समर्थ हाती
येते कृतार्थ एक प्रचिती

मा. विसुभाऊ 🙏

व्याकरणाची सहज मेळणी
अंकांशी जुळवीत लेखणी
तत्वज्ञाने संगीताने
प्रगल्भ वामनमूर्ती
येते कृतार्थ एक प्रचिती
💐💐💐💐💐💐💐💐💐