ज्ञान प्रबोधिनीची द्वितीय प्रतिज्ञा

द्वितीय प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी

(सिंहगडावर दि. ५/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण) आपल्याला समाजाचे जीवन घडवणारे जीवन जगायचे आहे. त्याची पहिली पायरी म्हणून पहिली प्रतिज्ञा. मी जे काही काम करतो आहे ते देशासाठीच असे स्वतःला फसवायचे नाही. समाजाचे जीवन घडवणारे समाजाला उत्तरदायी पाहिजेत. ते शिकण्यासाठी प्रबोधिनीला उत्तरदायी राहायला शिकवायचे आज नव्याने चिंतन करायला हवे आहे. नव्याने काम करायला हवे आहे. […]

द्वितीय प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी Read More »

१०. भजनास लावावे बहुत लोक

गीतेमध्ये म्हटले आहे – यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्भुवा नीतिर्मतिर्मम ।। (गीता १८.७८) योगेश्वर जिथे कृष्ण, जिथे पार्थ धनुर्धर। तिथे मी पाहतो नित्य, धर्म श्री जय वैभव ।। (गीताई १८.७८) आम्ही विजयी व्हावे, आम्ही नीतिमंत श्रीमंती निर्माण करावी, यासाठी आम्हीच अर्जुनासारखे रथी आणि कृष्णासारखे सारथी व्हायचे ठरवले आहे. त्यासाठी आम्ही संघटित

१०. भजनास लावावे बहुत लोक Read More »

९. राष्ट्रउभारणीसाठी प्रतिज्ञा

प्रथम प्रतिज्ञेत फक्त राष्ट्रसेवेचा उल्लेख आहे. द्वितीय प्रतिज्ञेत राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापना असे का म्हटले आहे ? राष्ट्र-उभारणीचे काम म्हणजे धर्मसंस्थापनेचेच काम. प्रबोधिनीच्या घटनेत ‘रूप पालटू देशाचे’, ‘देशाचा कायपालट व्हावा’, ‘देशात विचारप्रबोधन आणि कार्यप्रबोधन व्हावे’, ‘देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे’, ‘भारतीय समाज आणि भारतीय राष्ट्र यांना वैभवसंपन्न आणि गौरवसंपन्न करणे’ अशा वेगवेगळ्या पद्धतीने राष्ट्र-उभारणीच्या कामाचे

९. राष्ट्रउभारणीसाठी प्रतिज्ञा Read More »

८. प्रतिज्ञेसाठी अविरत श्रमणे

प्रबोधिनीचा स्थापना दिन म्हणजे प्रबोधिनीच्या सर्व प्रतिज्ञित घटकांची, म्हणजे द्वितीय प्रतिज्ञिताची, वार्षिक पत्र-भेट घेण्याचा दिवस. आजच्या तारखेला या वर्षी आषाढी एकादशी पण आहे. आषाढी एकादशीला देव झोपी जातो असे म्हणतात. म्हणून ही देवशयनी एकादशी. तर कार्तिकी एकादशीला देव पुन्हा जागा होतो म्हणून ती प्रबोधिनी एकादशी. पूर्वीच्या काळी पावसाळा व शेतीच्या कामांमुळे, चातुर्मासात देवाकडे लक्ष द्यायला

८. प्रतिज्ञेसाठी अविरत श्रमणे Read More »

७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास

प्रथम प्रतिज्ञेनंतर द्वितीय प्रतिज्ञेची आवश्यकता का आहे? प्रथम प्रतिज्ञा आजीवन राष्ट्रसेवा करण्याची आहे. राष्ट्रसेवा कशी करायची याचा निश्चय त्यात नाही. राष्ट्रसेवेचे अनेक मार्ग आहेत. ते हळूहळू कळत जातात. त्यात आपल्या स्वभावाला अनुकूल असा मार्ग त्यानंतर लक्षात येतो. काही जणांना आपले कार्यक्षेत्र सापडते. कार्यक्षेत्र सापडले तरी त्यात काम करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक व्यक्तिशः काम करण्याची

७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास Read More »

५. प्रतिज्ञितांची सामूहिक शक्ती

नवा विचार माझा या वर्षात द्वितीय प्रतिज्ञेसंबंधी नव्याने काही विचार झाला. द्वितीय प्रतिज्ञा आयुष्यभरासाठी असते. प्रथम प्रतिज्ञेने आपण व्यक्तिशः राष्ट्रसेवेचे व्रत घेतो. द्वितीय प्रतिज्ञेनुसार आपण संघटनेचे घटक म्हणून राष्ट्रसेवा करण्याचे ठरवतो. ‘प्रबोधिनीचा मार्ग हा राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग’ की ‘कोणत्याही संघटनेचा घटक होऊन राष्ट्रसेवा करणे हा सर्वश्रेष्ठ मार्ग’ असा प्रश्न अनेकांना पडतो असे त्यांच्याशी चर्चा करताना

५. प्रतिज्ञितांची सामूहिक शक्ती Read More »

५. संघटनेच्या विकासाचे टप्पे

प्रबोधिनीच्या द्वितीय प्रतिज्ञितांना प्रबोधिनीच्या स्थापना-दिनी प्रतिज्ञेबद्दल किवा संघटनेचा स्वरूपाबद्दल दरवर्षी पत्र लिहित असतो. तसे हे आठवे पत्र. प्रबोधिनीच्या एकूण द्वितीय प्रतिज्ञितांची संख्या आता २०१५ अखेर ३४५ झाली आहे. या ३४५ सदस्यापैकी आज प्रबोधिनीच्या एखाद्या विभागात किंवा केंद्रात नियमित किंवा प्रासंगिक काम करणारे सुमारे १२५ सदस्य आहेत. अन्य सर्वजण प्रबोधिनीत पाच पासून पंचवीस वर्षे काम करून

५. संघटनेच्या विकासाचे टप्पे Read More »

संघटना म्हणजे काय?

कोणत्याही समाजामध्ये तीन प्रकारांनी लोक एकत्र जमत असतात. एक प्रकार म्हणजे ‘संस्था, दुसरा प्रकार म्हणजे ‘संघटना’, व तिसरा प्रकार म्हणजे ‘मित्रसमूह’. ‘संस्था’ दोन प्रकारच्या असतात. औपचारिक संस्था सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे तयार होतात व चालतात. अनौपचारिक संस्था या समाजातील रूढी, परंपरा व प्रथांमुळे बनलेल्या असतात. एखादी बँक, कंपनी, शिक्षणसंस्था किंवा क्लब या औपचारिक संस्था आहेत. कुटुंब,

संघटना म्हणजे काय? Read More »

उत्तमतेची साधना

प्रबोधीनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट राष्ट्र उभारणी आणि ध्येय धर्मसंस्थापना आहे हे कळले. प्रबोधिनीची कार्यपद्धती काय आहे? तनमनधनपूर्वक आणि उत्तरदायी राहून काम करणे ही प्रबोधिनीची कार्यपद्धती आहे. काम करता करताच ही पद्धती समजत जाते. तनमनधनपूर्वक काम करायचे तर बुद्धीचा निश्चय किंवा निर्णय व्हायला पाहिजे. आपल्याला दोन प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय आणि कार्यवाहीचे निर्णय. एखाद्या ध्येयासाठी

उत्तमतेची साधना Read More »

२. उत्तरदायी सदस्य म्हणजे

तनमनधनपूर्वक काम करणे आणि उत्तरदायी राहून काम करणे या गोष्टी जमायला बराच वेळ लागेल. तोपर्यंत रोज काय करायचे ? रोज काय करायचे हे प्रत्येकाने स्वतःच प्रयोग करत ठरवायला लागेल. सर्वसामान्य प्रबोधिनीपण आणि विशेष प्रबोधिनीपण स्वतःमध्ये बाणविण्याचा प्रयत्न चालू ठेवला तर रोज काय करायचे हे स्वतःलाच सुचत जाईल. दिशादर्शक म्हणून पुढील काही गोष्टी सुचवता येतील. त्यातल्या

२. उत्तरदायी सदस्य म्हणजे Read More »